Home » ज्येष्ठमधाच्या चहाचे सेवन करा आणि मिळवा ‘हे’ फायदे, फायदे वाचून चकित व्याल!
Health

ज्येष्ठमधाच्या चहाचे सेवन करा आणि मिळवा ‘हे’ फायदे, फायदे वाचून चकित व्याल!

कोरोना आजाराच्या संक्रमणाला सुरुवात झाल्यापासून निरनिराळे घरगुती उपाय आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाकडून सर्रास केले जात आहेत. भारतीय संस्कृतीला आयुर्वेदाचे खूप मोठी परंपरा आहे.भारतीय आयुर्वेदामध्ये विविध वनस्पती तसेच आपल्या रोजच्या वापरातील विविध पदार्थांचे औषधी गुणधर्म अगदी विस्तृत स्वरूपामध्ये वर्णन करण्यात आले आहेत. आज आपण अशाच एका औषधी वनस्पतीच्या फायद्यांना जाणून घेणार आहोत. ज्येष्ठमध हे आयुर्वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरणारे औषध अनेक ठिकाणी वर्णन करण्यात आले आहे.ज्येष्ठमधाचे विविध प्रकारे सेवन केले जाऊ शकते.

ज्येष्ठमध हे चवीला गोड असते. खूप प्राचीन काळापासून ज्येष्ठमधाचे मुळाचा औषधाप्रमाणे वापर केला जातो याला कारण म्हणजे या मुळामध्ये निरनिराळ्या आजारांवर प्रभावी ठरू शकणारे औषधी गुणधर्म असतात.ज्येष्ठमधाच्या मुळापासून बनवलेला चहा घशाच्या संसर्गावर सर्वात प्रभावी उपाय ठरतो. ज्येष्ठमधाचा घशाच्या विकारां सोबतच नैराश्य,त्वचेवरील पुरळ ,एलर्जी ,अल्सर ,त्वचा विकार इत्यादींवर खूप उपायकारक आहे असे दिसून येते. ज्येष्ठमधाचा चहा हा आतड्यांचे विकार आणि मेनोपॉजमध्ये उद्भवणा-या समस्यांवर सुद्धा एक उत्तम उपाय मानला जातो. आज आपण ज्येष्ठमधाच्या चहा मुळे होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

ज्येष्ठमध हे त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे .ज्येष्ठमधाच्या मुळांना वापरुन बनवलेल्या चहा द्वारे त्वचेशी निगडित अनेक आजारांना दूर केले जाऊ शकते.एक्झिमा,सोरायसिस, कोरड्या त्वचेवर उठणारी खाज त्यामुळे निर्माण होणार समस्या इत्यादींवर ज्येष्ठमधाच्या मुळ्या वापरून केलेला चहा थंड करून तो ज्या ठिकाणी समस्या निर्माण झाली आहे त्याठिकाणी लावला असता हे विकार दूर होतात मात्र हा उपाय दीर्घकाळ करणे आवश्यक आहे.त्वचेच्या विकारांवर ज्येष्ठमधाच्या चहाला इतके प्रभावी ठरण्याचे कारण म्हणजे ज्येष्ठ मधामध्ये असलेले ऑंटी सेप्टीक ,अँटीव्हायरस,अँटी बॅक्टेरियल गुणधर्म होय.ज्येष्ठमध मध्ये त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्याचे गुणधर्म असल्यामुळे त्वचा कोरडी होण्यापासून बचाव होतो. ज्येष्ठमधामुळे त्वचेवर निर्माण होणारा लालसरपणा आणि जळजळ थांबते व त्वचा विकारमुळे त्वचेला झालेली हानी भरून निघण्याची प्रक्रिया जलद होते.

