Home » सर्दी आणि खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘या’ फळाचे सेवन…!
Health

सर्दी आणि खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘या’ फळाचे सेवन…!

थंडीच्या दिवसांमध्ये मुख्यत्वे मिळणा-या चिकू या फळांचे अनेक विविध फायदे आहे‌. चिकू विशेष करून गर्भवती स्त्रियांसाठी खूपच लाभदायी आहे.चिकूच्या सेवनामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे पौष्टिक घटक एकाच वेळी मिळू शकतात. चिकू मध्ये कॅल्शियम,लोह,एंट्री बॅक्टेरियल,एंटी व्हायरल हे सर्व गुणधर्म असतात. तसेच चिकूच्या  सेवनामुळे रोगप्रतिकारक्षमता खूप झपाट्याने वाढते हाडे मजबूत होण्यास चिकूचे साहाय्य मिळतेया व्यतिरिक्त चिकूचे फायदे आपण जाणून घेऊया.

१) आहार तज्ञांच्या मते चिकू मध्ये एंटी व्हायरल गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरामध्ये हानीकारक जंत यांचा शिरकाव होण्यास प्रतिबंध होतो. सर्दी ,पडसे यांसारख्या आजारांपासून चिकूच्या सेवनामुळे बचाव होतो.

२) डोळ्यांच्या आरोग्यासाठी जीवनसत्व अ खूप महत्त्वाचे असते.चिकूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवनसत्व अ असते यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी चिकूचे सेवन अवश्य करावे.

३) ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल त्यांनी चिकूचे सेवन नियमितपणे करावे. चिकू मध्ये तंतूजन्य पदार्थांचा समावेश खूप मोठ्या प्रमाणात असतो ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

४) हाडांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी चिकूचे सेवन अवश्य करावे.चिकू मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह असते. या तीनही घटकांना हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते.

५) चिकूच्या फळाच्या बिया सुद्धा आरोग्यदायी असतात .या बियांना बारीक करून याची पावडर सेवन केली असता मुतखडा शरीराबाहेर टाकण्यास साहाय्य मिळते.

६) चिकूमध्ये ग्लूकोड असते  ज्यामुळे शरीरात त्वरित ऊर्जा निर्माण केली जाते. जिम मध्ये जाणाऱ्या व्यक्तीने चिकूचे सेवन केले असता जलद गतीने ऊर्जा मिळू शकते.

७) दातांच्या आरोग्यासाठी सुद्धा चिकू एक उत्कृष्ट उपाय ठरू शकतो. चिकूमध्ये लेटेक्स हा घटक मोठ्या प्रमाणात असतो या घटकामुळे दातांमध्ये कीड होण्यापासून रोखले जाते.

८) चिकू मध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, फायबर ,अँटी बॅक्टेरियल,एंटी  व्हायरल असे सर्वच घटक असतात ज्यामुळे कॅन्सरचा संसर्ग होण्यापासून काही प्रमाणात बचाव मिळू शकतो.