Home » गर्भवती महिलांनी गरोदरपणात कोणती फळे खाल्ली पाहिजेत…
Health

गर्भवती महिलांनी गरोदरपणात कोणती फळे खाल्ली पाहिजेत…

गर्भवती महीलांना जास्त खायला सांगितले जाते.आईने खाल्ल्याले अन्न बाळाला लागु होते.गर्भवती महीलांनी संतुलित आहार घेतला पाहिजे ज्यामुळे आईची आणि बाळाची पोषणाची गरज भागेल.तुमच्या आहाराचा मध्ये भाज्या आणि फळे ह्यांचा समावेश केला पाहिजे.गर्भवती महीलांनी जर योग्य प्रमाणात फळे आणि भाज्या घेतल्या नाहीत तर बाळाच्या पोषणाच्या गरजा पूर्ण होत नाहीत.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्या स्त्रिया गरोदरपणात जास्त फळे खातात त्या स्त्रियांच्या बाळांचा विकास चांगला होतो.फळे हा आहारातील महत्वाचा भाग आहे आणि व्हिटॅमिन्स,खनिजद्रव्ये आणि तंतुमय पदार्थ हे सर्व घटक फळे खाल्ल्याने आई आणि बाळास मिळतात.फळांमध्ये बाळाला लागणारी बीटा कॅरोटीन हे पोषणमूल्ये असतात.याची टिश्यू आणि पेशींच्या विकासासाठी मदत होते.तसेच प्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी देखील मदत होते.

फळांमध्ये असणारे व्हिटॅमिन सी बाळाची हाडे आणि दातांच्या विकासासाठी फायदेशीर ठरते.तसेच फळांमध्ये असणारे फॉलिक ऍसिड बाळाच्या मेंदू आणि पाठीच्या कण्यासाठी उपयुक्त ठरते.

गरोदरपणात फळ खाण्याचे महत्व जाणून घेऊयात… 

१) आंबा : आंबा सगळ्यांनाच खायला आवडतो.आंब्यामध्ये  व्हिटॅमिन सी  जास्त प्रमाणात असते त्यामुळे पचनासाठी मदत होते,बद्धकोष्ठता कमी होते आणि इतर संसर्गापासून बचाव होतो.आंबा हे हंगामी फळ आहे आणि वर्षभर मिळत नाही.

२) कलिंगड : कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए,सी,बी-६, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम हे घटक असतात.कलिंगडमध्ये खनिजे,तंतुमय पदार्थ सुद्धा जास्त प्रमाणात असतात. शेवटच्या तिन महीन्यात आहारामध्ये कलिंगडाचा समावेश करा त्यामुळे जळजळ,हातापायांना येणारी सूज आणि स्नायूंसंबंधी समस्या कमी होतात.

३) अवोकॅडो : अवोकॅडो मध्ये इतर फळांच्या प्रमाणात जास्त फोलेट असते.अवोकॅडो व्हिटॅमिन सी,बी आणि के चा उत्तम स्रोत आहे आणि त्यामध्ये तंतुमय पदार्थ,कोलिन,मॅग्नेशिअम,पोटॅशिअम हे घटक असतात.कोलिन बाळाच्या मेंदूसाठी आणि मज्जातंतूंच्या विकासासाठी फायदेशीर असते आणि तसेच बाळाच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

४) सीताफळ : सीताफळ व्हिटॅमिन ए आणि सी ने समृद्ध असतात.डोळे,केस,त्वचा आणि बाळाच्या शरीराच्या टिश्यूसाठी फायदेशीर असते.हे फळ खाण्यास सांगितले जाते कारण हे फळ खाल्ल्यामुळे बाळाचे आकलन कौशल्य वाढण्यास मदत होते.

५) सफरचंद : सफरचंद गरोदरपणात खावे हे सर्वात महत्वाचे फळ आहे कारण सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते तसेच जसजसे बाळ मोठे होते तसे दमा,एक्झिमा होण्याचा धोका कमी होतो.सफरचंदामध्ये पोषणमूल्ये भरपूर प्रमाणातअसतात आणि त्यामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि डी,झिंक ह्यांचा सुद्धा समावेश असतो.

६) पेरू : पेरूमध्ये असलेल्या पोषणमूल्यांमुळे गरोदरपणात हे फळ खायलाच पाहिजे.पेरूमध्ये व्हिटॅमिन सी,इ, आयसो फ्लॅवोनाइड्स,कॅरोटेनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्स हे घटक जास्त प्रमाणात असतात.पेरू पचन होण्यासाठी  चांगले आहे आणि  तसेच बाळाची मज्जासंस्था मजबूत होते.

७) किवी :  किवी मध्ये व्हिटॅमिन सी,ई,ए,मॅग्नेशिअम,फॉलिक ऍसिड आणि पचनास आवश्यक असणाऱ्या तंतुमय पदार्थांचा समावेश आहे.किवी मुळे सर्दी खोकल्यापासून संरक्षण होते.तसेच त्यामध्ये जास्त फॉस्फरस असल्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका नसतो.तसेच लोह पोषणासाठी किवी फळाची मदत होते.

८) चिकु : चिकूमध्ये भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स,व्हिटॅमिन-ए,कर्बोदके आणि ऊर्जा असते.त्यामुळे चक्कर येत नाही आणि मळमळ देखील कमी होते.तसेच पचनक्रिया सुधारते.

९) मोसंबी : संत्री आणि मोसंबीचा पाणी न टाकता काढलेला रस गर्भवती महिलेने नियमित घेणे चांगले आहे.यामुळे बाळाच्या वाढीस मदत होते.मोसंबी पोटॅशिअमचा स्रोत आहे आणि त्यामुळे उच्चरक्तदाब कमी होण्यास मदत होते.तसेच व्हिटॅमिन सी उत्तम स्रोत आहे.

१०) द्राक्ष : आयुर्वेदात द्राक्षे ही बाळामध्ये सर्वोत्तम मानली जातात.द्राक्षांमध्ये ग्लुकोज,फ्रुकटोज,फ्लोबॅफीन, गॅलिक ऍसिड,ऑक्झॅलिक ऍसिड,पेक्टिन, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह,फॉलिक ऍसिड आणि आणखी काही व्हिटॅमिन्स असतात जसे की बी-१,बी-२ आणि बी-६ द्राक्षाचे सेवन केल्यास रक्ताचे पोषण होते आणि पोट देखील साफ राहते.