Home » घनदाट,लांब,मजबूत आणि निरोगी केसांसाठी अवलंबा ‘हे’ घरगुती उपाय, ‘११’ वा उपाय करून बघाल तर काही दिवसातचं जाणेल फरक…!
Health

घनदाट,लांब,मजबूत आणि निरोगी केसांसाठी अवलंबा ‘हे’ घरगुती उपाय, ‘११’ वा उपाय करून बघाल तर काही दिवसातचं जाणेल फरक…!

घनदाट निरोगी केस आपल्या सौंदर्यामध्ये निश्चितच भर घालत असतात.केसांचा पोत,लांबी ,प्रकार हे भिन्न असतात  व या  घटकांच्या आधारे केसांची निगा राखली जाते.निसर्गतः निरोगी केस लाभले असले तरीही सध्याचे वाढते प्रदूषण ,आहारातील बदल,आधुनिक जीवन शैली यामुळे केसांना सहजासहजी हानी सुद्धा पोहोचते.केसांचे या बाह्य घटकां पासून संरक्षण करण्यासाठी काही सर्वसाधारण टीप्सचा वापर केसांची निगा राखण्यासाठी केला तर निश्चितच फायदा होऊ शकतो.

कुरळे केस,पातळ केस,दाट केस,तेलकट केस,सरळ केस,दुभंगलेले केस अशा निरनिराळ्या प्रकारच्या केसांसाठी काही सर्वसाधारण काळजी घेतली  जाऊ शकते.आज आपण अशा सर्व प्रकारच्या केसांसाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या उपयोगी टिप्स पाहणार आहोत.

१) गरम कडकडीत पाण्याने अंघोळ करणे हे किती जरी अल्हाददायक आणि  आपल्या शरीराला आराम देणारे वाटत असले तरीही गरम पाण्याने केस धुणे हे केसांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे.गरम पाण्याने केस धुतल्या मुळे केसांमधील नैसर्गिक तेल पूर्णपणे निघून जाते व परिणामी केस कोरडे आणि रखरखीत होतात.यासाठी केस  नेहमी कोमट किंवा थंड पाण्याने धुवावे.

२) केसांसाठी कंडीशनर खूप आवश्यक असतात.सध्या बाजारामध्ये निरनिराळ्या कंपन्यांची कंडिशनर उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर अंडे,दही यांसारख्या नैसर्गिक स्वरूपातील कंडिशनरचा वापरही केला जातो.कंडीशनर च्या वापरामुळे केसांमध्ये एक वेगळीच चमक व दाटपणा निर्माण होतो.मात्र कंडीशनर वापरण्याची सुद्धा एक योग्य अशी पद्धत असते.कंडिशनर लावताना ते केसांच्या मध्य भागापासून ते केसांच्या टोकापर्यंत केसांना लावावे.केसांच्या मुळाशी कंडिशनर  लावू नये.

३) केसांचे गळणे व केसांशी निगडित अन्य समस्या उद्भवल्या मागचे प्रमुख कारण हे केसांची स्वच्छता न राखणे हे आहे.केसांची स्वच्छता राखणे हे केसांचे गळणे थांबवण्यासाठी खूप आवश्यक आहे.केस धुताना केसांची मुळे आणि माथा व केसांमधील त्वचा व्यवस्थितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे कारण केसांची मुळे आणि टाळू यांच्या मधूनच मुख्यत्वे तेल निर्माण होत असते व या भागांची स्वच्छता राखली गेली नाही तर कोंडा होऊ शकतो.केसांना धुण्यासाठी जास्त रसायनांचा समावेश असलेले शाम्पू वापरू नये.

४) केस धुतल्यानंतर ते वाळवण्यासाठी वारंवार हेअर ड्रायरचा वापर करू नये.अतिरिक्त उष्णतेमुळे केसां मध्ये कोरडेपणा निर्माण होतो व केस दुभंगण्याची शक्यता निर्माण होते.केस धुतल्यानंतर ते सुती कपड्याने किंवा हवेच्या मदतीने वाळवणे कधीही फायद्याचे ठरते.केस टॉवेलने कोरडे करताना केसांना खूप जोरात घासू नये यामुळे ओल्या केसांची मुळे तुटू शकतात. ओले केस असताना शक्यतो कंगव्याने केस विंचरू नये आणि ओल्या केसांनी झोपू नये.

५) केस धुण्याअगोदर केसांना योग्य पद्धतीने तेल लावणे व मालिश करणे खूप फायदेशीर ठरते.केसांना तेलाची मालिश केल्यामुळे केसांच्या मुळांची शक्ती वाढते.केस वाढण्यास साहाय्य मिळते,केसांना नैसर्गिक चमक प्राप्त होते व केस धुतल्यानंतर ते कोरडे होण्यापासूनही बचाव होतो.केसांना मालिश करण्यासाठी आपण बदाम तेल,नारळ तेल किंवा अन्य कोणतेही आयुर्वेदिक तेल वापरू शकतो.

