Home » प्रवासादरम्यान मळमळ-उलटी होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय मिळेल त्वरीत आराम…!
Health

प्रवासादरम्यान मळमळ-उलटी होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय मिळेल त्वरीत आराम…!

जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. अनेकदा प्रवासादरम्यान लोकांना उलट्या, अस्वस्थता अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक लांबचा प्रवास टाळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्यासोबत ठेवा ज्यामुळे उलटीआणि मळमळ होणार नाही. खाली दिलेले पदार्थ उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्यांपासून आराम देऊ शकतात.

प्रवासात होणाऱ्या उलट्यांवर काही घरगुती उपाय…

१) आले : आल्यामध्ये असे गुणधर्म असतात जे मळमळ होण्याची समस्या टाळण्यास मदत करतात. आले पोटाची जळजळ कमी करतात आणि त्वरित आराम देतात. प्रवासा दरम्यान जर उलट्यांचा त्रास होत असेल, तर अदरक सोबत ठेवावे. आल्याचा चहा, आले किंवा कँडी पिऊ शकता किंवा गरम पाण्यात एक चमचे ठेचलेले आले टाकू शकता. तुम्ही लवंग ही तुमच्या बॉक्समध्ये ठेवू शकता. लवंगामुळे उलट्यांपासून त्वरित आराम मिळतो.

२) केळी : जर तुम्हाला उलटी किंवा मळमळ होत असेल तर केळी खा. केळी पोटॅशियम पुनर्संचयित करण्यात मदत करू शकतात. याशिवाय केळी खाल्ल्याने उलटीच्या समस्येपासून बऱ्याच प्रमाणात सुटका मिळते. त्यामुळे जर तुम्ही लाँग ड्राईव्ह दरम्यान उलट्या आणि मळमळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी केळी तुम्हाला मदत करू शकते.

३) लिंबू : प्रवासादरम्यान तुम्हाला वारंवार उलट्या होत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास तुम्ही लिंबू सोबत ठेवावे. लिंबू उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्यांपासून आराम देऊ शकतो. प्रवासादरम्यान नेहमी गरम पाणी सोबत ठेवा. उलट्या किंवा मळमळ सुरू होताच हे पाणी लिंबाचा रस आणि मीठ मिसळून प्यावे. काही वेळात तुम्हाला या समस्येपासून आराम मिळेल.

४) पुदिना : प्रवासादरम्यान, जर तुम्हाला उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्यांमुळे त्रास होत असेल, तर तुमच्या समस्येवर पुदिना सर्वोत्तम उपचार ठरू शकतो. पुदिना पोटात थंडावा ठेवतो आणि स्नायूंनाही आराम देतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुदिन्याच्या गोळ्या खाऊ घेऊ शकता किंवा पुदिन्याच्या पानाचे सरबत बनवूनही पिऊ शकता.