Home » चष्म्यामुळे चेहऱ्यावर पडणारे डाग दुर करण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करून बघा…
Health

चष्म्यामुळे चेहऱ्यावर पडणारे डाग दुर करण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करून बघा…

हल्ली खुप जण चष्म्याचा वापर करतांना दिसतात.काही जणांना डोळ्यांच्या समस्येमुळे चष्मा लागलेला असतो तर काही जण फक्त फॅशन म्हणून चष्मा वापरतात.मात्र नियमितपणे चष्मा वापरल्यामुळे नाकावर डाग पडतात.हे डाग डोकेदुखी चे कारण ठरतात.कित्येक उपाय करुन देखील हे डाग दुर होत नाही.मार्केटमधील महागड्या क्रीम्स वापरून देखील हे डाग जात नाहीत.

म्हणून आज आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत जे तुम्ही सहजपणे करू शकता. आणि त्यांनी डाग देखील दूर होतील…

१) मध : मध हा चष्म्याच्या खुणा कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.डाग असलेल्या ठिकाणी मधाचे काही थेंब लावा.मध आणि लिंबू मिक्स करुन देखील लावू शकता.मुलतानी मातीचा वापर केल्याने देखील चेहरा उजळतो आणि डाग देखील कमी होतील.

२) बटाटा : त्वचेसाठी आवश्यक असणारे गुणधर्म बटाट्यामध्ये असतात.त्यासाठी कच्च्या बटाट्याची साल काढावी व त्याचा रस १५ मिनिटांपर्यंत चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा.आठवड्यातून ३ ते ४ वेळा असे नियमितपणे केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील.

३) कोरफड : चेहऱ्यावर कोरडफड लावण्यापूर्वी अगोदर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.नंतर कोरफड जेल डोळ्याच्या आजूबाजूला गोलाकार फिरून लावावे असे केल्यामुळे चष्म्याच्या वापरामुळे पडलेले डाग निघून जाण्यास मदत होते.

४) गुलाबजेल : चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी गुलाब जेलचा उपयोग करता येतो.कापसाच्या मदतीने गुलाब जेल चेहऱ्यावर लावा.गुलाबजेल काही वेळ चेहऱ्यावर ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाकावा असे केल्यामुळे डाग कमी होतील.

५) टोमॅटो : व्हिनेगर आणि टोमॅटोच्या साहाय्याने डाग कमी होण्यास मदत होते.परंतु हे पदार्थ त्वचेवर लावताना विशेष काळजी घ्यावी.फक्त जिथे डाग असेल त्याच ठिकाणी लावावे. चेहऱ्याच्या इतर ठिकाणी लावू नये.नियमित हे पदार्थ डागांवर लावावे आणि सुकल्यानंतर धुवून टाकावे असे केल्यास लगेच फरक जाणवतो.

६) संत्र्याची साल : सुकलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर बनवावी.ही पावडर आणि त्यामध्ये थोडेसे दूध याची पेस्ट करून ही पेस्ट डागांवर लावावी.१०-१५ मिनिटांनी सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून काढावा.