Home » कानदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी करा हे ‘२’ घरगुती उपाय…!
Health

कानदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी करा हे ‘२’ घरगुती उपाय…!

निरोगी आरोग्यासाठी शरीर स्वच्छ ठेवणे खूप आवश्‍यक असते. शरीराच्या इतर अंगा बरोबरच कानाची सफाई नित्यनेमाने करणे खूप आवश्यक असते .कान हा आपल्या शरीरातील अतिशय संवेदनशील असा अवयव आहे. धूळ, प्रदूषण किंवा आंघोळीच्या वेळी कानांमध्ये पाणी गेले असता कानाला इजा पोहोचते. धूळ ,प्रदूषण किंवा कानामध्ये पाणी गेले असता कानामध्ये मळ साठतो व यामुळे आपल्याला ऐकू कमी येते किंवा कानामध्ये वेदना होतात.

या सर्व त्रासांपासून बचाव होण्यासाठी कानाची दैनंदिन तत्वावर सफाई केली गेली पाहिजे. कानाची सफाई करण्यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय आपण अवलंबू शकतो. कानाची स्वच्छता राखण्यासाठी केले जाऊ शकणारे काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. बदिम किंवा सरसों तेलाचा वापर करून अतिशय सहजपणे कानातील मळ काढला जाऊ शकतो.

यासाठी सरसोचे तेल किंवा बदामाच्या तेलाचा वापर करावा‌.सरसोचे तेल कानातील मळ काढण्यासाठी जास्त प्रभावशाली ठरते. मिठाचे पाणी- मिठाचे पाणी वापरून कानामधील मळ अगदी सहजगत्या काढता येणे शक्य असते. मिठाच्या पाण्यामुळे कानामधील मळ मऊ होतो व तो सहजपणे काढला जाऊ शकतो. यासाठी एक चमचा मीठ अर्धा कप पाण्यामध्ये हे पाणी गरम करून मिसळावे.

मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत पाणी ढवळत राहावे व यानंतर हे मिठाचे पाणी कापसाच्या बोळ्याला बुडवून कानामध्ये पिळावे व साधारण तीन ते पाच मिनिटे त्याच स्थितीमध्ये रहावे. हीच कृती दुसऱ्या कानाच्या बाबतही करावी व यानंतर कापसा द्वारे कानाच्या बाहेर आलेला मऊ झालेला मळ काढून घ्यावा.

  1. पुदिना : कान दुखत असल्यास पुदिन्याच्या रसाचे काही थेंब कानात घालावे.
  2. लसूण : लसूण हा अतिशय गुणकारी आहे. कानात वेदना होत असतील तर तेलात लसूण गरम करून या तेलाला थंड करून कानात काही थेंब टाकल्यास आराम मिळतो.