Home » अनेक आजारांवर गुणकारी असणारे गुळवेल…
Health

अनेक आजारांवर गुणकारी असणारे गुळवेल…

प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये गुळवेलला अतिशय महत्वाचे स्थान आहे.गुळवेलचा उपयोग बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो.जगभरात जेव्हापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे तेव्हापासून गुळवेलला खूप महत्व प्राप्त झाले आहे.आयुर्वेदामध्ये गुळवेलला ‘अमृता’ या नावाने ओळखले  जाते.जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाले तरी देखील हि वनस्पती जिवंत राहते.भारतात सर्व भागात कुठेही हि वनस्पती सहज आढळते.गुळवेलच्या कंदाचा आणि खोडाचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो.

गुळवेल चवीला कडू,तुरट आणि थोडे गोड असते.गुळवेलच्या अनेक औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा उपयोग करतात.ताप,मधुमेह,दमा,मूळव्याध,कावीळ,सांधिवात,अशक्तपणा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर गुळवेलीचा उपयोग होतो.म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने गुळवेल खाण्याचे खूप फायदे आहेत.गुळवेल हि अनेक वर्षे टिकणारी वनस्पती आहे.गुळवेल झाडाचा आधार घेऊन वाढणारी,नेहमी हिरवीगार राहणारी वेळ आहे.

आज आपण गुळवेल पासून आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांविषयी बघणार आहोत…

गुळवेलमध्ये अँटी-ऑक्सिडंट,ग्लुकोसाइड,टेनोस्पेरिन,पाल्मरीन आणि टेनोस्पोरिक ऍसिड आणि तसेच लोह,तांबे,फॉस्फरस,जस्त,कॅल्शिअम आणि मॅग्निजचा चांगला स्रोत आहे.गुळवेलचा पानांपासून ते खोडापर्यंत वापर केला जातो.तर आज आपण गुळवेलचे आरोग्यासाठी असणारे वेगवेगळे फायदे बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया..

1) रोगप्रतिकारक शक्ती वाढते : गुळवेल हि एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे जी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.गुळवेलला अँटि-ऑक्सिडेंटचे पॉवर हाऊस म्हणून ओळखतात.गुळवेल शरीरातील टॉक्सिन बाहेर काढून टाकण्यास मदत करते तसेच रक्त शुद्ध करते.सर्दी खोकला यासह अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्ग रोगांना प्रतिबंध करते.

2) पचनक्रिया सुधारते : गुळवेलचे नियमित सेवन केल्याने पचन आणि पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या पासून आराम मिळतो.पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि आतड्यांशी संबंधित असणाऱ्या समस्यांवर गुळवेल अगदी फायदेशीर मानला जातो.गुळवेल हि वनस्पती डिटोक्सिफाईंग एजंट म्हणून देखील काम करते म्हणजे गुळवेलचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक नाश पावतात.पचन प्रणाली मजबूत बनवण्यासाठी गुळवेल मदत करते यामुळे यकृतावर ताण पडत नाही.

3) तापापासून मुक्तता : वारंवार ताप येत असेल तर गुळवेलचा वापर केला जातो,गुळवेल मध्ये खास अँटी-पायरेटिक प्रॉपर्टीज असतात त्यामुळे डेंगू,स्वाइन फ्ल्यू अशा आजारांपासून दूर ठेवतो.यासाठी गुळवेल च्या पानांचा आणि  मुळांचा वापर केला जातो.काविळचा त्रास असेल तर गुळवेल घेऊ शकता.गुळवेलची पाने,दळवी आणि एक ग्लास ताक याचा काढा करून पिल्याने ताप बरा होतो.गुळवेल आणि मध एकत्र करून घेतल्यास मलेरियाचा त्रास देखील दूर होतो.

