Home » …म्हणून नाडी परीक्षा केली जाते, जाणून घ्या या माघील ५ महत्वाची कारणे.
Health

…म्हणून नाडी परीक्षा केली जाते, जाणून घ्या या माघील ५ महत्वाची कारणे.

आपल्या हातावरील नाडीच्या आधारे शरीराची तपासणी करण्याचे खूप प्राचीन आयुर्वेदिक शास्त्र आहे.नाडी परीक्षणा आधारे कोणत्याही शारीरिक व्याधी,हार्मोनल असमतोल, मानसिक आजार यांचे निदान अगदी अचूकपणे केले जाऊ शकते.नाडी परीक्षा हे एक जुने शास्त्र असून या द्वारे कोणत्याही प्रकारच्या आजाराचे किंवा व्याधीचे केवळ निदान व लक्षणे सांगितली जात नाही तर आजाराचे मूळ सुद्धा शोधले जाऊ शकते. नाडी परीक्षण हे राजे रजवाड्यांपासून प्रचलित आहे. नाडी परीक्षेद्वारे शारीरिक आणि मानसिक आजारांचे व शरीरात निर्माण होणाऱ्या विविध संप्रेरकचे परीक्षण केले जाते. भारतीय आयुर्वेदामध्ये वापरले जाणारे नाडी परीक्षा हे प्रमुख तंत्र आहे व नाडी परीक्षण का केले जाते व यामागची कारणे काय आहेत हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत.

नाडी परीक्षणासाठी आपल्या हाताच्या मनगटावरील नस , मध्य बोट व तर्जनी यांचा वापर केला जातो. यांच्याद्वारे शरीरातील वात, पित्त व कफ या दोषांचे परीक्षण केले जाते. या परीक्षणाद्वारे केवळ   नाडीची स्थिती कळत नाही तर शरीरातील धमन्यांमधून प्रसारित होणारे रक्त व दोषांचे सुद्धा परीक्षा केले जाते . नाडी परीक्षा हे शरीरातील नाडी, शिरा, धमन्या रक्तवाहिन्या यांच्याद्वारे पुरवल्या जाणाऱ्या शारीरिक आणि जैविक संदेश वहनाला विशिष्ट ठिकाणावरून परीक्षण केले जाते.नाडी परीक्षण द्वारे केवळ शरीरातील दोष किंवा आजाराचे लक्षण असेल तर त्याचे मूळ ठिकाण शोधण्यासाठी मदत मिळते.

1) भविष्यामध्ये आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकणाऱ्या दोष किंवा आजाराविषयी सुद्धा माहिती नाडी परीक्षा मधून मिळू शकते. आपल्या शरीरामध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या प्रकृतीच्या आधारे शरीराची घ्यावयाची काळजी सुद्धा निश्चित केली जाऊ शकते.

2) शरीराची सद्य  स्थिती त्यामधील विविध अवयवांच्या कार्यक्षमता व प्रकृतीविषयी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यसाठी एक विशिष्ट आराखडा नाडी परीक्षण आधारे तयार केला जाऊ शकतो. मधुमेह, हायपर टेन्शन, रक्तदाब या समस्या विविध त्वचा विषयक समस्या आणि मानसिक समस्या इत्यादींवर नाडीपरीक्षा द्वारे परिक्षण व उपाय केले जाऊ शकतात.

3) नाडी परीक्षण क्षेत्रातील तज्ञ शरीरातील नाडीच्या परीक्षणाद्वारे योग्य तो दोष आपल्या या शरीरात संतुलित स्वरूपात आहे की नाही हे तपासून कोणत्या आरोग्यविषयक समस्या ची शक्यता आहे हे अगदी अचूकपणे सांगू शकतात. आपल्या शरीरामध्ये प्रामुख्याने वात ,पित्त व कफ हे दोष असतात. वाताचा संबंध शरीरातील वायूशी असतो तर पित्त हे अन्नपचनाशी निगडित असते. यांपैकी कोणत्याही दोषांचे असंतुलन झाले असता निश्चितच पचन विषयक किंवा वायु विषयक समस्या निर्माण होतात.

4) नाडीपरीक्षण हे सकाळच्या वेळी केले असता अधिक फायदेशीर असते असे सांगितले जाते.

5) नाडीपरीक्षण पद्धतींमध्ये स्त्रियांच्या डाव्या हाताच्या नाडी चे परीक्षण केले जाते तर पुरुषांच्या उजव्या हाताच्या नाडी चे परीक्षण केले जाते. यामागे भगवान शिवाच्या अर्धनारी नटेश्वर रूपाचा आधार घेतला जातो त्यामध्ये भगवान शिवाने अर्धे शरीर स्त्री-पुरुषाचे धारण केले होते.