Home » उन्हाळ्यात डासांना कंटाळला आहात? ‘या’ ५ घरगुती उपायांनी लावा डासांना पळवून…!
Health

उन्हाळ्यात डासांना कंटाळला आहात? ‘या’ ५ घरगुती उपायांनी लावा डासांना पळवून…!

डासांचा डंक हा अत्यंत विषारी असतो.डासांमुळेमलेरिया, चिकणगुणिया आणि डेंग्यू यासारखे आजार होऊ शकतात.डासांना पळवून लावण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात.परंतु या गोष्टी वर पैसे खर्च करण्यापेक्षा घरामध्ये असणाऱ्या काहीगोष्टी पासून आपण डासपळवून लावू शकतो.चला तर मग जाणून घेऊया कोणत्या घरगुती उपायांनी आपण डास नाहिशे करू शकतो.

१) लसूण : लसणाचा वापर आपण प्रत्येक भाजीमध्ये करतो तसेच याचा उपयोग आपण डास पळवून लावण्यासाठी देखील करू शकतो.लसणाच्या काही पाकळ्या कुस्करून पाण्यात उकळा. आता एका स्प्रे बाटलीत भरा आणि खोलीमध्ये सर्वत्र शिंपडा. यामुळे खोलीत उपस्थित असलेले सर्व डास पळून जातील.

२) कॉफी : डास शक्यतो घाण पाण्यात अंडी घालू शकतात किंवा प्रजनन करू शकतात असे तुम्हाला वाटते तेथे कॉफी पावडर टाका. सर्व डास आणि त्यांची अंडी मरतील.

३)  पुदिन्याच्या सुगंधाने डासांना त्रास होतो. संपूर्ण घरामध्ये पुदिन्याचे तेल शिंपडावे किंवा बाल्कनीत पुदिनाची झाडे लावावी यामुळे डास घरापासून दूर राहतील.

४) कडुलिंबाचे तेल : तुमच्यापासून डासांनी दूर राहण्यासाठी कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळून किंवा बॉडी लोशनमध्ये मिसळून शरीरावर लावा. डास तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत.

५) सोयाबीन तेल : सोयाबीन तेल देखील डासांना तुमच्यापासून दूर ठेवते. रात्री हे अंगाला लावून झोपल्यावर डास चावू शकणार नाहीत.