Home » ‘या’ गुणकारी भाजीचे सेवन केल्यास होऊ शकतात ३०० हून अधिक आजार दूर…!
Fashion Health

‘या’ गुणकारी भाजीचे सेवन केल्यास होऊ शकतात ३०० हून अधिक आजार दूर…!

आपल्या आहाराचा समतोल राखण्यासाठी विविध प्रकारच्या भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या आजूबाजूला हवामान, खाद्य संस्कृती इत्यादीनुसार विविध प्रकारच्या भाज्या आपल्याला आढळून येतात. यापैकी काही भाज्या या वैशिष्ट्यपूर्ण असतात. अशीच एक भाजी म्हणजे शेवग्याच्या शेंगा होय. शेवगा हा त्याची पान, शेंगा, फुलं या सर्वच प्रमाणामध्ये खाल्ला जाऊ शकतो.

शेवग्याला सुपरफुड म्हटले जाते कारण यामध्ये अनेक पौष्टिक घटक अगदी भरभरून आहेत. आपल्या पूर्वजांनीही आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या फायद्यांचा उल्लेख करून ठेवलेला आहे. भारतीय स्वयंपाक घरांमध्ये शेवग्याच्या शेंगांचा वापर करून विविध प्रकारची चविष्ट व्यंजन बनवली जातात. शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

  1. शेवग्याची शेंग ही मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी जणू काही वरदानच आहे. शेवग्याच्या शेंगेमध्ये निसर्गतः शरीरातील रक्ताच्या पातळीतील ग्लुकोजचे प्रमाण संतुलित करण्याचे गुणधर्म असतात. शरीरातील साखरेचे प्रमाण शेवग्याच्या नियमित सेवनाने जास्त वाढत नाही.
  2. शेवग्याच्या शेंगांमध्ये आवश्यक असलेले जीवनसत्व ब खूप मोठ्या प्रमाणात असते. रायबोफ्लेविन, नायसिन व ब १२ या घटकांमुळे अन्नाचे पचन खूप प्रभावीपणे घडून येते व पचन विषयक समस्या ही दूर होतात. ब जीवनसत्वामुळे आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित विघटन होऊन त्याचे पचनही योग्य प्रकारे होते. तसेच शेवग्याच्या शेंगेमध्ये तंतुमय पदार्थांचा वाटाही महत्त्वाचा असतो.
  3. शेवग्याच्या शेंगा हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या मानल्या जातात कारण शेवग्याच्या शेंगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. हे दोन्ही घटक स्नायू व हाडांना मजबूत बनवण्याबरोबरच हाडांची ठिसूळता  कमी होण्यापासूनही रोखतात.
  4. शेवग्याच्या शेंगांमध्ये रक्ताला शुद्ध करण्याचे ही गुणधर्म काही प्रमाणात असतात. शेवग्याच्या शेंगांचे सेवन नियमितपणे केले असता शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुद्धा सुरळीत होते असे दिसून आले आहे.
  5. शेवग्याच्या शेंगेमध्ये क जीवनसत्व असते ज्यामुळे श्वसन्नलिकेचा दाह होनणे किंवा एलर्जी निर्माण होणे यांसारख्या समस्यांपासून बचाव मिळतो तसेच शेवग्याच्या शेंगेमध्ये अँटिबायोटिक घटक सुद्धा असतात.
  6. शेवग्याच्या शेंगेमध्ये असलेल्या क जीवनसत्वामुळे आपल्या शरीरातील एकंदरीतच प्रतिकारक क्षमता वाढते.विशेष करून पावसाळा व हिवाळ्यामध्ये सर्दी ,खोकला, ताप यांसारखे होणारे आजार यामुळे दूर घालवले जाऊ शकतात. शेवग्याच्या शेंगेचे हे सर्व फायदे लक्षात घेतात विविध प्रकारच्या शेवग्याच्या पदार्थांचा वापर आपण आपल्या आहारात निश्चितपणे केला पाहिजे.