Home » सर्दी-खोकल्यासाठीचं नाहीतर ‘या’ विविध आजारांसाठी देखील हळद आहे अत्यंत गुणकारी…
Health

सर्दी-खोकल्यासाठीचं नाहीतर ‘या’ विविध आजारांसाठी देखील हळद आहे अत्यंत गुणकारी…

हळकुंड हे अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असते.पिवळ्याधमक रंगाची हळद भारताप्रमाणेच परदेशात सुद्धा पदार्थ आणि भाज्यांची चव आणि रंगत वाढवण्यासाठी वापरली जाते व त्या पेक्षा ही अधिक प्रमाणात औषधी उपयोगांसाठी वापरली जाते.प्रत्येक शुभप्रसंगी हळदीचा उपयोग हा हमखास केला जातो.चमत्कारिक गुणांची खाण असलेल्या हळदीच्या सेवनामुळे आपल्याला काय फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत.

१) हळदीचे दूध : भारतामधील अनेक आया आपल्या मुलांना हळद टाकलेले दूध म्हणजेच हळदीचे दूध पिण्यास देतात.हळदीमध्ये असलेले अँटिबायोटिक आणि एंटी इनफ्लेमेटरी गुणधर्म व दूधात असलेले कॅल्शिअम त्यामुळे हळदीचे दूध हे एक खूपच गुणकारी पेय ठरते.हळदीच्या दुधामध्ये जे एंटी इनफ्लेमेटरी तत्व असते व कॅन्सर विरोधी तत्व सुद्धा असते यामुळेच या दुधाला अनेक ठिकाणी गोल्डन मिल्क किंवा मॅजिक मिल्क असे म्हटले जाते.

२) दुधामध्ये असलेल्या एंटि बॅक्टेरियल व एंटी व्हायरल तत्वां मुळे जर एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल तर त्या जखमा चिघळू देणा-या जंतूंना वाढू दिले जात नाही व यामुळे जखम लवकर बरी होते.

३) औषधी किंवा आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे हळदीला दुधामध्ये घेतल्याने गुडघ्याचे दुखणे,अर्थराइटिस यांसारख्या त्रासांपासूनही आराम मिळतो.हळदीच्या दुधाच्या सेवनामुळे कोलायटिस,अल्सर यांसारख्या समस्यांवर उपाय केले जाऊ शकतात. 

४) चयापचयाची प्रक्रीया सुधारण्यासही हळदीच्या दुधाचा सेवनामुळे मदत मिळते.शरीरातील रस धातूंचे पोषण होऊन पचन योग्यप्रकारे होते व वजन कमी करण्यास साहाय्य मिळते.दूध हे स्मरणशक्तीसाठी खूप चांगले असल्याचे सांगितले जाते.दुधाच्या सेवनामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.

५) दुधामध्ये हळद टाकून गरम दुध पिल्याने असता शरीरामध्ये नैसर्गिकपणे उष्णता निर्माण होते.थंडीच्या दिवसांमध्ये हे दूध खूपच गुणकारी ठरते.तसेच सायनस,कफ,श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्यांमध्ये हे हळदीचे दूध औषधी म्हणून वापरले जाऊ शकते.

६) हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे विविध प्रकारच्या जंतुसंसर्गा पासून संरक्षण मिळते.हळदीचे दूध हे त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा खूपच उत्कृष्ट मानले जाते.हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या तारुण्यपिटिका,निरनिराळ्या प्रकारच्या एलर्जी इत्यादींना दूर करता येते.

७) कोलेस्टेरॉल वाढणे व ट्रायग्लिसराईड वाढणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नसते.यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते.हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराईड नियंत्रणात राहते.हळदीच्या दुधामध्ये जीवनसत्वांप्रमाणेच काही अन्य पोषक घटक सुद्धा असतात.दुधामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कर्क्युमिन हे अँटिऑक्सिडंट असते.

८) पिवळ्या रंगाच्या हळदी प्रमाणेच काळी हळद सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असते.काळ्या हळदीचा उपयोग आरोग्यविषयक कारणां प्रमाणेच ज्योतिषशास्त्र मध्येही केला जातो.काळ्या हळदीचा लेप दुधामध्ये मिसळून लावला असता त्वचेवर उजळपणा येतो.हळद हा औषधी गुणधर्म असलेला घटक असला तरी हळदीचे सेवन अधिक प्रमाणात केल्यामुळे काही नुकसान होऊ शकते.हळदीचे सेवन हे मुख्यत्वे हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात केले जाते.जेणेकरून शरीरामध्ये उष्णता निर्माण होते.

९) आपल्याला पचनाशी निगडित काही समस्या असतील किंवा वाढलेल्या आतड्याच्या समस्या असल्या तर हळदीच्या अतिरिक्त सेवनामुळे या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.ज्या व्यक्तींना रक्तक्षयाची समस्या असते त्यांनी हळदीच्या सेवना पासून दूरच राहावे.ज्या व्यक्ती ना मसाल्याच्या पदार्थांपासून ॲलर्जी होते त्यांनी हळदीचे सेवन करू नये कारण हळदीच्या सेवनामुळे या ॲलर्जी मध्ये वाढ होऊ शकते.

१०) ज्या व्यक्तींना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी हळदीच्या दुधाचे सेवन करू नये यामुळे किडनी स्टोन ची समस्या अधिक प्रमाणात बळावू शकते.गर्भारपणात बऱ्याच स्त्रिया बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी हळदीचे सेवन करतात मात्र यामुळे गर्भाशया मध्ये काही समस्या उद्भवू शकतात.

११) हळदीच्या अतिरिक्त सेवनामुळे उलटी,मळमळ,डोकेदुखीचा त्रास होतो.ज्या व्यक्तींना वारंवार डोके दुखीचा त्रास होतो त्यांच्या आहारात बऱ्याचदा हळदीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.हळदीचे अतिरिक्त सेवनामुळे वंध्यत्व यासारख्या समस्याही निर्माण होतात व ही समस्या विशेष करून पुरुषांमध्ये दिसून येते.