Home » थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम जाणून घेऊया यामागील काही कारणे…
Health

थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम जाणून घेऊया यामागील काही कारणे…

आरोग्याच्या स्वच्छतेसाठी अंघोळ करणे अत्यंत महत्वाचे आहे.मंग ती गार पाण्याने असो कि गरम पाण्याने किंवा बाथटब मध्ये असो नाहीतर शॉवर खाली किंवा अगदी धावपळीने केलेली अंघोळ.अंघोळ करणे गरजेचे आहे आणि केलीच पाहिजे.परंतु रोज सकाळी अंघोळ करायची म्हंटल तर आपल्याकडे दोन पर्याय असतात थंड आणि गरम पाणी.काही जण खूप फास्ट अंघोळ करतात तर काही जणांना खूप वेळ लागतो.

काहीजणांना थंड पाण्याने अंघोळ करायला आवडती तर काहींना गरम.तर काही जणांना दिवसातुन दोन तीन वेळा अंघोळ करायला आवडते.आयुर्वेदामध्ये अंघोळीचे वेगवेगळे प्रकार आहे.पण शरीरासाठी कोणत्या पाण्याने अंघोळ केलेली फायदेशीर आहे गरम की थंड.चला तर आज आपण थंड आणि गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे जाणून घेऊया…  

थंड पाण्याने अंघोळ केल्याचे फायदे… 

थंड पाण्यामुळे झोप लागत नाही,ताजेतवाने वाटते आणि शरीराला एक वेगळीच ऊर्जा मिळते.रक्तप्रवाहावर परिणाम होतो,शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.एक्सरसाइज केल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो आणि थकवा ही दूर होतो सर्दी झाल्यावर,डोके दुखी अशी फ्लू सारखी लक्षणे असल्यास त्यापासून आराम मिळतो.

आयुर्वेदानुसार थंड पाण्याने अंघोळ केल्याने मेंदू थंड करण्यास मदत होते.आपल्या दिवसाची सुरूवात थंड पाण्याने अंघोळ केल्यास संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण जातो.तसेच थकवा जाणवत नाही शारीरिक सौंदर्य टिकून राहते.थंड पाण्याने अंघोळ केल्याने मन प्रसन्न आणि आनंदी राहते.वजन कमी करण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ केलेली उपयोगी ठरते. 

१) इम्युनिटी वाढण्यास मदत : थंड पाण्याने अंघोळ केल्यास इम्युनिटी अधिक मजबूत होते.तसेच रक्त पुरवठा चांगला होतो.इम्युनिटी लेव्हल वाढल्यास शरीरातील पांढऱ्या पेशी वाढतात.पांढऱ्या पेशी अनेक आजाराशी लढण्यास मदत करतात.त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते.फुफ्फुसांची ताकद वाढते. 

२) त्वचा उजळते : स्किन एक्स्पर्ट च्या म्हणण्यानुसार थंड पाण्याने अंघोळ केल्याने केस चांगले होतात आणि त्वचा टवटवीत आणि चमकदार होते.मुरुमाची समस्या असेल तर थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी होत नाही.थंड पाण्याने त्वचा चमकदार होते.गरम पाण्याने आपल्या त्वचेचे रोम छिद्र उघडतात. 

३) चांगली झोप : रात्री झोपण्या अगोदर थंड पाण्याने अंघोळ केल्याने तुमचा दिवसभरातील थकवा दूर होतो.तुम्हाला चांगली झोप लागते.अंघोळीच्या पाण्यात इसेंस ऑईल चा वापर केला तर अजून चांगला आराम मिळतो.झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ केली तर शरिरातील तापमान कमी होते त्यामुळे चांगली झोप येते. गर्म पाणी तुमच्या मसल्सला आराम देते. 

४) मुरुमाची समस्या : जर मुरुमाची समस्या असेल तर थंड पाण्याने अंघोळ करा गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते थंड पाण्याने चेहरा निखरतो.तसेच थंड पाण्याने केस धुतल्यास केसातील घाण निघून जाते आणि केस चमक मारते.

५) मेटाबॉलिझम  वाढते : थंड पाण्याने शरीरातील मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते त्यामुळे वजन कमी होऊ शकते.तसेच थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी होते.  

गरम पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे… 

गरम पाण्यामुळे त्वचेवरील रोमछिद्रे खुली होतात.गरम पाण्याने अंघोळ करणे म्हणजे मसाज केल्यासारखे आहे.स्नायूंवरील ताण कमी होतो आणि शरीराला आराम मिळतो.अंगदुखी पासुन आराम मिळतो.स्नायू लवचिक होतात त्यामुळे शरीरही लवचिक होते.  

गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर त्वचा कोरडी पडते तुमच्या त्वचेवर असा फरक जाणवला असेल.त्यामुळे एक्झेमासारख्या त्वचेच्या समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ करणं टाळावं.गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावावे.

रोज कामावर जाणाऱ्या,नेहमी प्रवास करणाऱ्या आणि अनेक लोकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी गरम पाण्याने अंघोळ करायला पाहिजे.सतत घाम येणाऱ्या व्यक्तींनी आणि शेतात काम करणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो गरम पाण्यानेच अंघोळ करावी.

१) चेहरा स्वच्छ राहतो : गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेवरील चिकटपणा,तेलकटपणा,घाम,धुळ आणि त्वचेवरील विषाणू दूर होतात आणि चेहरा स्वच्छ होतो.गरम पाणी शरीरामध्ये उष्णता निर्माण करते आणि थंडीपासून वाचवते त्यामुळे थंडीमध्ये गरम पाण्याने अंघोळ करणे अगदी फायदेशीर आहे.

२) थकवा दूर होतो : गरम पाण्याने अंघोळ केल्यास थकवा दूर होतोहोतो आणि स्नायू वर पडणारा ताण कमी होतो.आजारी व्यक्तीसाठी गरम पाण्याने अंघोळ करने अतिशय चांगले आहे.दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा जाणवतो आणि दिवसभराचा तणाव ही असतो त्यामुळे गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला आराम मिळतो आणि रिलॅक्स वाटते.

३) सर्दी आणि खोकला या पासून आराम : आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे शरीरासाठी गरम पाणी आणि केस व डोळ्यांसाठी थंड पाण्याचा वापर केला पाहिजे.सर्दी खोकला झाला असेल तर गरम पाण्याने अंघोळ केल्यास यापासून आराम मिळतो.गरम पाण्याच्या वाफेमुळे फुफ्फुसातील आणि श्वसननलिकेत कफ आणि सर्दी कमी होण्यास मदत होते.

४) झोप न लागणे :झोप लागत नसेल तर गरम पाण्याने अंघोळ करावी यामुळे त्वरित झोप लागते.गरम पाणी शांत झोपेसाठी सर्वश्रुत आहे.गरम पाण्याने अंघोळ केल्याने किटाणू मरतात आणि शरीर स्वच्छ राहते.   

५) शुगर लेव्हल कमी होते : गरम पाणी शरीरातील ग्लुकोजची  पातळी कमी करते त्यामुळे शुगर असणाऱ्या व्यक्तीने गरम पाण्याने अंघोळ केलेले चांगले असते.वात असणाऱ्या व्यक्तींनी गरम पाण्याने अंघोळ केली पाहिजे.