ज्येष्ठ मधामध्ये त्वचेला उजळपणा प्राप्त करून देण्याचा नैसर्गिक गुणधर्म असतो. त्वचेला नैसर्गिकपणे उजळ बनवण्यासाठी ज्येष्ठमधाच्या चहामध्ये मुलतानी माती मिसळून हा फेस पॅक चेहर्‍यावर लावावा. हा फेस पँक सुकेपर्यंत चेहर्‍यावर तसाच ठेवावा व नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी या फेस पँकमध्ये नारळाचे तेल, ऑलिव ऑइल किंवा अन्य कोणतेही तेल मिसळावे यामुळे हा फेसपॅक लावल्यानंतर चेहऱ्यावर तेज दिसून येईल.

जेष्ठमध हे सन स्क्रीन प्रमाणे कार्य करते. ज्येष्ठमधाच्या काढा किंवा चहाचे सेवन केल्यामुळे सूर्य प्रकाशातून निर्माण होणाऱ्या अतिनील किरणांपासून बचाव होतो. चेहर्‍यावरील निस्तेज पणा आणि काळवंडलेपणा दूर होतो. जास्त काळ सूर्यकिरणांच्या संपर्कात राहून त्वचेवर काळवंडलेपणा निर्माण झाला असेल तर ज्येष्ठमधाच्या काढ्यामध्ये काकडीचा रस मिसळून ते मिश्रण चेहर्‍यावर लावावे व ते सुकेपर्यंत चेहऱ्यावर तसेच ठेवावे.

चेह-यावरचा उजळपणा टिकून ठेवण्यासाठी ज्येष्ठमधाचे नियमितपणे सेवन करावे किंवा हा जेष्ठमधाचा चहा थंड करून चेहर्‍यावर लावला असता चेहऱ्याला चमक प्राप्त होते. ज्येष्ठमधाच्या चहाचे  नियमितपणे सेवन केले असता आपल्या त्वचेला आत मधून ओलावा प्राप्त होतो. ज्येष्ठमधाच्या चहाचे  त्वचेप्रमाणेच केसांची निगा राखण्यामध्येसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावते. ज्येष्ठमधाच्या चहामध्ये आवळा पावडर, मेहंदी मिसळून हा हेअर पॅक केसांना लावला असता केसांशी निगडित अनेक समस्या दूर होतात जसे की सूर्याच्या रखरखीत किरणांमुळे केसांना झालेली हानी भरून काढणे, दुभंगलेले केस, केसातील कोंडा इत्यादी समस्यांवर सुद्धा ज्येष्ठमधाचा चहा खूपच गुणकारी ठरतो.

ज्येष्ठमधाच्या चहामध्ये डोक्याची त्वचा आणि  केसांच्या खाली असलेल्या त्वचेला ओलावा देण्याचे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात.त्यामुळे केसांच्या खाली असलेल्या त्वचेचा कोरडेपणा मुळे निर्माण होणाऱ्या कोंडा, केसांमध्ये खाज सुटणे इत्यादी समस्या ज्येष्ठमधाच्या चहा मुळे दूर होतात. ज्येष्ठमधाच्या चहा मध्ये थोडेसे खोबऱ्याचे तेल मिसळून या मिश्रणाने केसांना व विशेषतः केसांच्या खालील त्वचेला नीट मालिश करावी व हे मिश्रण केसांमध्ये साधारण एक तास तसेच ठेवून त्यानंतर केस नीट धुऊन घ्यावेत यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा प्राप्त होतो व केस कोरडे होण्याची समस्या सुद्धा दूर होते.

ज्येष्ठमधाच्या चहाचे नियमितपणे सेवन करणे आणि ज्येष्ठमधाचे पाणी केसांच्या मुळांशी नियमितपणे लावणे यामुळे केसांना गळण्यापासून रोखता येते आणि केसांची वाढ सुद्धा जोराने होते असे दिसून येते. केसांमधील ओलावा टिकून राहिल्यामुळे केसांची नैसर्गिकपणे वाढ होते आणि अकाली पडणाऱ्या टक्कल च्या समस्या सुद्धा रोखता येतात. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी प्रमाणे ज्येष्ठमधाचे सेवनाचे सुद्धा खूप फायदे होतात. ज्येष्ठमधाच्या चहाचे सेवन नियमित व्यायाम आणि आहारासोबत दिवसातून दोन वेळा केले असता साधारण 12 आठवड्यांनी वजनामध्ये लक्षणीय घट होते असे दिसून आले आहे.