4) वाढते वय : गुळवेल मध्ये असलेल्या अँटी एजिंग या घटकामुळे वाढत्या वयाचा प्रभाव कमी होतो तसेच सुरकुत्या पडणे आणि डार्क सर्कल्स अशा त्वचे संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते.गुळवेलचे नियमित सेवन केल्याने त्वचेवर तेजस्वीपणा येतो यामुळे वय दिसत नाही.हे सिद्ध झाले आहे कि गुळवेलचे सेवन केल्यामुळे आणि त्यामध्ये असणाऱ्या अँटी एजिंग गुणधर्मामुळे गडद काळे डाग,सुरकुत्या,मुरूम हे काढून टाकण्यास मदत होते.

5) दृष्टी सुधारते : डोळ्यांशी संबंधित असलेल्या समस्या पासून मुक्तता मिळवण्यासाठी गुळवेल अत्यंत फायदेशीर आहे.तज्ञांच्या मते गुळवेल मध्ये असणारा इम्युनोमोड्यूलटेरी गुणधर्म डोळ्यांसाठी उपयुक्त आहे.महागड्या औषधांवर पैसे खर्च करण्यापेक्षा गुळवेल खाणे फायदेशीर ठरेल.गुळवेल कॉर्निया डिसऑर्डर,मोतीबिंदू आणि स्केरलल यासारख्या समस्या देखील बऱ्या करू शकतो.गुळवेलचा रस,मध आणि सेंधा मीठ याचे मिश्रण करून डोळ्याला लावले तर फरक पडतो.

6) दम्याचा त्रास : दम्यासाठी देखील गुळवेल अत्यंत फायदेशीर आहे.दम्यामुळे येणारी ताप,खोकला,श्वास घेण्यास अडचण,अशा अनेक समस्या कमी करण्यास गुळवेल फायदेशीर आहे.यासाठी गुळवेलच्या खोडाचा रस आणि मध एकत्र घ्यावा.गुळवेलच्या सेवनाने दमा आणि खोकला या सारख्या आजारांपासून बचाव होतो आणि फुप्फुस निरोगी राहते.

7) मधुमेह नियंत्रित करतो : गुळवेल मधुमेह या आजारासाठी फायदेशीर आहे.गुळवेलमध्ये जास्त प्रमाणात हायपोग्लाइकेमिक घटक असतात ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येते.रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी डॉक्टर कित्येकदा गुळवेलचे ज्यूस घ्यायला लावतात.

8) संधिवात : गुळवेल चे नियमित सेवन केल्याने संधिवात असलेल्या अनेक रुग्णांना आराम मिळतो.गुळवेल मध्ये अँटी-आर्थरायटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी  हे गुणधर्म आहेत.डॉक्टर सांधीवात असणाऱ्या रुग्णांना गुळवेलचे पावडर दुधात मिक्स करून पिण्याचा सल्ला देतात.

गुळवेलचा काढा कसा करावा…

दोन ग्लास पाणी,आदरक,तुळसीचे पाने आणि गुळवेल हे घ्यावे.जेव्हा पाणी उकळून अर्धे होईल तेव्हा गॅस बंद करावा त्यात काली मिरी,लवंग टाकून झाकून ठेवावे 5-10 मिनिटांनी गाळून प्यावे दिवसातून एक ग्लास सेवन करावे.

गुळवेलची मूळ स्वच्छ धुवून घ्यावी.काढा करण्यासाठी 1 कप गुळवेल घेऊन त्या मध्ये 16 पॅट पाणी टाकावे.हे मिश्रण ¼ होईपर्यंत उकळावे.या काढ्याची चव कडुसर लागते.पण हा काढा अत्यंत गुणकारी आहे.

गुळवेलचे किती प्रमाणात सेवन केले पाहिजे…

गुळवेल हा शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.डॉक्टरांच्या आणि आयुर्वेदानुसार एका निरोगी व्यक्ती एका दिवसात 20 ग्रॅम गुळवेल घेऊ शकतो.गुळवेलचा काढा सकाळी उपाशीपोटी घ्यावा परंतु गुळवेल मध्ये उष्णतेचे जास्त प्रमाण असल्याने उन्हाळ्यात गुळवेलच्या काढ्याचे  अधिक प्रमाणात सेवन करू नये.

कोणत्याही विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुळवेलाचे चूर्णचे किंवा टॅब्लेटचे सेवन करू शकता.