Home » फळांची साल फेकून देत असाल तर! नक्की वाचा त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी फळांच्या सालीचे आहेत ‘हे’ फायदे….
Health

फळांची साल फेकून देत असाल तर! नक्की वाचा त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी फळांच्या सालीचे आहेत ‘हे’ फायदे….

फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि आपल्या सर्वांना हे माहित देखील आहे.कदाचित याच कारणामुळे फळांचा जास्तीत जास्त आहारात समावेश करणे उचित आहे. तसे काही फळ साली सगट खाल्ली जातात तर काही फळे अशी देखील आहे त्याची साल काढून टाकली जाते.अशावेळी तुम्ही त्या फळांची साल काढून फेकून देतो.परंतु तुम्हाला माहीत आहे का आपण ह्या सालीच्या साहाय्याने आपल्या त्वचेचे सौंदर्य वाढवू शकतो.

तर आज आपण फळांच्या सालीचा त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी कशा उपयोग करावा हे सांगणार आहोत…

१) संत्र्याची साल :  त्वचा तज्ञ यांच्या मते,लिंबूवर्गीय फळे आणि त्याची साल दोन्ही व्हिटॅमिन-सी आणि कॅल्शियमने समृद्ध असतात.त्यांच्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत जे पुरळ आणि तेलकट त्वचेची काळजी घेतात.तुम्ही फेस पॅक म्हणून या फळांचे पावडर वापरू शकता.यासाठी तुम्ही संत्र्याची साले सुकवून त्याची पावडर बनवा आणि त्यामध्ये दही मिक्स करून चेहऱ्यावर हा पॅक लावावा.

२) डाळिंबाची साल : डाळिंबाची सालीमुळे आपली त्वचा अधिक तरूण दिसते.त्याच्या उपचारांच्या गुणधर्मांमुळे,ते वृद्धत्वाची चिन्हे जसे की सुरकुत्या वगैरे कमी करते,तसेच त्वचेवरील मुरुम जाण्यासाठी देखील मदत करते.तसेच, डाळिंबाच्या सालीमध्ये असलेले प्रोन्थोसायनिडिन सारखे अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या मुक्त रॅडिकल्सचे उत्पादन मर्यादित करतात.जर तुम्हाला मुरुमांची किंवा पुरळांची समस्या असेल तर तुम्ही डाळिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस किंवा गुलाब पाणी मिक्स करून हा पॅक लावू शकता.

३) केळीची साले : केळीच्या सालीचे अगणित फायदे आहेत.केळीच्या सालीमध्ये जीवनसत्त्वे ए, बी-१२, बी-६,सी, डी,मॅग्नेशियम,पोटॅशियम आणि लोह अशा अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे.तसेच केळीच्या सालीचा त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो.यासाठी केळीच्या सालीचा आतील भाग त्वचेवर घासून लावा आणि थोडा वेळ तसेच राहू द्या.त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ करावा.असे केल्याने त्वचेचे सौंदर्य वाढते.

४) सफरचंदची साल : सफरचंदच्या सालीमध्ये फ्लेव्होनॉईड नावाचा घटक असतो जो आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो.त्यात असलेले अॅसिड वजन कमी करण्यास मदत करते.यासोबत सफरचंदची साल त्वचेवर चोळल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात.

५) काकडीची साल : काकडीच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.यासोबतच यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी फायदेशीर असतात.काकडीची साल त्वचेवर चोळल्याने डाग दूर होतात.