Home » आंब्याची पाने वरदानापेक्षा कमी नाहीत…जाणून घ्या कोणत्या आजारांवर आहेत गुणकारी…
Health

आंब्याची पाने वरदानापेक्षा कमी नाहीत…जाणून घ्या कोणत्या आजारांवर आहेत गुणकारी…

आंबा या फळाचा उपयोग फक्त खाण्यासाठीच नाही तर हे फळ विविध गुणांनीही भरलेले आहे.परंतु खूप कमी लोकांना माहित आहे की पूजेला वापरले जाणारी आंब्याची पाने आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते आंब्याची पाने अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेले आहे.या पानांमध्ये फायबर,पॅक्टिन,व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आणि व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असतात.निरनिराळ्या घटक द्रव्यांसह समृद्ध असलेल्या या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म देखील.आरोग्याच्या दृष्टिकोनातून आंब्याच्या पानामध्ये अनेक गुण दडलेले आहेत तर आज आपण ते जाणून घेणार आहोत…

चला तर मग आज आपण जाणून घेऊया आंब्याची पाने कोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात…

१) मधुमेह या आजारावर गुणकारी : धकाधकीचे जीवन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जणांना मधुमेहाचा त्रास आहे.या आजाराची संख्या लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.विशेषकरुन भारतामध्ये सर्वात जास्त मधुमेह रुग्ण आहेत.या आजारामुळे आतापर्यंत कितीतरी लोकांना प्राण गमावावे लागले आहेत.तज्ज्ञांच्या मते रक्तातील साखरेची पातळी वाढण्यामुळे मधुमेह हा आजार संभवतो.परंतु मधुमेह या आजाराला नियंत्रित करायचे असेल रक्तामधील साखर नियंत्रित करणे.मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी साखर नियंत्रणात आणण्यासाठी आंब्याच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

एका संशोधनात आंब्याच्या पानांवर रिसर्च करण्यात आला.या रिसर्च मध्ये असे आढळून आले आहे की,मधुमेहाच्या रुग्णांसाठी आंब्याची पाने एक रामबाण उपाय आहे आहेत.याचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

सकाळी उपाशी पोटी आंब्याच्या पानांचे पाणी प्यायल्याने खूप फायदा होतो.तसेच आंब्याची पाने सुकवून,त्याची पावडर तयार करुन दररोज सकाळी एक ग्लास पाण्यात आंब्याच्या पानांची पावडर पाण्यात मिसळून उपाशी पोटी घेतल्यास.मधुमेह असणाऱ्या रुग्णांना बराच फरक पडतो.

२) पोटासंबंधित समस्यांवर रामबाण उपाय : पोटाशी संबंधित असणाऱ्या समस्यांसाठी आंब्याची पाने खुप फायदेशीर आहेत.यासाठी आंब्याची पाने गरम पाण्यात रात्रभर भिजू घालावीत.सकाळी ते पाणी गाळून उपाशी पोटी प्यावे.रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर आहे.

३) उचकी वर प्रभावी : मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा अचानक केव्हाही उचकी सुरू होते.अशावेळी परंत आंब्याच्या पानांचा धूर श्वासोच्छवासाने घेतल्यास उचकी पासुन आराम मिळतो.परंतु धूर घेत असताना आतमध्ये जास्त धूर न घ्यावा याची काळजी घ्यावी.

४) भाजलेली जखम भरते : स्वयंपाकघरात काम करत असताना अचानक गरम तेलाचा किंवा गरम पाण्याचा थेंब आपल्या अंगावर पडला असेल यामुळे जळजळ होते आणि त्याजागेवर जखम देखील होते यावर उपाय म्हणून आंब्याच्या पानाची राख लावावी.यामुळे वेदना कमी होतील आणि जखमही लवकर बरी होते.

५) श्वसनासंबंधित समस्यावर फायदेशीर : आंब्याची पाने श्वसनाच् संबंधित असणाऱ्या सर्व समस्यांसाठी उपायकारक आहे.आंब्याची पाने आणि मध पाण्यात उकळवूनत्याचा एक काढा बनवा.हा काढा घेतल्याने खोकला,सर्दी,ब्राँकायटिस आणि दम्याच्या हे आजार असणाऱ्या रूग्णांना आराम मिळतो.

६) कानदुखी पासून आराम : कानात वेदना होत असेल,कानात मळ झाला असेल अशावेळी आंब्याची पाने या आजारापासून आपला बचाव करू शकतात.आंब्याची पाने बारीक करून त्यामधील रस काढुन तो कोमट गरम करून घ्यावा त्यामधील दिन-तीन थेंब कानात टाकावी असे केल्याने कानाच्या वेदना कमी होतात.

७) रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी : आंब्याच्या पानामध्ये हायपरटेन्शन गुणधर्म असतात जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.हे शरीरातील रक्तवाहिन्या बळकट बनवण्याचे कार्य करते उच्च रक्दाब असणाऱ्या रुग्णांनी आंब्याच्या पानापासून बनवलेला चहा घ्यावा फायदेशीर ठरतो.याने रक्तदाब कमी होतो आणि रक्तवाहिन्या मजबूत होतात.