Home » तुम्हालाही बिर्याणी खायला आवडते का? जाणून घ्या बिर्याणी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे…!
Health

तुम्हालाही बिर्याणी खायला आवडते का? जाणून घ्या बिर्याणी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे…!

भारतीय व्यंजनांमध्ये विविध प्रकारच्या चमचमीत पदार्थांचा समावेश असतो व या सर्वांमध्ये अग्रस्थानी बिर्याणीचे असते.बिर्याणी शिवाय अनेकदा पार्टी, लग्न अपुरे असल्यासारखे अनेकांना वाटते. भारतामधील विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बिर्याणी बनवली जाते विशेष करून हैदराबादी बिर्याणी ही खूपच प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगभरात हैदराबादी बिर्याणी खवय्यांकडून पसंत केली जाते.

हैदराबादी बिर्याणी केवळ पार्टी व जीभेची लज्जत वाढवत नाही तर काही संशोधनांच्या आधारे हैदराबादी बिर्याणी आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. हैदराबादी बिर्याणी मध्ये मटन, चिकन, अंडी व काही भाज्यांचा समावेश असतो. हैद्राबादी बिर्याणी मुळे आपल्या शरीराला मिळणारे फायदे पुढील प्रमाणे आहेत.

1) पौष्टिक घटक- बिर्याणी मध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रथिने हे घटक खूप मोठ्या प्रमाणात असतात. बिर्याणी मध्ये असलेल्या तांदूळ या घटकामुळे शरीराला कर्बोदके मिळतात. बिर्याणी मध्ये असलेल्या काजूमुळे आपल्या शरीरात प्रथिने प्राप्त होतात.

2) बिर्याणी खाल्ल्यामुळे आपल्याला वार्धक्याच्या खुणा दूर टाळता येतात व तारुण्य टिकवून ठेवता येते असे सांगितले तर आश्चर्य वाटेल. बिर्याणीतील पदार्थां द्वारे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात सेलेनियम हा घटक मिळतो. सेलेनियम हा घटक त्वचेचे तारुण्य टिकून ठेवण्यास खूपच उपयुक्त असतो.

3) बिर्याणीची चव यामध्ये घातलेल्या मसाल्यांशिवाय अपूर्ण असते. बिर्याणी मध्ये आलं, जिरं, लवंग मिरी, दालचिनी, तमालपत्र या मसाल्याच्या पदार्थांचा वापर असतो. या पदार्थांमुळे पचनाची प्रक्रिया सुलभ होते. बिर्याणी मध्ये असलेल्या आल्यामुळे शिसारी दूर होते. खाल्लेल्या पदार्थांचे पचन उत्तम रीतीने होते तसेच आतड्यांचे कार्य ही सुलभपणे चालते

4) शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यासाठी हैदराबादी बिर्याणी मध्ये वापरले जाणारे हळद,आले ,लिंबू हे घटक उपयुक्त ठरतात.