Home » कमी पाणी पिल्यामुळे शरीराला भोगावे लागतील ‘हे’ परिणाम…!
Health

कमी पाणी पिल्यामुळे शरीराला भोगावे लागतील ‘हे’ परिणाम…!

शरीराच्या निरनिराळ्या कार्याला पार पाडण्यासाठी पाणी हे खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.पाणी हे आपल्या एकंदरीत चांगल्या आरोग्यासाठी खूपच आवश्यक घटक आहे.माणसाचे 60 टक्के शरीर हे पाण्याने बनलेले असते त्यामुळे आपल्या शरीरातील पेशींना ऊर्जा पुरवण्यासाठी आणि पर्यायी सर्व अवयवांचे कार्य उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी शरीरातील पाण्याचा समतोल राखणे महत्त्वाचे ठरते.शरीराचे कार्य सुरळीतपणे पार पडण्यासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता असते.

पाण्याची गरज भागवण्यासाठी असेही काही पदार्थ असतात ज्यामध्ये पाण्याचा अंश असतो जसे की काकडी,टोमॅटो,कलिंगड इत्यादी‌.मात्र काही व्यक्ती पाण्याचे किमान सेवन करणे सुद्धा टाळतात त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.अल्कोहोलच्या अतिवापरामुळे सुद्धा शरीरातील पाण्याचा अंश कमी होऊन डीहायड्रेशन ची समस्या उद्भवते.डिहायड्रेशन मुळे नक्की शरीराला काय तोटे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

१) जेव्हा आपल्या शरीरा मध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते व डिहायड्रेशन होते तेव्हा आपल्याला शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता जाणवते.शरीरातील उर्जेमुळे आपले मन आणि मेंदू सतर्क राहतात आणि आपल्या शरीराचा समतोल राखला जातो. यामध्ये योग्य प्रमाणात पाणी पीत नसलो तर दुपारच्या वेळी विशेष करून आपल्याला खूप थकवा जाणवतो.आपले कोणतेही काम पूर्ण करण्याचा कंटाळा येतो म्हणूनच आपल्या सोबत नेहमी पाण्याची बाटली बाळगावी जेणेकरून आपल्याला सातत्याने पाणी पिण्याची आठवण होईल.

२) आपला मेंदू हा 80% पाण्याने बनलेला आहे.त्यामुळेच मेंदूला कार्यक्षम राखण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता असते.जेव्हा शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते तेव्हा आपल्या मेंदूची कार्यक्षमता कमी होते व एक प्रकारचा मानसिक थकवा निर्माण झाल्याची भावना निर्माण होते.म्हणूनच जेव्हा तुम्हाला मानसिकदृष्ट्या अस्थिर वाटत असेल किंवा विचार करता येत नसतील तेव्हा थोडेसे पाणी पिऊन पहावे.

३) डिहायड्रेशन मुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता असते म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी पिणे खूप आवश्यक असते जेणेकरून ह्रद्याचे कार्य सुरळीतपणे चालेल.

४) ज्या व्यक्ती पाणी कमी पितात व ज्यांना डीहायड्रेशन चा त्रास आहे त्या व्यक्तीचा मूड हा नेहमीच खराब असतो आणि आणि त्या सार्वजनिक ठिकाणी खूप लवकर त्रासून जातात म्हणूनच नेहमी योग्य प्रमाणात पाणी प्यावे.

५) अनेकदा आपल्याला तहान लागलेली असते मात्र आपण त्यामुळे भुकेले पणाची भावना निर्माण होऊन त्यामुळे विनाकारण जास्त प्रमाणात खातो.म्हणूनच यावेळी आपल्याला योग्य वेळी भुक लागण्याचे किंवा काहीतरी जंक फूड खाण्याची भावना निर्माण होते तेव्हा थोडेसे पाणी प्यावे.यामुळे शरीरामध्ये कमी भूक निर्माण होऊन कमी कॅलरीज शरीरात जातात.

६) जेव्हा आपण पाणी कमी प्रमाणात पितो किंवा आपल्याला तहान लागलेली असते तेव्हा आपल्या शरीरातील चयापचयाची क्रिया सुद्धा मंद होते म्हणूनच जेव्हा आपल्याला वजन घटवायचे असते तेव्हा जास्त प्रमाणात पाणी पिणे खूप आवश्यक असते.

७) मेंदू चे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते म्हणूनच जेव्हा पाण्याचा पुरवठा कमी होतो तेव्हा डोकेदुखी व थकल्यासारखे समस्या निर्माण होतात आणि  पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते म्हणून डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्यावर कोणतेही औषध घेण्या अगोदर एक ग्लासभर पाणी पिऊन आराम करावा व यामुळे बऱ्याचदा ही समस्या दूर होते.