Home » खाण्याअगोदर आंबे पाण्यात भिजून ठेवण्यामागे देखील आहे वैज्ञानिक कारण जाणून घ्या…!
Food & Drinks Infomatic

खाण्याअगोदर आंबे पाण्यात भिजून ठेवण्यामागे देखील आहे वैज्ञानिक कारण जाणून घ्या…!

आंब्याचा मोसम सुरू झाला की सर्वजण आंब्याच्या विविध प्रकारच्या व्यंजनांचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज होतात. आंब्याचा रस, शेक,आईस्क्रीम अशा विविध रूपांमध्ये आंब्याचे सेवन केले जाते मात्र आपण अनेक वर्षे या आंब्याचा वापर करण्या अगोदर आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवले जातात ही पद्धत बघत आलो आहोत. पुर्वापार चालत आलेल्या या पद्धती मागे आंब्यावर असलेली धूळ आणि वापरली गेलेली रसायने दूर करण्याचा एक प्राथमिक उद्दिष्ट असतोच मात्र या व्यतिरिक्त यामागे विविध प्रकारची कारणे काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

  1. आंब्यामध्ये नैसर्गिक रित्या फायटोकेमिकल असतात. जे शरीरासाठी चांगले व वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम घडवून आणतात. शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम ,लोह ,झिंक शरीरामध्ये कार्यरत होण्यास अडथळा आणतात. अन्य काही फळांमध्ये सुद्धा फायटोकेमिकल असतात‌. आंबे खाण्या अगोदर पाण्यात थोडा काळ ठेवले तर उष्णता कमी होते.
  2. आंब्यामध्ये असलेल्या उष्णतेमुळे शरीरावर विविध प्रकारच्या त्वचेचे आजार व पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.त्यामध्ये असलेल्या उष्णतेमुळे त्वचेवर तारुण्यपिटिका, मुरूम ,ऍलर्जी होऊ शकते. तसेच डायरिया होऊ शकतो. पाण्यामध्ये आंबे भिजवून ठेवल्याने त्यामधून उष्णता कमी होऊन त्वचेशी निगडित व पोटाशी निगडित समस्या दूर होतात.
  3. आंब्याच्या फळांवर विविध प्रकारची रासायनिक द्रव्ये फवारली जातात. यामुळे श्वसनाचे निगडित समस्या एलर्जी इत्यादी उद्भवू शकतात. आंबा पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे ही रासायनिक द्रव्ये निघून जाण्यास मदत होते.
  4. आंब्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॅट असतात. पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे फॅट काही प्रमाणात कमी होऊन  कमी प्रमाणात शरीरात जातात.