Home » डोळ्याची दृष्टी वाढवण्यासाठी करावे या पदार्थाचे सेवन…
Health

डोळ्याची दृष्टी वाढवण्यासाठी करावे या पदार्थाचे सेवन…

शरीरातील इतर सर्व महत्वाच्या अवयवांप्रमाणेच डोळे हा देखील खुप महत्वाचा अवयव आहे,ते म्हणतात ना की डोळे नसतील तर हात-पाय बंद असल्यासारखे वाटते! ही गोष्ट मात्र बरोबर आहे.जर डोळेच नसतील तर आपण काही बघू शकणार नाही.त्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहणे देखील अत्यंत गरजेचे आहे.

प्रदूषण आणि धुळीमुळे डोळ्याच्या आरोग्यावर परिणाम होतो.त्यामुळे कमी वय असतानाच काही लहान मुलांना देखील चष्म्या लागतो.त्यामुळे डोळ्याचे आरोग्य जपणे खूप महत्वाचे आहे.

जसेकी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक असते.तसेच डोळ्याच्या आरोग्यासाठी देखील योग्य आहार घेणे गरजेचे आहे जर आपण पोषक आहार घेतला तर यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगले राहील. 

तर आज आपण डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थाचे सेवन केले पाहिजे हे बघणार आहोत…

१) ब्रोकोली : ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे ब्रोकोली डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.व्हिटॅमिन-ए हे दृष्टी वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.ब्रोकोली ही सॅलड मध्ये खाऊ शकतो.

२) गाजर : गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असल्यामुळे गाजर हे डोळ्यांसाठी निरोगी आहे. बीटा कॅरोटीन हे दृष्टी वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गाजराबरोबरच संत्री आणि लिंबू हे देखील बीटा-कॅरोटीनचे चांगले स्त्रोत आहेत ज्यामुळे डोळ्याची दृष्टी सुधारण्यास मदत मिळते.

३) पालक : पालक मध्ये असणाऱ्या पोषक घटकामुळे पालक ला सुपरफुड असे म्हंटले जाते.त्यामध्ये व्हिटॅमिन ए,बीटा कॅरोटीन, ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन सारखे कॅरोटीनोइड्स असल्यामुळे पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य वाढते आणि डोळ्याच्या मोतीबिंदू सारख्या रोगांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते..

४) बेरी : बेरी डोळ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण त्यात व्हिटॅमिन-सी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण अँटिऑक्सिडेंट असतात.

५) रताळे : गाजरांप्बरोबरच रताळ्यामध्ये देखील बीटा कॅरोटीन असते.तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि फायबर देखील असते.ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते आणि डोळ्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.

६) संत्री : दररोजचा आहार आणि जीवनशैली याचा आपल्या संपूर्ण आरोग्याबरोबर डोळ्याच्या आरोग्यावरही परिणाम होतो.पौष्टिक आहार आणि निरोगी जीवनशैलीमुळे आपल्या डोळ्याच्या आरोग्य चांगले राहते त्यामुळे संत्री खाल्ल्याने डोळ्यासंबंधित असणाऱ्या समस्या जसे मोतीबिंदू दूर करतो.

७) आवळा : आवळ्याचा उपयोग केस वाढवण्यासाठी तर होतोच परंतु त्याच बरोबर डोळ्याच्या आरोग्यासाठी देखील होतो.आवळ्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट डोळ्याचा पडदा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.यामुळे डोळ्याची दृष्टी देखील चांगली राहते.