रक्तदाबाला नियंत्रणात आणणे हे खूपच कठीण काम असते.रक्तदाबाला नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेण्यास सोबतच दिवसातून दोन वेळा ज्येष्ठमधाचे चहाचे सेवन केले असता खूप गुणकारी ठरते. ज्येष्ठमधाच्या चहाचे सेवन केल्यामुळे कमी रक्तदाबाच्या समस्येमुळे निर्माण होणारा थकवा, आळस, शिसारी येणे इत्यादी अन्य समस्या सुद्धा दूर होतात. ज्येष्ठमधाच्या चहामध्ये शरीराची शुद्धी किंवा शरीराला डिटॉक्स करण्याचे गुणधर्म असतात यामुळे आतड्यांची शुद्धी होऊन शरीरातील सर्व प्रकारची विषद्रव्ये सुद्धा शरीराबाहेर जाण्यास साहाय्य मिळते. संधीवाताच्या दुखण्यामध्ये निर्माण होणाऱ्या वेदना, जळजळ, कमी करण्यास ज्येष्ठमधाचा चहा साहाय्य करतो.ज्येष्ठमधाच्या चहाचे नियमित सेवन केल्यामुळे सांध्यांच्या हालचाली सहजपणे करण्यास मदत होते आणि सांध्यांचे दुखणे व वेदनाही कमी करण्यास मदत मिळते.

कॉर्टिसॉल हार्मोनच्या शरीरातील असंतुलनामुळे नैराश्य, चिडचिडेपणा ,थकवा ,आळस आणि काही करण्याची इच्छा नसणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. ज्येष्ठमधाच्या चहाच्या सेवनामुळे या हार्मोन्सचे संतुलन निर्माण होते व नैराश्य दूर करण्यासाठीही साहाय्य मिळते तसेच आपला मूड सुद्धा चांगला राहतो. ज्येष्ठमधाच्या दिवसातील दोन वेळेच्या सेवनामुळे सर्दी ,कफ यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून सुटका मिळते कारण ज्येष्ठ मधामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीव्हायरस गुणधर्म असतात.तसेच या आजारांशी लढण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा ज्येष्ठमधाच्या चहाच्या सेवनामुळे मोठ्या प्रमाणात वाढते.

 हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी सुद्धा ज्येष्ठमधाचे सेवन करणे खूप साहाय्यकारी ठरते. जेष्ठ मधामध्ये शरीरातील कोलेस्टेरॉल वाढू न देण्याचे गुणधर्म असतात आणि धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल ची पातळी वाढवून न देण्याचे कार्यही जेष्ठमध करते यासाठी ज्येष्ठमधाच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत पणे चालून कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहून ह्रूदयाशी निगडित समस्यांना दूर ठेवले जाऊ शकते.

तुमच्या घरी ज्येष्ठमधाचा चहा कसा तयार केला जाऊ शकतो याची अतिशय सोपी पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत.यासाठी आपल्याला ज्येष्ठमधाच्या वाढलेल्या मुळांची आवश्यकता आहे.एका पातेल्यामध्ये तुमच्या आवश्‍यकतेप्रमाणे पाणी उकळण्यास ठेवावे व ते पाणी उकळले असता त्यामध्ये ज्येष्ठ मधाची वाढलेली मुळे टाकावी. साधारण पाच ते सात मिनिटे हे पाणी  मध्यम आचेवर उकळू द्यावे व चहा प्रमाणे गाळणीने गाळून घेऊन हा जेष्ठमधाचा चहा सेवन करणयास तयार होतो.