Home » काय सांगतो आपल्या हातावरील अर्धचंद्र! माहीत नसेल तर जाणून घ्या यामागील रहस्य…
Health

काय सांगतो आपल्या हातावरील अर्धचंद्र! माहीत नसेल तर जाणून घ्या यामागील रहस्य…

असं म्हणतात कि हातावरील रेषांवर आपले भाग्य अवलंबून असते असे पहिल्यापासून मानले जाते आणि कित्येक जणांचा यावर विश्वास देखील आहे.जर कोणाच्या तळ हातावर अर्धचंद्र असेल,तर यामागे काय रहस्य आहे? आपण आज त्याबद्दल जाणुन घेणार आहोत.

असे म्हंटले जाते की तळ हातांच्या रेषांवरून भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानकाळ समजू शकतो तुम्ही असे कित्येकदा ऐकले देखील असेल.हे ऐकल्यावर प्रत्येकाला आपल्या भाग्यात काय असेल हे जाणुन घेण्याची इच्छा होते. तुमच्यासोबत देखील असे कधीतरी घडले असेलच.

ज्योतिषीच्या म्हणण्यानुसार तळ हातावरील रेषा ह्या आपले भाग्य आणि नियती जीवन काल बद्दल सांगत असतात.ही अशी विद्या आहे ज्यामध्ये ज्योतिष हातांच्या रेषा,कपाळावरील रेषा किंवा पायाच्याही रेषा बघून भविष्य सांगत असतात.

हातावरील रेषा ह्या आपले आरोग्य आणि आणखी काही गोष्टीबद्दल माहिती देतात.इतकेच नाही तर आपल्या जीवनात होणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनांबद्दल देखील ह्या हस्तरेषा सांगतात.तुम्ही हे जाणुन घेण्यास अगदी उत्सुक असताल की दोन्ही तळ हात जोडल्यानंतर अर्धचंद्र तयार होत असेल तर यामागे काय रहस्य आहे.

आज आपण हातावर अर्धचंद्र तयार होत असेल तर यामागे काय रहस्य आहे ते जाणून घेणार आहोत…

तुम्हाला माहीत नसेल अर्धचंद्र कसा तयार होतो? तर यासाठी दोन्ही हात एकमेकांनजवळ आणायचे त्यानंतर सगळ्यात वरती असणारी दोन्ही हातांची रेषा जुळून बघा.त्यामधून जर अर्धगोलाकार आकार तयार होत असेल तर आपल्या हातावर अर्धचंद्र आहे नसेल होत तर नाही.

ज्यांच्या तळ हातावर अर्धचंद्र तयार होत असेल त्यांना शांत राहायला आवडते त्यांना जास्त कलकलाट आवडत नाही.ज्या व्यक्तीच्या हातावर अर्धचंद्र असतो ती व्यक्ती खुप सुंदर आणि ऍक्टिव्ह स्वभावाची असते.ही माणसे मित्रांशी खुप प्रामाणिक राहतात.

हातावर अर्धचंद्र असणाऱ्या व्यक्तींची बुद्धी खूप चंचल असते. ते बुद्धिमान असतात आणि प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्याची त्यांच्यात जास्त क्षमता असते.खुप वर्षापूर्वीच्या गोष्टीही त्यांना अगदी स्पष्टपणे आठवतात.असे व्यक्ती प्रेम मिळवण्यासाठी खुप धडपड करतात.ह्या प्रकारच्या व्यक्ती मनामधील गोष्टी मनातच ठेवतात.स्वतःहून कधी कोणाशी बोलत नाहीत.

हातावर अर्धचंद्र असणारी व्यक्ती खूप हुशार असते आणि ते हाती घेतलेले प्रत्येक काम चांगल्याप्रकारे पूर्ण करतात.तसेच कोणतेही संकट आले तर अशी व्यक्ती घाबरून न जाता त्या गोष्टीचा न घाबरता सामना करते.याप्रकरच्या व्यक्ती लाईफपाटणर च्या विषयात अतीशय भावुक असतात.परंतु या प्रकारच्या व्यक्ती इतरांपासुन स्वतःच्या भावना लपवण्याचा प्रयत्न करतात.

व्यक्ती खूप बुद्धिमान असतात.त्यामुळे यांच्यासाठी कोणतेही संकट मोठे नसते.जर दोन्ही हातांच्या रेषा जोडल्यास अर्धचंद्र न होता सरळ रेष तयार होत असेल तर ती व्यक्ती खूप शांत  आणि दयाळू स्वभावाची असते. हातावर अर्धचंद्र असणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक काम शांततेने आणि संयमाने करायला आवडते.

असे म्हंटले जाते की,सरळ रेषा असणाऱ्या व्यक्ती खूपच कमी असतात.जर दोन्ही हातांच्या रेषा जोडल्यास रेषा जुळत नसतील त्याऐवजी एक रेष खाली आणि एक रेष वर असेल किंवा वाकडी-तिकडी,तिरकी दिसत असेल तर ह्या  व्यक्तींना स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींसोबत राहायला आवडते.