Home » हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा…
Health

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा…

शरीरामध्ये लोह,फॉलिक ऍसिड आणि विटमिन-बी या घटकांच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची लेव्हल कमी होते.त्यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवतो.शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास एनेमिया सारखा आजार देखील होऊ शकतो.अस्या समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची लेव्हल योग्य ठेवणे गरजेचे आहे.

मानवी शरीरात लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते.रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी हिमोग्लोबिन आवश्यक असते.हिमोग्लोबिन म्हणजे हिम म्हणजे लोह आणि ग्लोबीन म्हणजे प्रथिने होय.शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वयानुसार आणि लिंगानुसार असते.नवजात शिशूमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण १७ ते २२ एवढे असू शकते.लहान मुलांमध्ये  हिमोग्लोबिनचे प्रमाण ११ ते १३ असायला पाहिजे.प्रौढ वयाची महिलांमध्ये १२ ते १६ तर पुरुषांमध्ये १४ ते १८ असे हिमोग्लोबिनचे प्रमाण असायला हवे.

मात्र प्रत्येकाच्या आहारानुसार हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी-जास्त होण्याची शक्यता असते.हिमोग्लोबिनचे प्रमाण स्टेबल असण्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे असते.हिमोग्लोबिन कमी झाल्यावर आपण घरच्या घरी हिमोग्लोबिनची पातळी वाढवू शकतो.तर आज आपण घरगुती उपायांनी हिमोग्लोबिनची पातळी कशी वाढवू शकतो हे बघणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया हिमोग्लोबीन वाढवण्यासाठीचे घरगुती उपाय…

१) व्हिटॅमिन-सी ची कमतरता : वेगवेगळ्या फळभाज्यांमधून नैसर्गिक पद्धतीने व्हिटॅमिन-सी मिळते.नियमित आहारामध्ये संत्री,द्राक्षे,लिंबू,ब्रोकोली,पेरू,किवी आणि आंबा या फळांमधून व्हिटॅमिन-सी मिळते.हिमोग्लोबिन कमी असल्यास वाढवण्यासाठी या फळांचा आहारामध्ये समावेश करावा.

२) फॉलिक ऍसिड : फॉलिक ऍसिड च्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची लेव्हल कमी होते.त्यामुळे हिमोग्लोबिनची लेव्हल सुरळीत ठेवण्यासाठी आहारामध्ये फॉलिक ऍसिडचा समावेश करणे फायदेशीर ठरते.लोहाच्या निर्मितीसाठी फॉलिक ऍसिड मदत करते यासाठी  हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पालक,तांदूळ,शेंगदाणे,चवळी,ऍव्होकॅडो,डाळ,बदाम,कोबी,केळी यांचा आहारामध्ये समावेश करावा.

३) लोह : ज्यांना हिमोग्लोबिनची पातळी वाढवायची त्यांनी लोहयुक्त आहार घ्यावा यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत होते.मटण,मासे,सोयाबीन,बिट,अंडे,गाजर,हिरव्या पालेभाज्या,सुकामेवा या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा यामुळे लोहाचं पातळी वाढू शकते.

४) व्यायाम : आपण खाल्लेले अन्न शरीरामध्ये शोषले गेले पाहिजे.नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची हालचाल होते आणि त्याचा परिणाम पूर्ण आरोग्य व्यवस्थेवर होतो त्यामुळे सकाळी नियमित व्यायाम केला पाहिजे.यामुळे शरीर सुदृढ आणि निरोगी राहते.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणती फळे खावीत… 

१) बिट : बीटमध्ये फॉलिक ऍसिड चे प्रमाण भरपूर असते.हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बीटचा आहारामध्ये समावेश करावा.बिट खाल्ल्याने व्हिटॅमिन-सी आणि लोह मिळते.त्यामुळे डॉक्टर हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बिट खाण्याचा सल्ला देतात.

२) डाळिंब :  डाळिंबामध्ये लोह,प्रोटीन आणि इतर व्हिटॅमिन्स असतात.ज्यामुळे अशक्तपणा आणि  थकवा जाणवल्यास डाळिंब खावे यामुळे आराम मिळतो तसेच डाळिंब त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे.

३) सफरचंद : सफरचंदामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे सफरचंद शरीराला पुरेसे लोह मिळते  म्हणून हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी नियमित सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो.

४) खजूर : सुकलेले किंवा ओले कोणतेही असो खजूर  आहे त्यामुळेच खजुरला सुपरफूड असे देखील म्हणतात.खजूरमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते.