Home » मल्टिव्हिटॅमिन्सने भरलेल्या या भाजीचे आरोग्यासाठी आहेत खुप सारे फायदे,खास करुन वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी…
Health

मल्टिव्हिटॅमिन्सने भरलेल्या या भाजीचे आरोग्यासाठी आहेत खुप सारे फायदे,खास करुन वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी…

थंडीचे दिवस सुरु झाले की कित्येक जणांच्या घरी शेवग्याच्या शेंगाची भाजी केली जाते.लांब असणाऱ्या या हिरव्यागार शेंगा अनेकदा सांबारमध्ये टाकल्या जातात.परंतु काही कुटुंबांमध्ये शेंगांची भाजी तर करतातच परंतु काहीजण त्याच्या पानांची देखील भाजी करतात.तसेच आमटीमध्ये देखील या शेंगाचा वापर केला जातो.शेवग्याच्या शेंगामध्ये भरपुर प्रमाणात मिनरल्स आणि प्रोटीन्स असतात.त्यामुळे या शेंगांचा आहारामध्ये वापर करायला हवा.

शेवग्याला अमृत का म्हणतात?

आयुर्वेदामध्ये शेवग्याला ‘अमृत’ म्हणून ओळखले जाते.कारण या शेंगा आणि त्याची पाने ही ३०० पेक्षा जास्त आजारांवर औषध म्हणून फायदेमंद ठरतात.म्हणूनच आयुर्वेदात याला शेवग्याच्या शेंगाला ‘अमृत’ मानले जाते.शेवग्याच्या शेंगांमध्ये कार्बोहायड्रेट,प्रथिने,कॅल्शियम,पोटॅशियम,लोह,मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए आणि सी इत्यादी घटक आढळतात.भारत एक असा देश आहे जिथे मार्केटमध्ये सहजपणे भाज्या आणि फळे उपलब्ध असतात.परंतु या भाज्यांमध्ये शेवगा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

शेवग्याचा प्रत्येक भाग अत्यंत उपयुक्त आहे…

शेवग्याच्या शेंगाचा आपण भाजीसाठी वापर करतो.शेवग्याच्या झाडाचे देठ आणि मुळेच नाही तर पानांचा देखील वापर केला जातो.सांबर मध्ये देखील आपण शेवग्याच्या शेंगांचा जास्तीत जास्त वापर करतो.शेवग्यामधील पोषक घटक हवे असतील तर शेवग्याची शेंगा खाल्ल्या पाहिजे.

चला तर मग जाणुन घेऊया शेवग्याच्या शेंगा खाण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे…

१) सूज कमी होण्यासाठी मदत करते : शेवग्याच्या शेंगामध्ये एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.जेव्हा जखम झाल्यामुळे किंवा संसर्गा मुळे हातापायाला सूज येते तेव्हा शेवग्याच्या सेवनाने आराम जाणवतो.त्यामुळे शेवग्याच्या सेंगचे सेवन केल्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळते.

२) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर : रक्तातील साखरेची पातळी वाढली तर व्यक्तींना मधुमेहाचा होण्याचा धोका असतो.हे टाळण्यासाठी रक्तातामधील साखरेची पातळी नियंत्रनात असणे खुप गरजेचे आहे.यावर उपाय म्हणून आपण शेवग्याच्या शेंगांचा वापर करू शकतो.त्याच बरोबर रक्ताची कमतरता असेल तर त्यावर देखील शेवग्याच्या शेंगा उपयुक्त ठरतात.या शेंगामध्ये भरपुर प्रमाणात लोह असल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.

३) शेवग्याच्या पानांमध्ये आणि फूलांमध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होण्यास मदत मिळते.शेवग्याच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन-सी  रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

३) केसांसाठी फायदेशीर : शेवग्याच्या फुलांचे सेवन केल्यास केस गळती कमी कमी होते.तसेच नियमितपणे वापर करून केसही वाढतात. त्याचा चहा घेतल्यास केस चमकदार बनू शकतात.

४) कफ श्वास घेण्यास त्रास यावर उपाय : घशातील खवखव होणे,कफ,श्वास घेण्यास त्रास होणे या समस्या असेल तर होतशेवग्याच्या शेंगांचे सूप पिल्यास फरक पडतो.क्षयरोग,ब्रोन्कायटीस,अस्थमा यासारख्या फुफ्फुसा संबंधित असणाऱ्या समस्यांवर देखील शेवग्याच्या शेंगा उत्तम नैसर्गिक पर्याय आहे.

५) मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर : ज्यांना मधुमेहाचा त्रास  आहे त्यांनी शेवग्याच्या पानाचा रस  प्यावा.शेवग्याच्या बीन्स, साल फुले आणि पानामध्ये मधुमेहाला विरोध गुणधर्म असतात.शेवग्याच्या वापराने मधुमेहावर नियंत्रण मिळु शकतो.

६) उच्च रक्तदाब : ज्या व्यक्तींना  उच्च रक्तदाबाची समस्या असेल त्या लोकांनी शेवग्याच्या शेंगाची भाजी खावी फायदेशीर आहे.तसेच शेवग्याच्या शेंगामुळे अस्वस्थता,चक्कर येणे आणि उलटी होणे या समस्या देखील दूर होतात.

७) डोळ्यांसाठी फायदेशीर : डोळ्याच्या आरोग्यासाठी देखील शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.तसेच कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी फायदेशीर आहे.

८) सौंदर्य टिकून राहण्यासाठी : आपल्या शरीरात असणारी अनेक जीवनसत्त्वांची कमतरता शेवगा भरून काढतो.शेवग्याचे नियमित सेवन केल्यास साैंदर्य खुलवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.तसेच त्वचाविकार, थकवा जाणवत असल्यास,आणि डोळ्यांचे विकार यामध्ये शेवग्याचे नियमित सेवन करावे.

९) पचनक्रिया सुरळीत राहते : शेवग्याचे सूप पिल्यास पचनक्रिया सुरळीत राहते.तसेच सेक्शुअल हेल्थ सुधारण्यासाठी देखील शेवग्याचे सुप एक चांगला उपाय आहे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी ही फायदेमंद आहे.