Home » खाल्ल्याबरोबर लगेच शौचास जात असाल तर सावध…! आरोग्यासाठी आहे अत्यंत धोकादायक…
Health

खाल्ल्याबरोबर लगेच शौचास जात असाल तर सावध…! आरोग्यासाठी आहे अत्यंत धोकादायक…

शरीर हे योग्य पद्धतीने व सुरळीतपणे कार्य करते आहे का हे जाणून घेण्याच्या काही पद्धती आहेत त्यापैकी एक म्हणजे आपल्या मलविसर्जनाची प्रक्रिया होय.मलविसर्जन ही अशी प्रक्रिया जिच्या विविध परिमाणांद्वारे आपल्याला शरीर निरोगी आहे की नाही हे कळते.मल विसर्जनाच्या प्रक्रियेत पचन हे सुलभ आहे की नाही हे ठरते.तसेच फक्त रंगाद्वारे पण आपल्या पचनाविषयी कळते तसेच किती वेळा शौचास जातो यावरूनही आरोग्यविषयक काही समस्या समोर येतात.काही व्यक्तींना पचनाचा किंवा बद्धकोष्ठतेचा कोणताही त्रास न होता दिवसभरात कोणत्या वेळेस ते शौचास जातात हे आरोग्य ठरते.

दिवसभरात अशा व्यक्तींना कितीही वेळा शौचास जावे लागते.शौचाच्या सवयी  मागे एखादी आरोग्यविषयक समस्या असू शकते असते.जेवण केल्या बरोबर किंवा काही खाल्ल्या बरोबर शौचास जावयास लागणे ही वरवर पाहता सवय वाटत असली तरी काही वेळा यामागे आरोग्यविषयक समस्या सुद्धा दडलेली असते.आज आपण जेवणानंतर किंवा जेवण केल्यानंतर लगेच शौचास जावे लागणे आरोग्यासाठी कसे घातक ठरू शकते हे जाणून घेणार आहोत.

१) अनेकदा लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांना सुद्धा काही खाल्ल्या बरोबर लगेच शौचास जाण्याची गरज भासते.याला गेस्ट्रोकोलिक रिफलेक्स असे म्हणतात.

२) गेस्ट्रोकोलिक रिफलेक्स ही समस्या म्हणजे आपल्या आधीचे खाणे  न पचताही लगेचच दुसऱ्यांदा खाल्यामुळे लगेच शौचास जाण्याची भावना निर्माण होते.अनेकदा जंक फूडचे अतिरिक्त सेवन व व्यायामाचा अभाव यामुळे पचन प्रक्रियेवर  ताण पडतो व दोन ते तीन दिवस पचनाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ घेते. मलविसर्जन साठी यामुळे वारंवार जाण्याची इच्छा होते.

३) गेस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स ही  समस्या निर्माण होण्यामागे आधुनिक काळातील बदलती जीवनशैली ,आहारातील बदल ,चहा व कॉफी चे वाढते सेवन, तिखट व मसालेदार पदार्थ अधिक खाणे, मद्यपान यामुळे निर्माण होऊ शकते.

४) गेस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स या समस्यांमुळे पाठ दुखी ,पायदुखी,पोटातील अंतर्गत जखम व मानसिक समस्या निर्माण होतात.मव विसर्जनाच्या व पोट दुखीचा समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपाय करणे आवश्यक असते.

५) अनेकदा एकदम उतार वयामध्ये जठराचे कार्य मंदावते व यामुळे पचनाची प्रक्रिया सुलभ पद्धतीने होऊ शकत नाही व यामुळेच वृद्ध व्यक्तींमध्ये बद्धकोष्ठता ही समस्या अधिक प्रमाणात दिसते.समस्यांमुळे भूक मंदावणे समस्याही निर्माण होतात याचा एकंदरीतच परिणाम आपल्या वजनावर होतो

६) पोट जड होणे,वारंवार शौचास जाणे या समस्यांसाठी काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात. सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये जिरे किंवा जिऱ्याची पावडर टाकून पाणी उकळून प्यावे.

७) केळी आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आपल्या आहारात समावेश करावा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तंतुजन्य पदार्थ असतात त्यामुळे पचनाची प्रक्रिया सुलभ होते.

८) अंजीर खाणे सुद्धा या समस्येवर अतिशय गुणकारी ठरते.अंजिरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात जी पचनासाठी साहाय्यकारी ठरतात.

९) मेथीदाणे,हळद,हिंग आणि जिरे यांचे मिश्रण करून हे चूर्ण जेवणानंतर ताका सोबत घेतले तर बद्धकोष्ठता आणि वारंवार मलविसर्जनाला जाण्याची समस्या दूर होते.

१०) मलविसर्जन हा शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचा मार्ग असतो. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडणे हे निरोगी आरोग्यासाठी खूपच आवश्यक असते म्हणूनच ही प्रक्रिया सुरळीत चालते आहे की नाही यावर लक्ष ठेवणे खूप आवश्‍यक आहे व खाल्ल्यानंतर लगेचच शौचास जाण्याचा त्रास सातत्याने जाणवत असेल तर आवश्यक त्या तपासण्या करून घ्याव्यात.