Home » हातात चांदीचे कडे घालणं आहे अत्यंत शुभ आणि आरोग्यासाठी देखील आहे फायदेशीर…!
Health

हातात चांदीचे कडे घालणं आहे अत्यंत शुभ आणि आरोग्यासाठी देखील आहे फायदेशीर…!

भारतीय संस्कृती मध्ये विविध प्रकारची आभूषणे दैनंदिन पणे वापरली जातात. स्त्रियांप्रमाणेच पुरुष सुद्धा काही आभूषण वापरताना आपल्याला दिसून येतात त्यामुळे अगदी सर्व साधारणपणे दिसून येणारे आभूषण म्हणजे हातातील कडे होय. अनेक पुरुषांच्या हातामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या धातूंची कडे दिसून येतात. चांदी, पंचधातू, तांबे, सोने अशा विविध धातूंपासून कड्यांची निर्मिती केली जाते. यापैकी चांदीच्या कड्यांना वापरण्यामागे नक्की काय शास्त्र आहे ते आपण जाणून घेऊया.

1) भारतीय संस्कृतीमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी मुहूर्त पाहिला जातो व अगदी शास्त्रोक्त पद्धतीने सर्व विधी केले जातात. चांदीचे कडे परिधान करण्यामागे सुद्धा मनुष्याच्या ग्रहांचा खूप मोठा प्रभाव असतो. ज्या व्यक्तींना चंद्र आणि शुक्र राशीमध्ये कमजोर आहे असे सांगितले जाते त्यांनी चांदीचे कडे अवश्य परिधान करावे असे म्हणतात कारण चंद्र हा आरोग्याशी संबंधित ग्रह असून शुक्र हा आपल्या संपत्ती धनधान्य यांच्याशी संबंधित ग्रह आहे.या दोन्हीही ग्रहांचा समतोल राखण्यासाठी चांदीचे कडे घालावे असे सांगितले जाते.

2) चांदीचे कडे घातल्यामुळे विविध प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण मिळते. तसेच जखमा भरून येण्यास ही मदत होते. चांदीचे कडे घातल्यामुळे मोबाईल किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून निघणाऱ्या किरणोत्सर्गापासूनही काही प्रमाणात बचाव होतो असे दिसून आले आहे.

3) चांदीचे कडे घातल्यामुळे शरीरातील अंतर्गत उष्णतेवर नियंत्रण मिळवता येते. शरीराचे तापमान थंड राखता येते व यामुळे झोप सुद्धा चांगली मिळते. शरीरातील उष्णता नियंत्रणात आल्यामुळे त्वचेचे आरोग्य सुद्धा सुधारते.

4) चांदीचे कडे घातल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहते व यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावरही खूप प्रभाव पडतो त्यामुळे आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता येते.

5) चांदीचे कडे ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी व शुक्रवारी या शुभ दिवशी घातले पाहिजे असे सांगितले जाते.