Home » ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास मेंदूवर होतात विपरीत परिणाम, चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन…!
Health

‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास मेंदूवर होतात विपरीत परिणाम, चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन…!

आपल्या शरीरात मेंदू हा एक प्रमुख अंग आहे. शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मेंदू निरोगी असणे आवश्यक असते. मेंदूच्या जडणघडणीत आहार मोलाची भूमिका बजावत असतो. जसे काही पदार्थ आपल्या मेंदूला हितकारक असतात अगदी त्याचप्रमाणे काही पदार्थ मेंदूला अपायकारक ठरु शकतात. या पदार्थांचे सेवन अतिरिक्त प्रमाणात केले असता मेंदूला हानी होते म्हणून आपल्या आहारात या पदार्थांचे सेवन हळूहळू कमी करावे. हे पदार्थ कोणते ते आपण जाणून घेऊया.

1) साखरेचे अतिरिक्त प्रमाण असलेले पदार्थ म्हणजे कृत्रिम ज्यूस,शितपेय ,एनर्जी ड्रिंक होय.या पेयांचे वारंवार सेवन केल्यास विस्मरण, अल्झायमर यांसारख्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच वेळीच या पेयांचे सेवन कमी करावे.

2) फ्रोजन फूड : आपण आजकाल रोजच्या आहारात फ्रोजन फूड अगदी सहजपणे वापरतो. फ्रोझन फूड मध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ असतात त्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पडतो. या पदार्थांचा पोषणमूल्य कमी असते.

3) ट्रान्स फॅट्स युक्त पदार्थ म्हणजे वेफर्स, बर्गर यांमध्ये सुद्धा तुलनात्मक दृष्ट्या पोषणमूल्य कमी असते मात्र यामुळे मेंदूशी निगडित समस्या मात्र निर्माण होऊ शकतात. ट्रान्स फॅट्स युक्त पदार्थ वारंवार सेवन केल्यास मेंदूशी निगडीत अल्झायमर व जळजळ हे आजार उद्भवतात.

4) अल्कोहोल : ज्या व्यक्ती अल्कोहोल युक्त पदार्थाचे सेवन नियमितपणे करतात त्यांच्या शरीरातील अवयवांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असलेले संदेशवहन नीट चालत नाही. मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम असलेल्या ब१या जीवनसत्त्वाची कमतरता अल्कोहोलच्या सेवनाने निर्माण होते.