६) केस ओले असताना त्यांची मुळे ही नाजूक झालेली असतात अशा वेळी केस विंचरले तर केस तुटण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शक्यतो ओले केस विंचरू नयेत.पण जर त्याची आवश्यकता असेल तर अशावेळी लांब दात असलेला कंगवा केस विंचरण्यासाठी  वापरावा.

७) प्रदूषण,उष्णतेशी येणारा संपर्क,धुळ,अतिरिक्त तणाव,आहारातील पोषणमूल्यांचा अभाव या घटकांमुळे केस दुभंगण्या चे प्रमाण वाढते.केस दुभंगण्याच्या या समस्येवर एक प्रभावी उपाय म्हणजे वेळोवेळी दुभंगलेली टोके काढून टाकण्यासाठी केसांचे ट्रिमिंग करावे.केसांना ट्रिम केल्यामुळे केसांची वाढ फारशी होत नाही मात्र केसांचे आरोग्य निश्चितच चांगले राखले जाऊ शकते.

८) बाह्य ओलाव्यासोबतच अंतर्गत हायड्रेशन राखणे सुद्धा केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.आपण केसांना कोरडे होऊ न देण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे सिरम व हायड्रेटेड प्रॉडक्ट वापरत असलो तरीही दररोज किमान तीन लिटर पाणी पिले तर केसांच्या अनेक समस्यांपासून दूर राहिले जाऊ शकते.

९) ११) मोकळे केस ही सर्वांची आवडती हेअरस्टाईल असते मात्र वातावरणातील प्रदूषण पासून केसांचे संरक्षण करण्यासाठी शक्यतो केस बांधलेले ठेवावेत.पोनी टेल घालताना केसांना खूप जास्त घट्ट बांधू नये त्यामुळे केसांच्या मुळांना अपाय होतो.केस हे ११) अमिनो ऍसिड आणि प्रोटिन्स यांच्या पासून बनलेले असतात यामुळे आपला आहार हा पोषक घटकांनी युक्त असावा.प्रथिने केसांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असतात.पोषणमूल्यांच्या अभावी केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात.हिरव्या पालेभाज्या,सुका मेवा,निरनिराळी फळे,जीवनसत्व असलेली व लिंबूवर्गीय फळे,दूध,दही,अंडी,मासे,रताळे, भोपळा,मध,सोयाबीन,पनीर इत्यादी केसांच्या पोषणासाठी साहाय्य करणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये आवर्जून समावेश केला गेला पाहिजे.

१०) अतिनिल किरणे त्वचेला हानी पोहोचवतात तशीच हानी ही केसांना सुद्धा होते.बाहेर पडताना धूळ आणि उष्णतेपासून आपल्या केसांचे रक्षण करण्यासाठी केसांना व्यवस्थित झाकून  घेणे आवश्यक आहे.पोहताना स्विमिंग पूलमध्ये पाण्यात असलेल्या क्लोरीनमुळे केसांमध्ये चिकटपणा,कोरडेपणा निर्माण होतो यासाठी पोहताना नेहमी स्विमिंग कँपचा वापर करावा.

११) केस हे अमिनो ऍसिड आणि प्रोटिन्स यांच्या पासून बनलेले असतात यामुळे आपला आहार हा पोषक घटकांनी युक्त असावा.प्रथिने केसांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असतात.पोषणमूल्यांच्या अभावी केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात.हिरव्या पालेभाज्या,सुका मेवा,निरनिराळी फळे,जीवनसत्व असलेली व लिंबूवर्गीय फळे,दूध,दही,अंडी,मासे,रताळे, भोपळा,मध,सोयाबीन,पनीर इत्यादी केसांच्या पोषणासाठी साहाय्य करणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये आवर्जून समावेश केला गेला पाहिजे.

१२) अतिरिक्त तणाव हा शरीरातील अनेक आरोग्य समस्यांच्या मुळाशी असतो.आपल्या मध्ये असलेला अतिरिक्त तणाव हा आपली त्वचा व केसांवरही दिसून येतो.तणावामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते यासाठी अतिरिक्त तणाव घेणे शक्यतो टाळा.सध्या उपलब्ध असलेल्या केसांशी निगडित ब्लो ड्रायर,हेअर ड्रायर यांसारख्या उत्पादनांचा वारंवार वापर करणे टाळावे यामुळे केसांचा पोत खराब होतो.