Home » अनेक आजारांवर बहुगुणी ठरणारी वनस्पती म्हणजे अडुळसा…
Health

अनेक आजारांवर बहुगुणी ठरणारी वनस्पती म्हणजे अडुळसा…

पुरातन काळापासून आपल्याकडे वन औषधींचा वापर केला जातो.तसेच भारतातील ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.अपचन होणे,हातपाय लचकणे,सूज येणे,थकवा जाणवणे,जखम होणे अशा खुप छोट्या-मोठ्या तक्रारींपासुन आराम मिळावा म्हणून त्यावर उपचार म्हणून आयुर्वेदिक वनस्पती चा वापर केला जातो.

आजही आयुर्वेदाचे महत्व कमी झालेले नाही.त्यामुळे दररोजच्या जीवनात काही किरकोळ आजारांवर उपयोगी पडणा-या खुप साऱ्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीं आहे त्यापैकी आपण आज एका वनस्पती विषयी माहिती जाणुन घेणार आहोत... 

ती म्हणजे अडुळसा.अडुळसा या वनस्पतींची मूळ,खोड,पान,फुल आणि फळ यांचा आयुर्वेदिक औषधी मध्ये वापर होतो.या वनस्पतीच्या मुळांमध्ये आणि पानात वासिसीन नावाचे गुणद्रव्ये आहे हे द्रव्य जंतुनाशक,कीटकनाशक आहे.अडुळसा ही वनस्पती दोन प्रकारात आढळते.हिरवा आणि लाल असे दोन प्रकारात आढळते.ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

आजाराचे निदान नैसर्गिकरित्या बरे करायचे असेल तर आयुर्वेदिक वनस्पतीं खुप फायदेशीर ठरतात. त्यामधीलच एक म्हणजे अडुळसा.आपण जसजसे आधुनिक होत आहोत तसतसे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांची संख्या वाढत आहे.परंतु या सर्व आजारांवर मात करण्यासाठी आयुर्वेदाचा  वापर केला जातो.अडुळसा ही एक बहुगुणी वनस्पती आहे.खोकला,दमा,श्वसनासंबंधीत असणाऱ्या समस्या या सारख्या आजारांवर या वनस्पतीचा उपयोग केला जातो.

चला तर मग जाणून घेऊया अडुळसा ही वनस्पती आपल्या आरोग्यावर कितपत फायदेशीर ठरते…

१) श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अडुळशाच्या रसात मध मिक्स करून पिल्यास अत्यंत उपयुक्त ठरते हे नियमितपणे केल्यास श्वासाचा विकार बरा होण्यास मदत होते.

२) खोकला,ताप सर्दी यावर रामबाण उपाय म्हणून अडुळासाचा रस घ्यावा याने आराम पडतो.अडुळसा ही एक कफनाशक वनस्पती आहे याच्या पानाची गोल पुंगळी करून ओढल्यास छातीतील कफ पातळ होण्यासाठी मदत होते.

३) डोकेदुखीचा त्रास असेल तर डोक्यावर अडुळसच्या पानाचा लेप लावावा याने आराम मिळतो डोकेदुखी देखील राहते.तसेच जखम झाल्यावर त्यावर अडुळसाच्या पानाचा लेप लावल्यास जखम भरून निघते.

४) रक्तपिती झाली तर नाक आणि तोंडातून रक्त वाहत असते अशा वेळी अडुळसाच्या पानांचा लेप करून डोक्यावरती ठेवल्यास रक्त वाहने बंद होते.

५) वारंवार उलटी होत असल्यास अडुळसाच्या रसात खडीसाखर मिक्स करून पिल्यास कमी त्रास होतो आणि उलट्या बंद होतात.

६) पोटात जंत असल्यास अडुळसाच्या पानाचा रस घ्यावा उपयुक्त ठरतो.अडुळसा पोटातील जंत बाहेर पाडण्यासाठी उपयुक्त आहेत.तसेच त्वचा रोगावर देखील अडुळसा खुप उपयुक्त आहे.

७) हृदयविकार असेल तर त्यावर उपाय म्हणून अडुळसाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.त्याबरोबर रक्तशुद्धी साठी देखील अडुळसा फायदेमंद आहे.

८) आयुर्वेदानुसार ही वनस्पती कावीळ,मूत्रविकार,नेत्रविकार,दमा,पित्त कोड आणि कुष्ठरोग यांसारख्या वेगवेगळ्या आजारांवर फायदेशीर ठरते.