Home » पावसाळ्यातील काही खास फळे जी खाल्ल्यामुळे आजार राहतील दुर…
Uncategorized

पावसाळ्यातील काही खास फळे जी खाल्ल्यामुळे आजार राहतील दुर…

पावसाळा सुरू झाला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात.मुलांचे स्वास्थ्य कसे सांभाळायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.स्वास्थ्य किंवा निरोगी आरोग्याचे तीन स्तंभ आहेत असे म्हणतात स्वस्थ आहार,विहार आणि विचार. 

उन्हाने हैराण झालेल्या आणि थकलेल्या जीवाला आराम देणारा ऋतू म्हणजे पावसाळा.पण त्याचबरोबर पावसाळा म्हटले की अनेक साथीचे रोग आलेच.अशा वातावरणात नेहमीच पचनास हलके असणारे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.पावसाळ्यात कोणती फळे आणि भाज्या खाव्यात असा प्रश्न अनेकांना पडतो.

पावसाळा आला कि हवेत गारवा निर्माण होतो अशा वातावरणात गरमागरम भजी,चहा आणि वडापाव सगळ्यांनाच खायला आवडते.मात्र त्याबरोबर पावसाळ्यात फळांचा आस्वाद देखील घ्यायलाच हवा.पावसाळ्यात काही खास फळे विशिष्ट काळासाठी उपलब्ध असतात.

पावसाल्यात आरोग्य राखायचे असल्यास पावसाळ्यात येणाऱ्या भाज्या आणि फळेच खायला पाहिजे.पावसाळ्यात शक्यतो फळे आणि भाज्यांनाच प्राधान्य द्यायला हवे.दुधी भोपळा,गवार,तोंडली,कारले या भाज्यांचा पावसाळ्यात आहारामध्ये समावेश करावा.डाळिंब,केळी,सफरचंद ही फळे खावीत.

चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात कोणकोणत्या फळांचे सेवन करावे… 

१) डाळिंब : खरतरं डाळिंब हे बारामाही फळ आहे परंतु पावसाळ्यात आजारापासून बचाव करण्यासाठी डाळिंबाचे नियमित सेवन केले पाहिजे.फायबर आणि व्हिटॅमिन युक्त असलेले डाळिंब वर्षभर मिळते मात्र पावसाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित असणाऱ्या समस्या दूर होतात.अनेकदा आजारी असताना डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो.

२) नाशपती : फायबरयुक्त असलेले नाशपती हे फळ खूपच गोड आणि चविष्ट फळ आहे.हे फळ खाल्ल्याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते.या फळामध्ये अँटी ऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असते.त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नाशपती या फळाचे सेवन अवश्य करा. या फळाचे सेवन केल्यास कर्करोग,हायपरटेंशन,डायबिटीज आणि हृद्याशी संबंधित असणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.

३) जांभूळ : पावसाळा सुरू झाला की जांभूळ पिकायला सुरुवात होते त्यामुळे जांभळाचे सेवन करणे शरीरासाठी खूपच फायदेशीर मानले जाते.जांभळात आयर्न,पोटॅशिअम, फोलेट आणि व्हिटॅमिन योग्य प्रमाणात असते.जांभळाचे सेवन केल्यास पोटदुखी आणि इंफेक्शनपासून बचाव होतो तसेच डायबिटीज आणि कर्करोग असलेल्या रुग्णांना जांभुळ खाणे खूपच फायदेशीर आहे.

४) चेरी : लालभडक चेरी बघितल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते.चेरी हे असे फळ आहे ज्याचे पावसाळ्यात सेवन करणे खूपच फायदेशीर मानले जाते.चेरी हे व्हिटॅमिन-ए,बी, सी,बीटा कैरोटीन,कॅल्शिअम,आयर्न आणि पोटॅशिअम युक्त फळ आहे.या फळामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात.चेरीमध्ये व्हिटॅमिन-सी आधिक प्रमाणात असल्यामुळे या फळाचे नियमित सेवन केल्याने इंफेक्शन पासून बचाव होतो.शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

५) आलूबुखार :  आलूबुखार या फळाला विविध नावाने ओळखले जाते.आलूबुरा हे स्वादिष्ट आणि चविष्ट फळ आहे. पावसाळ्यात इंफेक्शन आणि पोटाशी संबंधित असणाऱ्या समस्या पासून दूर राहण्यासाठी या फळाचे सेवन करावे.रोज आलूबुरा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होतो.यामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सीडेंट मुळे आजार होण्याचा धोका कमी होतो.हाडांच्या मजबुतीसाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील आलूबुरा फायदेशीर आहे.

६) लिची : लिची म्हणजे वाळलेल्या सालेच्यामध्ये लपलेला पारदर्शक रसरशीत गर.या गरामध्ये चॉकलेटी रंगाची एक मोठी बीअसते.लिची या फळाची चव इतर फळांसारखी नसते. खरंतर या फळाची चव नेमकी कशी असते हे सांगता येत नाही.ती खाल्ल्यावरच अनुभवायची असते.लिचीमध्ये विटॅमीन-सी आणि विटॅमीन-बी ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.त्यामुळे रक्त वाढण्यास आणि त्वचा टवटवीत होण्यास मदत होते.

७) पीच : पीच हे फळ आलुबुरा सारखेच पण टेक्चर आणि चवीला थोडे वेगळे.पावसाळ्यात पीच हे फळ सगळीकडे दिसते.इतर फळांच्या तुलनेत पीच या फळाची किंमत अधिक असते.या फळामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असते.या फळांचे भरपूर फायदे आहे.पीचचा रंग आणि तुम्ही त्याचे टेक्सचर जर तुम्ही पाहिले असेल तर हे फळ मखमली असते.ह्रदयविकार नियंत्रणात ठेवणे,पचनशक्ती वाढवणे,ऍलर्जीसाठी करणे आणि त्वचाविकार साठी देखील उपयुक्त आहे.