Home » तुमच्या देखील पोटात जंत झाले का? मंग करा ‘हे’ घरगुती उपाय एका रात्रीत जाणवेल फरक…!
Health

तुमच्या देखील पोटात जंत झाले का? मंग करा ‘हे’ घरगुती उपाय एका रात्रीत जाणवेल फरक…!

जर आपल्याला कधी पोटामध्ये जंतांचा त्रास जाणवला असेल तर जंता मुळे होणाऱ्या वेदना सुद्धा न विसरणा-या असतात.पोटातील जंत शरीराबाहेर घालवण्यासाठी मेडिकल मध्ये अनेक प्रकारची औषधे सध्या अगदी सहजपणे उपलब्ध असतात.या औषधांचे काही साईड इफेक्ट सुद्धा असतात.पोटातील जंत नाहीसे करण्यासाठी काही घरगुती उपाय सुद्धा वापरले जाऊ शकतात.पोटामध्ये असणारे जंत हे प्रामुख्याने आतड्यांमध्ये असतात.

यामुळे प्रचंड अशा त्रासाला सामोरे जावे लागते.भूक न लागणे,वजन कमी होणे,डायरिया,उलट्या किंवा शिसारी येणे,पोटामध्ये सतत दुखणे,सतत कफचा त्रास होणे या लक्षणांद्वारे पोटामध्ये जंत झाले आहेत की नाही हे जाणून घेता येऊ शकते.पोटामध्ये जंत होण्याची ही समस्या मुख्यत्वे कच्चे मांस खाणे,दूषित पाणी पिणे किंवा अस्वच्छता यामुळे होऊ शकतात.आज आपण पोटातील जंत घालवण्या साठी वापरले जाणारे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

१) कच्ची पपई : हा अतिशय सहजपणे उपलब्ध होणारा व प्रभावी उपाय आहे.एक ग्लास भर गरम दुधामध्ये एक टेबलस्पून कच्ची पपईचा गर व एक टीस्पून मध मिसळून व्यवस्थित हे मिश्रण एकत्र करावे.हे मिश्रण रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी सेवन करावे.एक आठवडाभर सातत्याने हा उपाय केला असता पोटातील जंताची समस्या दूर होण्याचा अनुभव येतो.

२) हळद : हळदीचे औषधी गुणधर्म सर्वांनाच माहिती आहेत.हळदीमध्ये असलेल्या ऑंटी सेप्टीक आणि एंटी मायक्रोबियल गुणधर्मांमुळे हळदीच्या सेवनाने कोणत्याही प्रकारचे जंत पोटा मधून बाहेर पडू शकतात.त्यासाठी एक ग्लास भर ताकामध्ये हळद मिसळून हे मिश्रण दररोज सेवन करावे यामुळे पोटातील जंत निश्चितपणे शरीराबाहेर पडतात.

३) भोपळ्याच्या बिया : भोपळ्याच्या बियांमध्ये शरीरातील जंत मारून टाकण्याचे गुणधर्म असतात.भोपळ्याच्या बियांना भाजून घ्यावे व पाणी व नारळाचे दूध यांच्या मिश्रणामध्ये या बिया घालून दररोज सकाळी सेवन करावे.यामुळे शरीरात असलेले कोणत्याही प्रकारचे जंत शरीरा बाहेर पडतात.

४) कडुलिंब पाने : कडुलिंबाची पाने ही विविध प्रकारच्या आजारांवर अतिशय गुणकारी ठरतात असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे.शरीरातील जंत दूर करण्यासाठी सुद्धा कडूनिंबाच्या पानांचा वापर केला जातो.यासाठी कडुनिंबाच्या पानांची वाटून चांगली पेस्ट करावी व सकाळी अर्धा टीस्पून पेस्ट पाण्यासोबत घ्यावी. असे काही दिवस सातत्याने केले असता निश्चित जंता ची समस्या दूर होते.

५) लसूण : लसणाच्या सेवनाने सुद्धा जंता ची समस्या दूर केली जाऊ शकते.लसणामध्ये एंटी इनफ्लेमेटरी,अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे जंत दूर केले जाऊ शकतात.यासाठी लसणाची एखादी पाकळी दररोज व्यवस्थित चावून सेवन करावे.

६) नारळ : नारळ हे जंत या विकारावर अतिशय गुणकारी ठरणारा उपाय आहे.दररोज सकाळी आपल्या नाश्त्यामध्ये किसलेले खोबरे खावे व साधारण एक तासानंतर कोमट दुधामध्ये थोडेसे खाण्यालायक असलेले एरंडेल तेल मिसळून हे दूध प्या.वे हे मिश्रण शरीरातील जंत बाहेर पडण्यास मदत करते.

७) लवंग : यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात.ज्यामुळे शरीरातील जंत निघून जातात व पोट साफ होते.या साठी एक  कपभर पाण्यामध्ये तीन ते चार लवंगा टाकून मिश्रण चांगले उकळून घ्यावे व गाळून याचे आठवड्यातून तीन ते चार वेळा सेवन करावे.

८) गाजर : गाजर हा बीटा कॅरेटिन चा खूप उत्कृष्ट असा स्त्रोत आहे. गाजराच्या सेवनामुळे शरीरातील सर्व प्रकारचे जंत निघून जातात.सकाळी उठल्यावर अनाशा पोटी गाजराचे सेवन केल्यामुळे जंतांची समस्या दूर होते.