Home » थंडीमध्ये त्वचेसाठी आणि केसांसाठी गुलाबपाणी आहे अत्यंत फायदेशीर…!
Health

थंडीमध्ये त्वचेसाठी आणि केसांसाठी गुलाबपाणी आहे अत्यंत फायदेशीर…!

भारतीय सौंदर्य शास्त्र हे नेहमीच तत्कालीन अन्य संस्कृती पेक्षा प्रगत होते. नैसर्गिक घटकांचा वापर करण्यावर भारतीय सौंदर्य शास्त्र भर देते. गुलाबजल हे विविध प्रकारे सौंदर्य वृद्धीसाठी वापरले जाते. गुलाबजल, फेस पॅक मध्ये, चेहरा स्वच्छ करण्यासाठी, चेह-याला थंडावा मिळण्यासाठी वापरले जाते. गुलाबजलचे आपल्या शरीराला होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

१) गुलाब जल मध्ये एंटीऑक्सिडंट असतात.यामुळे चेहरा स्वच्छ होतो. चेह-यामधील मृत पेशी निघून जातात.चेह-यासाठी हे उत्तम क्लीनझर आहे.

२) गुलाब जल मध्ये एंट्री एजिंग गुणधर्म असतात. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो व रंग उजळतो.

३) गुलाब जल व खोबरेल तेल यांच्या मिश्रणाने मेकअप सहजपणे काढता येऊ शकतो. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो.

४) गुलाब जल हे सुगंधी असते. रासायनिक द्रव्यांनी युक्त अत्तरांना उत्तम पर्याय म्हणून गुलाबजल वापरता येते.

५) गुलाब जल हे टोनर, सिरम म्हणून तर वापरले जातात पण एस्ट्रिजंट म्हणून ही प्रभावी ठरते. गुलाबजल मूळे चेह-यावरील तेल निघून जाते.

६) गुलाब जल मुळे चेह-यावर जळजळ दूर होते. गुलाब जलच्या वापरामुळे वातावरण प्रसन्न होऊन मूड चांगला होतो.

७) गुलाब जल हे केसांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय आहे. गुलाबजल हे कंडिशनर म्हणून वापरता येते. यामुळे केसांमधील कोंडा दूर होतो व माथ्यावरील आग दूर होते.

८) गुलाब जल मधृये जखम भरुन येण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे खूप पूर्वीपासून जखमांवर उपाय म्हणून गुलाबजल‌ वापरले जाते.

९) ज्या सौंदर्य प्रसाधने पी एच पातळी ४-४.५ घ्या दरम्यान असते ती उत्पादने त्वचेला चिरतरुण ठेवतात. गुलाबजलची पी एच पातळी ४-४.५ इतकी असते. यामुळे त्वचेवरील पुरळ, लालसरपणा कमी होतो.