Home » काळा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे…या आजारांवर आहे उपयुक्त…
Health

काळा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे…या आजारांवर आहे उपयुक्त…

आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला आणि ऑफीस मधील कामामुळे ताणतणावाचा सामना करावा लागतो.अशावेळी शरीरामध्ये थकवा जाणवतो हा थकवा दूर करण्यासाठी चहा किंवा कॉफीची गरज भासते.अशावेळी थकवा दूर करण्यासाठी चहा पिणाऱ्यांचे प्रमाण कॉफी पिणाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.

शरीरामधील थकवा दूर करण्ण्या सोबतच चहा पिण्याचे शरीराला आणखीही खुप सारे फायदे आहेत.चहाच्या आयोग्यदायी गुणधर्मांमुळेच चहाला अमृततुल्य असेही म्हटले जाते.चहाचे लेमन-टी, ग्रीन-टी,व्हाईट-टी,हर्बल-टी असे विविध प्रकारही आरोग्यासाठी फायदेशीर ठरत आहेत.त्यापैकीच एक चहाचा प्रकार म्हणजे ब्लॅक-टी त्यालाच आपण काळा चहा देखील म्हणतो हा चहा आरोग्यासाठी खुप फायदेशीर असल्याचे दिसून येते.

कित्येक जणांना रोज सकाळी एक कप काळा चहा पिण्याची सवय असते.दिवसाची सुरुवातच चहा पासुन केली जाते.काही जणांना तर चहा एवढा आवडतो की ते दिवसातून तीन ते चार वेळेस चहा घेतात.उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येकाला चहा प्यायला आवडतो.किटेकजनांचा समज आहे की चहा फक्त झोप मोडण्यासाठी आणि ताजेतवाने वाटावे यासाठी पिला जातो.काहीजणांना ऍसिडिटी चा त्रास असतो त्यामुळे ते काळा चहा पितात.एनर्जी वाढवण्यासाठी काळा चहा अत्यंत फायदेशीर ठरतो.

परंतु त्याचबरोबर चहा पिण्याचे आरोग्यासाठी खुप फायदे देखील आहेत.काळ्या चहामध्ये फायटोकेमिकल्स,एंटीऑक्सीडेंट्स,फ्लोराइड्स,टेनिन्स सारखे घटक असतात ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.काळा चहा पिल्याने आपण अनेक अजारांपासून दुर राहतो.तसेच काळ्याचहाचा उपयोग सौंदर्य वाढविण्यासाठी देखील होतो.

काळा चहा पिल्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात ते आपण बघणार आहोत…

१) त्वचेसाठी फायदेशीर : त्वचेला खाज येत असेल तर काळा चहा पिणे फायदेशीर ठरते.उन्हामुळे काही जणांच्या त्वचेवर लालसर डाग येतात ते दुर करण्यासाठी देखील काळ्या चहा उपयुक्त ठरतो.पायाची दुर्गंधी येत असेल तर थंड झालेला काळा चहा पायांना लावावा दुर्गंधी येणार नाही.दातांसाठी देखील काळा चहा उपयुक्त ठरतो. यामध्ये असणारे पॉलिथिन मुळे तोंडामध्ये असणारे बॅक्टेरीया नष्ट होतात.

२) हृदयविकार पासून सुटका : आजकाल खुप जणांना हृदयविकारा संबंधित समस्या आहेत.अशावेळी नियमित पणे काळा चहा घेतल्यास हृदयविकारापासून आराम मिळतो.ब्लॅक -टी घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.हृदय निरोगी राहते.

३) हाडं मजबुत होण्यासाठी : सरत्या वयामुळे हाडे ठिसूळ होतात परंतु ब्लॅक टी घेतल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.अर्थोरायटीस ची समस्या असेल तर काळा चहा पिल्याने या आजारापासून आराम मिळतो.यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आपले आरोग्य निरोगी ठेवते आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात.

४) मधुमेहापासून आराम : मधुमेह असणाऱ्या लोकांनी काळा चहा पिल्याने मधुमेह या आजारापासून बचाव होतो.नियमितपणे एक कप काळा चहा पिल्याने मधुमेहाचा धोका कमी संभवतो.नियमित काळा चहा पिल्याने साखर नियंत्रणात येते.

५) वजन कमी करण्यासाठी : काळ्या चहामध्ये असणाऱ्या मेंटबिलिसम वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.ब्लॅक-टी बरोबरच नियमित व्यायाम करणे देखील गरजेचे आहे.

६) रोगप्रतिकारशक्ती वाढते : नियमित काळा चहा पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.काही संशोधनानुसार काळ्या चहा मध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात.

७) कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवते : काही संशोधनानुसार काळा चहा पिल्यामुळे कोलेस्ट्रॉल ची पातळी नियंत्रणात ठेवते.काळ्या चहामध्ये असणारे फ्लावॅनोइड्स एलडिअल मुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी झाल्याने वजन कमी होते.

८) रक्तप्रवाह सुरळीत होतो : काळा चहा पिल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो.मेंदूतील पेशी निरोगी राहतात तसेच स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.ताणतणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते.

९) पोटाचे विकार दूर करतो : काळा चहा पिल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.पोटासंबंधीत असणारे आजार दूर करण्यासाठी काळा चहा अत्यंत गुणकारी आहे.अती सार उलटी होत असेल तर काळा चहा पिल्याने उलटी कमी होते.

१०) तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी उपयुक्त : तोंडामध्ये घाण वास येत असेल तर काळा चहा घ्यावा दुर्गंधी कमी होते.दिवसभर काहिना काही खात असल्यामुळे दातामध्ये कॅव्हिटी निर्माण होत असते.त्यामुळे ब्लॅक टी पिल्यामुळे दुर्गंधी पासून सुटका मिळू शकते.तसेच तोंडामधील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी काळा चहा पिल्याने मदत होते.

११) कॅन्सर पासून बचाव : संशोधनानुसार महिलांमध्ये होणारा ओव्हरीज कॅन्सर काळा चहा पिल्याने कमी होतो.तसेच काळ्या चहा मध्ये असणाऱ्या पॉलिथिन्स आणि कॅचेटीनमुळे कन्सरपासून बचाव होतो.