Home » हातापायांना मुंग्या का येतात आणि त्या वरील काही उपाय…
Health

हातापायांना मुंग्या का येतात आणि त्या वरील काही उपाय…

कधी कधी अचानक हाता-पायाला मुंग्या येतात हा अनुभव सगळ्यांनाच असेल.एकाच जागी खुप वेळ बसल्यावर किंवा हातापायाची एखादी शिर दबल्यावर हातपाय सुन्न होणे म्हणजेच मुंग्या येणे होय. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना हा त्रास होतो.एकदा किंवा दोनदा मुंग्या येणे सर्वसाधारण आहे.पण सतत असे घडत असल्यास यावर वेळीच उपचार व्हायला हवे.मुंग्या येणे यालाच पॅराथिसिया असे म्हणतात.

तुमच्याही हाता-पायाला काहीवेळा ‍मुंग्या येत असेल? तुम्ही कधी त्यावर उपचार केला का? तुम्ही म्हणाल यावर काय उपचार करायचा हि तर सर्वसामान्य समस्या आहे.मात्र जर हा त्रास वारंवार होत असेल या समस्येवर वेळीच उपचार करणे खुप गरजेचे आहे.

तर आज आपण हातापायांना मुंग्या का येतात ते बघणार आहोत…

१) व्हिटॅमिन्स ची कमतरता : विटॅमीन-बी १२ च्या कमतरतेमुळे तुमच्या हाता पायाला नेहमी मुंग्या येवू शकतात. या व्हिटॅमिन-बी १२ च्या कमतरतेमुळे तुम्हांला थकवा जाणवतो आणि अशक्तपणा वाटू शकतो.

२) मानेची नस आखडल्यामुळे : चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे किंवा आजारामुळे जेव्हा मानेची नस आखडली जाते तेव्हा पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंत असणाऱ्या भागामध्ये मुंग्या येतात.

३) मधुमेह : जर रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढले असेल तर ते शरीरातील नसांसाठी हानिकारक ठरते.त्यामुळे हातापायांना मुंग्या येतात.

४) हायपरथायरॉईसम : तुम्हाला हायपरथायरॉईसमअसल्यामुळे थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय होतात तेव्हा त्या रुग्णांना थकवा जाणवतो अशावेळी त्यांचे वजन वाढते आणि त्याचबरोबर हातपायाला मुंग्या देखील येतात.

५) कार्पल टनेल सिंड्रोम : हा त्रास हातावर मोजण्यासारख्या क्वचित लोकांमध्ये असतो.कधी कधी सतत टायपिंग करत असल्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो.खूप वेळ टायपिंग केल्यामुळे मनगटाच्या नसा आकुंचित पावतात आणि हाताला मुंग्या येतात.फिजिओथेरपी आणि व्यायामामुळे कार्पल टनेल सिंड्रोमचा त्रास कमी होण्यास मदत होते.

हातापायाला मुंग्या आल्यावर काय करायला पाहिजे…

१) सेंधी मीठ (एप्सम सॉल्ट) : एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे नर्व्हज मधील इंफ्लेमेशन कमी होते आणि त्यामुळे मुंग्या येत नाहीत.त्यासाठी एका टबमध्ये एक चमचा एप्सम सॉल्ट टाकायचे आणि ज्या भागाला मुंग्या तो भाग  त्यमध्ये १५ ते २० बुडवून ठेवायचा.दिवसातून एकदा जरी हा उपाय केला तरी देखील खूप फरक जाणवतो.

२) मसाज :  ज्या भागात मुंग्या येतात तिथे नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज कारावे त्याने मुंग्याचे प्रमाण खूप कमी होते.मसाज केल्यामुळे नसा मोकळ्या होतात आणि त्या भागातील रक्तपुरवठा सुरळीत होतो.रक्त पुरवठा व्यवस्थित झाला की  मुंग्यांचा त्रास  कमी होतो.

३) दही : दही हा सगळ्यात सोपा उपाय आहे.नियमित थोडेसे दह्याचे सेवनामुळे मुंग्यांचा त्रास कमी होतो.दह्यामध्ये मँगनीजचे प्रमाण जास्त असल्यानमुळे रक्तपुरवठा सुधरण्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे नियमित दह्याचे सेवन केल्याने मुंग्या कमी येतात.

४) दालचिनी : दालचिनीमध्ये मँगनीज आणि पोटॅशिअम जास्त प्रमाणात असते.यामुळे रक्त पुरवठा सुधरण्यासाठी दालचिनी उपयोगी पडते म्हणूनच दालचिनी हा मुंग्यांवर अतिशय प्रभावी उपाय आहे कारण रक्त पुरवठा कमी झाल्यामुळेच मुंग्या येतात.एक चमचा दालचिनी पावडर आणि एक ग्लास गरम पाणी हे मिक्स करून रोज घेतल्यास लगेच फरक पडतो.

५) गरम पिशवीने शेकल्यामुळे : गरम पाण्याच्या पिशवीने शेकल्याने देखील रक्त पुरवठा सुधारतो.मुंग्या येणाऱ्या भागातल्या नर्व्हज शेकण्यामुळे मोकळ्या होतात त्यामुळे मुंग्यांचा त्रास कमी होतो.गरम पिशवीने ज्या भागात मुंग्या येतात त्या भागामध्ये पाच-सात मिनिटे शेकल्यानेसुद्धा मुंग्यांचा त्रास नक्कीच कमी होईल.