Home » चाहत्यांसाठी वाईट बातमी,ड्रीम गर्ल हेमामालिनी यांची प्रकृती चिंताजनक…
Health

चाहत्यांसाठी वाईट बातमी,ड्रीम गर्ल हेमामालिनी यांची प्रकृती चिंताजनक…

ऐंशीच्या दशकातील सौंदर्यवती व अभिनयाच्या बाबतीत देखील खणखणीत नाणे असलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री हेमामालिनी होय.हेमामालिनी यांच्या सौंदर्याची चर्चा तर इतकी होती की त्यांना ड्रीम गर्ल या नावाने आजही संबोधले जाते.हेमा मालिनी यांच्याबद्दल नुकतीच एक बातमी समोर आली आहे की त्यांची तब्येत खूपच खालावली असून त्यांना दिल्ली येथे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेमामालिनी यांच्या घशाला खूप मोठ्या प्रमाणात सूज आली असून त्यांना श्वसनाचाही त्रास होत आहे.त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.हेमा मालिनी यांना चिंताजनक अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्या लवकरच बऱ्या होतील तसे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना निश्चितच काहीसा दिलासा मिळाला आहे.

एक काळ होता जेव्हा हेमामालिनी या प्रत्येक दिग्दर्शकाची चित्रपटासाठी ची पहिली पसंती होत्या. हेमामालिनी यांनी आपल्या काळातील सर्व सुपरस्टार सोबत अभिनय केला आहे.हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत विवाह केला असून सध्या त्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत.मात्र राजकारणामध्ये त्या सक्रिय आहेत व त्या नेहमीच आपली राजकीय मते परखडपणे मांडताना दिसून येतात.तसेच नृत्य साधना हे हेमा मालिनी यांचे पहिले प्रेम आहे. त्यांनी विविध नृत्यप्रकारांमध्ये प्राविण्य मिळवले असून अनेक स्टेज शो त्या आपल्या मुलींसोबत करताना दिसून येतात.