Home » हल्ली मोबाईल दिल्याशिवाय मुलं जेवतचं नाही? हा प्रत्येक पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे…
Food & Drinks

हल्ली मोबाईल दिल्याशिवाय मुलं जेवतचं नाही? हा प्रत्येक पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे…

घरात बाळ जन्माला येणार म्हंटल की घरातले वातावरण अगदी आनंदाचे असते मंग लहान मुलासोबत खेळत,त्याच्या बाललीला बघत आपला पूर्ण दिवस कसा निघून जातो हे समजत देखील नाही.ते बाळ ८-९ महिन्याच्या असते तो पर्यंत ठीक आहे परंतु जेव्हा ते पालथे पडायला,रांगायला आणि चालायला लागते तेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टी बदलत जातात.

लहान मुलांना दात आल्यावर त्यांना खाऊ घालणे हे आईवाडीलांसाठी थोडेसे अवघडचं असते.तेव्हा त्यांना खायला काय द्यावे पूर्ण जेवण होईपर्यंत त्यांना एक ठिकाणी कसे बसवावे अशा अनेक गोष्टी कडे लक्ष द्यावे लागते.आईचे दूध सुटल्यावर बाळ जेव्हा वरचे अन्न खायला लागते तेव्हा आईवडिलांनी काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला पाहिजे.पालकांनी या चुका टाळायला पाहिजे…

१.लहान मुलांना पेस्ट सारखे पदार्थ खाऊ घालण्याअगोदर नेहमी टेस्ट करून बघावे.कारण त्यांना दुधाशिवाय कोणत्याच पदार्थाची चव माहीत नसते.त्यामुळे सुरुवातीला मुलं ते तोंडातून बाहेर टाकतात.पदार्थाची चव माहीत नसल्यामुळे ते पदार्थ तोंडाबाहेर टाकतात. 

२.खूपवेळा मुलं काही खायचं म्हंटल्यावर तोंड वेडंवाकडं करतात तेव्हा आपल्याला वाटते आवडत नसल्यामुळे खायचं नाहीये. त्यांना तो पदार्थ गिळून घ्यायचा हे माहीत नसतं.

३. लहान मुलं म्हंटले की ते ड्रेस,तोंड आणि बसलेली जागा तर खराब करणारच मात्र आई ते साफ करत असते हे साफ करण्याऐवजी ते थोडा वेळ तसेच ठेवायचे कारण यामुळं बाळ त्या सांडलेल्या पदार्थासोबत मनसोक्त खेळून द्यायचे.

५.बाळाला एकटे खाऊ घालण्याऐवजी त्याला आपल्यासोबत जेऊ घालावे त्यामुळे बाळ हसूनखेळुन जेवते.आपण कसे जेवतो तसचं ते बघून-बघून खायला शिकतात.त्यामुळे आईवाडीलांसोबत खायला देणे हा उत्तम पर्याय ठरेल.

६.पुन्हा एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाचं पोट भरलं असेल हे ओळखता आलं पाहिजे पोट भरलं तरी बळच खाऊ खाऊ घालत असाल तर असे करू नये.

मोबाईलची सवय मोडण्यासाठी काय करावे…

१) जेवतांना मुलांना मोबाईल दिला तर…

जेवतांना मुलांना मोबाईल दिला तर बालरोगतज्ज्ञ यांच्या मते त्यामुळे मुलांची भूक प्रवृत्ती हळूहळू कमी होते.मोबाईल मध्ये लक्ष असल्यामुळे त्यांची खाण्याची इच्छा कमी होते.

२) मुलांचा स्वभाव बदलतो…

संशोधनानुसार मुलांनी जेवतांना मोबाईल बघितला तर याचा परिणाम त्यांच्या स्वभावावर होतो.या मुलांची तब्बेत जाड होऊ शकते आणि या मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि हट्टीपणा जाणवतो.

३) कमी वयातच चष्मा लागू शकतो…

सतत मोबाईलमध्ये कार्टून आणि व्हिडीओ गेम बघितल्यामुळे त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतात.जास्त वेळ मोबाईल बघितल्या मुळे डोळ्यावर परिणाम होतो आणि यामुळे कमी वयात चष्मा देखील लागु शकतो.

४) वेळ ठरवून मोबाईल द्यावा…

डब्ल्यूएचओ च्या मते एका वर्षा खालील मुलांना मोबाईल दिलाच नाही पाहिजे पाच वर्षावरील मुलांना जास्तीत जास्त एक तास मोबाईल दिला पाहिजे या पेक्षा जास्त नाही.

५) मुलांपासून मोबाईल कसा दूर करावा…

मुलं नेहमी आईवडिलांचे अनुकरण करत असतात घरात जसे वातावरण असते तसेच मूल वागत असतात.आपण पेपर किंवा पुस्तक वाचतांना दिसलो तर त्यांना देखील वाचण्याची सवय लागते.आणि जर तुम्हीच त्यांच्यासमोर मोबाईल आणि टीव्ही बघत बसलात तर त्यांना देखील तशीच सवय लागते.

त्यांना टीव्ही पाहण्याचा वेळ ठरवून द्यावा.त्यांच्यासोबत बोलले पाहिजे त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या पाहिजे.मुलांसोबत खेळले पाहिजे.यासर्व गोष्टींमुळे मुलांमधील आणि आईवडिलांमधील बॉंडिंग चांगलं होतं.