Home » शिंक का येते? शिंक येण्यामागे देखील आहे ‘हे’ शास्त्रीय कारण…!
Health

शिंक का येते? शिंक येण्यामागे देखील आहे ‘हे’ शास्त्रीय कारण…!

मानवी शरीर हे एक असामान्य अशी निर्मिती आहे.मानवी शरीरातील प्रत्येक अवयव आपले काम अगदी चोखपणे पार पाडत असतो. बाहेरच्या वातावरणात समायोजन करताना काही क्रिया आपोआप शरीराकडून घडत असतात. यापैकी एक क्रिया म्हणजे शिंकणे होय. शिंक येते ही शरीराकडून ब-याचदा घडणारी  साधारण क्रिया आहे.सर्दी ,पडसे झाले असता शिंक हमखास येते.यामध्ये चिंता करण्यासारखे काही नाही. शिंक का येते यामागची काही कारणे आपण जाणून घेऊया.

१) शिंक येण्यामागे प्रमुख कारण आहे नाकामध्ये धूळ,कचरा किंवा तत्सम पदार्थाचा झालेला शिरकाव‌ होय.या बाहेरील‌ पदार्थांचा शिरकाव झाल्यानंतर नाकातील संरक्षणासाठी असलेल्या सूक्ष्म केसांमध्ये‌‌ हालचाल होऊन शिंक येते.शिंक आल्यामूळे हे पदार्थ नाकातून बाहेर पडतात.

२) सर्दी किंवा पडसे झाले असता जंतू संसर्गामुळे शिंक येते.शिंक येते हे एका अर्थी आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच आहे.

३) मात्र काही व्यक्तींना वारंवार शिंका येतात.कोणत्याही बाह्य घटकाच्या आक्रमणाशिवाय  किंवा‌ आजारी नसताना‌ वारंवार शिंका येणे हे एलर्जीचे प्रमुख लक्षण आहे.अशा परिस्थिती मध्ये वैद्यकीय सल्ला घ्यावा.

४) काही वेळा वातावरणातील तापमान,हवामान,रात्र दिवस इत्यादी घटकांमूळेही शिंक उत्पन्न होते.जसे की गार हवेची झुळूक किंवा अचानक सुर्यप्रकाशाकडे पाहिले असतानाही शिंका येतात.