Home » ‘या’ घरगुती उपायांनी ब्लॅकहेड्सची समस्या करा कायमची दूर…
Health

‘या’ घरगुती उपायांनी ब्लॅकहेड्सची समस्या करा कायमची दूर…

सौंदर्याशी निगडीत अनेक आरोग्य समस्या स्त्री आणि पुरुष या दोघांनाही उद्भवत असतात.सौंदर्यविषयक समस्यांना दूर करण्यासाठी उपाय करण्यासाठी त्वचा विकार तज्ञ किंवा ब्युटीपार्लरची मदत घेतली जाते.बाजारामध्ये अनेक प्रकारचे सौंदर्यप्रसाधने सुद्धा त्वचेची काळजी घेण्यासाठी उपलब्ध आहेत.सर्वसाधारणपणे सौंदर्याशी निगडीत होणारी समस्या म्हणजे चेहऱ्यावर निर्माण होणारे ब्लॅक हेड होय.ब्लँक हेड निर्माण होण्यामागे काही प्रमुख कारणे म्हणजे चेहरा किंवा त्वचेवरील रंध्र मध्ये अतिरिक्त तेल,विषद्रव्य साठवून राहिल्यामुळे चेहऱ्यावर पुरळसदृश ब्लँक हेड निर्माण होतात.

विशेषतः स्त्रियांमध्ये मासिकपाळीच्या काळामध्ये त्वचेमधून अतिरिक्त तेल स्त्रवल्यामुळे ब्लॅकहेड ची समस्या निर्माण होते.काही केसेस मध्ये हार्मोनच्या अतिरिक्त निर्मितीमुळे ब्लँक हेड निर्माण होतात.चेहऱ्यावरच नव्हे तर पाठ,गळा,मान खांद्यांवर सुद्धा निर्माण ब्लँक हेड निर्माण होऊ शकतात.ब्लँक हेडच्या निवारणासाठी अनेक महागड्या ट्रिटमेंट,सौंदर्यप्रसाधने सुद्धा वापरले जातात.

१) एक घरगुती उपाय असा आहे ज्याने कमीत कमी वेळामध्ये ब्लॅक हेड सफाईदारपणे कमी केले जाऊ शकतात.ब्लॅकहेड घालवण्यासाठी घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असलेल्या लिंबाच्या रसाचा वापर केला जातो.ब्लँक हेड असलेल्या ठिकाणी लिंबाच्या फोडी वर बेकिंग सोडा टाकून लिंबाची फोड दाब देऊन लावल्याने बेकिंग सोडा ब्लँक हेडच्या ठिकाणी व्यवस्थित लागतो.साधारण पाच मिनिटे अशाप्रकारे लिंबू आणि बेकिंग सोडा ब्लॅक हेड्‍सच्या ठिकाणी लावल्याचा उपचार दोन ते तीन वेळा आठवड्यातून केला तर काही दिवसांमध्ये त्याचे प्रभावी फरक दिसून येतात.

२) टोमॅटो हे एक नैसर्गिक ब्लीच मानले जाते.यामुळे त्वचा स्वच्छ आणि नितळ बनते.ब्लॅक हेड घालवण्यासाठी टोमॅटोचा रस चेह-यावर राहू द्या.रात्री झोपण्यापूर्वी टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावावा व सकाळी चेहरा स्वच्छ धुतला तर काही दिवसांनी ब्लॅक हेड सुटका मिळाल्याचे दिसून येते.

३) त्वचेवर ब्लॅक हेड निर्माण होण्यासाठी मुख्यत्वे मृतपेशी कारणीभूत असतात.ब्लँक हेड घालवण्यासाठी दूध आणि जायफळाचे चूर्ण एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास ब्लॅक हेड सुद्धा दूर होतात.लिंबू मुळे त्वचेवरील तेलकटपणा दूर होतो.लिंबू आणि मध एकत्र करुन चेहऱ्याला लावावे. काही दिवस हा उपाय सातत्याने केला तर् चेहऱ्यावरील ब्लँक हेड नष्ट होतात.

४) ब्लॅकहेड घालवण्यासाठी हळद हासुद्धा एक प्रभावी उपाय आहे.एक चमचाभर हळद थोडे पाणी किंवा नारळाच्या तेलामध्ये मिसळून हे मिश्रण लावा.ते पंधरा मिनिटं चेहऱ्यावर ठेवा.नंतर चेहरा स्वच्छ धुवावा.केवळ चेहऱ्यावर असणारे नव्हे तर शरीराच्या अन्य भागांवर सुद्धा काही वेळा ब्लँक हेडची समस्या निर्माण होते.साखर आणि लिंबाचा रस यांना एकत्र करून हा घरगुती स्क्रब शरीराला व्यवस्थित चोळून मग आंघोळ केली असता निश्‍चितच ब्लँक हेड दूर होतात. 

५) शरीरावर किंवा चेह-यावर ब्लँक हेड असलेल्या ठिकाणी वाफ घेऊन ब्लॅकेडला मऊ करून मग ब्लॅकहेड रिमूव्हरच्या साहाय्याने अगदी सहजपणे काढले जाऊ शकतात.वाफ घेतल्यामुळे त्वचेची रंध्रे मोकळी होऊन त्वचेवर एक वेगळीच चमक सुद्धा निर्माण होते.

६) मुळात त्वचेवर ब्लँक हेडची समस्या निर्माण होऊ नये यासाठी चेहरा किंवा शरीराच्या अन्य भागांवरील त्वचा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.मेकअप चा वापर केल्यावर मेकअप रिमुव्हरचा वापर मेकअप दूर करण्यासाठी करावा.त्वचेवरील रंध्रांमध्ये मेकअपमुळे ब्लँक हेड निर्माण होऊ शकतात.

७) ग्रीन टी चे त्वचेसाठी खूप आश्चर्यकारक फायदे आहेत.ग्रीन टी यामधील एंटीऑक्सीडेंट मुळे ब्लँक  हेडचा त्रास सुद्धा थांबू शकतो.थोडेसे ग्रीन टी पावडर मधामध्ये मिसळून ब्लँक हेड असलेल्या ठिकाणी लावले तर ब्लॅक हेड राहत नाही मात्र हा उपाय सततकाही महिने करणे खूप आवश्यक आहे.

७) अंड्याच्या पांढर्‍या भागामुळे त्वचेमधून निर्माण होणारे अतिरिक्त तेल नियंत्रणात आणले जाऊ शकते. यासाठी मध आणि एका अंड्याचा पांढरा भाग यांना एकत्र करून मिश्रण चेहर्‍यावर लावावे.

टिप : बीइंग महाराष्ट्रीयन’च्या वरील आरोग्यविषयक लेखात दिलेली माहिती हि प्राथमिक स्वरूपाची असून ती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय होऊ शकत नाही.यातील कोणताही उपचार किंवा सल्ला अमलात आणण्यापूर्वी सदरील विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.याविषयी बीइंग महाराष्ट्रीयन पोर्टल कोणताही दावा करत नसून कसलीही जबाबदारी घेत नाही