Home » गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना बरा होतो का ? चला तर जाणून घेऊया…
Health

गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना बरा होतो का ? चला तर जाणून घेऊया…

जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे.कोरोना दिवसेंदिवस वाढत चालला आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे.असा वेळी कोरोना पासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सुचवले जात आहे.त्यामध्ये एक म्हणजे वाफ घेणे.वाफ घेतल्याने कोरोना बरा होतो असे अनेक जणांकडून ऐकायला मिळत आहे.बदलत्या वातावरणामुळे शरीरावर परिणाम होत असतो.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आजारपणाची सगळ्यांनाच जास्त भीती वाटत आहे.कारण १ वर्ष झालं तरी सुद्धा कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबलेला नाही.कोरोना पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या जीवन शैलीत बदल करत आहे.कोरोना पासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत असली पाहिजे या साठी चांगला आहार घेतला पाहिजे,काढा पिणे,गरम पाणी पिणे,हळदीचे दूध घेणे आणि वाफ घेणे या सारखे वेगवेगळे उपाय केले जात आहे.

कोरोना व्हायरस चा संसर्ग टाळण्यासाठी स्टीम थेरेपीची क्रेझ वेगाने वाढत आहे.कोरोना व्हायरस विरुद्ध स्टीम थेरेपी खरोखर प्रभावी आहे का? या संबंधित सर्व आवश्यक गोष्टी जाणून घेऊया…

कोरोना व्हायरस ची लोकांमध्ये इतकी जास्त भीती वाढली आहे की काहीही वाचल्यानंतर व ऐकल्यानंतर लगेच त्यावर विश्वास बसतो.आणि केवळ विश्वासच ठेवत नाही तर नमूद केलेल्या गोष्टीवर अंमलबजावणी देखील करतात.वाफ घेतल्याने कोरोना विषाणूचा संसर्गच रोखू शकत नाही तर कोरोनालाही ठार मारता येते असा समज लोकांमध्ये पसरत आहे.दररोज लोक कोरोनापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी नवीन शोधात असतात.जेणेकरून या प्राणघातक विषाणूचा संसर्ग टाळता येऊ शकेल.

रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी पदार्थ आणि पेय यांच्याबरोबरच लोक आता वाफ देखील घेत आहे.वाफेच्या उष्णतेमुळे कोरोना मरेल आणि शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही असा लोकांचा विश्वास आहे.काही लोक असे म्हणत आहे की आपण १५ ते २० मिनिटे स्टीम घ्यावी.परंतु रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे किंवा जागतिक आरोग्य संघटना यांनी अजून स्टीम थेरेपी कोरोना वर उपचार आहे असे सिद्ध नाही केले.

वाफ घेतल्याने वाफ आपल्या नाकात आणि घशात जाऊन तेथे श्लेष्मा पातळ करते.यामुळे आपल्याला श्वास घेणे सोपे होते आणि आराम मिळतो.थंडीच्या दिवसात वाफ घेतल्याने आराम मिळतो कारण थंडीमध्ये योग्य प्रकारे श्वास न घेता आल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.यामुळे शरीरात जडपणा आणि ऊर्जा नसल्याची भावना होते अशावेळी वाफ घेतली तर श्वसनमार्ग खुला होतो आणि शरीरात ऑक्सिजन येतो यामुळे आपल्याला आराम मिळतो.कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकाने वाफ घ्यायला पाहिजे.

कोरोना विषाणूचा उच्च तापमानामध्ये मृत्यू होतो या समजुतीमुळे काही लोक अतिशय उच्च तापमानात वाफ घेत आहे जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.वारंवार सर्दी,खोकला येत असेल तर यावर वाफ घेणे फायदेशीर ठरते.सर्दी खोकला असल्यास डॉक्टर देखील गरम पाण्याची वाफ घेण्यास सांगतात.त्यामुळे नाक आणि घशातील श्लेष्मा पातळ होते आणि आराम मिळतो.

गरम पाण्याची वाफ घेतल्याने वाफ नाकामधून आपल्या शरीरात जाते आणि उष्णता निर्माण करते यामुळे बॅक्टरीया नष्ट होतात आणि सर्दी खोकला या पासून आराम मिळतो.याबरोबरच चेहऱ्याला गरम वाफ मिळाल्यामुळे चेहऱ्यावरील रोमछिद्रे उघडतात आणि  चेहऱ्यावरील घाण बाहेर पडते.यामुळे त्वचा हेल्दी दिसते.

वाफ घेतल्याने चेहऱ्याला होणारे फायदे…

१) चेहऱ्यावर वाफ घेतल्याने रोमछिद्रे उघडतात आणि यामुळे चेहरा स्वच्छ राहतो.रोमछिद्रे बंद झाल्यामुळे चेहऱ्याला ऑक्सिजन मिळत नाही.परंतु वाफ घेतल्याने रोमछिद्रे उघडतात आणि चेहरा निखरतो. 

२) चेहऱ्यावर ब्लॅक हेड असल्यावर वाफ घेतल्यामुळे त्वचा मऊसर होते आणि ज्यामुळे ब्लॅकहेड्स काढणे सोपे जाते आणि चेहऱ्यावरील रोमछिद्रावर अडकलेली धूळ,माती निघून जाते.

३) चेहऱ्यावर वाफ घेतल्याने ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होते.यामुळे त्वचेला ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळते आणि चेहऱ्यावर ग्लो दिसतो.

४) डेडस्कीन निघून जाण्यास मदत होते.डेडस्कीन असल्यामुळे चेहरा निस्तेज आणि सुरकुत्या पडतात त्यामुळे आधिक वयस्कर झाल्यासारखे वाटते.गरम पाण्याची वाफ घेतल्याने डेडस्कीन निघून जाण्यास मदत होते आणि त्वचा तरुण असल्यासारखी दिसते.

५) आजकाल दररोज मेकअप म्हटले तरी चालते ऑफिस,कॉलेज आणि कार्यक्रम यामध्ये उठून दिसण्यासाठी मेकअप करणे गरजेचे झाले आहे.मेकअप रीमुव्हल ने पुर्णपने मेकअप निघत नाही अशावेळी मेकअप काढण्यासाठी वाफ घेतल्याने आधिक फायदा होतो.