Home » जिवंतपणीच रूग्णांना पुरायचा, अख्या महाराष्ट्राला हादरवणारी सत्य घटना!
History News

जिवंतपणीच रूग्णांना पुरायचा, अख्या महाराष्ट्राला हादरवणारी सत्य घटना!

डॉक्टरांना देवदूत म्हटले जाते.रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांचे दुःख समजून घेणे ही कामे अगदी हसत हसत करणाऱ्या डॉक्टरांना पृथ्वीतलावरील ईश्वराचा अवतार म्हटले तर वावगे ठरणार नाही.मात्र यामध्ये एक असा डॉक्टर होऊन गेला आहे ज्याला साक्षात डॉक्टर डेथ असे म्हटले जाते. कारण त्याने कारनामे असे केले आहेत. या डॉक्टरने आपल्याकडे येणाऱ्या महिला रुग्णांच्या परिस्थितीचा फायदा उठवत त्यांच्याशी जवळीक साधून आपले काम झाल्यावर त्यांना मारून टाकले. या डॉक्टरचे नाव आहे डॉक्टर संतोष पोळ.

डॉक्टर संतोष पोळ हा सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी आपल्या डॉक्टरकिची प्रॅक्टिस करत होता.याठिकाणी 2016साली एक अंगणवाडी शिक्षिका मंगला जेधे या गायब झाल्या होत्या. त्यांच्या घरच्यांना मंगला जेधे यांच्या गायब होण्यामागे डॉक्टर संतोष पोळचा हात असल्याचा संशय होता कारण त्या डॉक्टर संतोष पोळच्या च्या संपर्कात होत्या. या संदर्भात मंगला जेधे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

मात्र डॉक्टर संतोष पोळ भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ता होता व ज्या पोलिस स्टेशन मध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली होती तेथील प्रमुख यांच्याविरोधातही त्याने काही भ्रष्टाचार विरोधी पुरावे दाखल केले होते त्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई करण्यास हे  प्रमुख ही कचरत होते. मात्र लोकांचा वाढता दबाव पाहता डॉक्टर संतोष पोळ यांची चौकशी केली.  एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे डॉक्टर संतोष पोळने पोलिसांना गुंगारा दिला व मंगल जेधे  यांच्या गायब होण्यामागे त्याचा कोणताही प्रकारचा हात नाही हे पटवून दिले.

पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्यामुळे संतोष पोळला अटक करता आली नाही. मात्र नंतर मंगला  यांचा मोबाईल हा ज्योती नावाच्या एका नर्स कडे सापडला. ज्योती ही डॉक्टर संतोष पोळ यांच्याकडे नर्सचे काम करत होती. ज्योतीला ताब्यात घेतल्यानंतर तिने मंगला जेधे यांचा खून डॉक्टर ने केल्याचे कबूल केले. डॉक्टर संतोष याच्या फार्महाऊसवर नारळाच्या झाडाखाली मंगल यांच्या सापळ्याच्या स्वरूपातील मृतदेह सापडला.याठिकाणी अजून पाच स्त्रियांचे मृतदेह सापडले.

या पाचही स्त्रियांचे खून डॉक्टर संतोष पोळ याने केले होते. डॉक्टर संतोष पोळ व ज्योती यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते व ज्योतीने केवळ मंगल जेधे यांच्या खूनामध्ये आपण डॉक्टरला साथ दिल्याचे कबूल केले होते व ती माफीची साक्षीदार झाली.डॉक्टर संतोष पोळला दादर येथून अटक करण्यात आली त्यावेळी त्याने या पाच स्त्रिया व एक पुरुष यांचा आपण खून केल्याचे कबूल केले.

या सर्व मृत व्यक्तींना तो आपल्या फार्महाऊसवर बोलावत असे व त्या ठिकाणी  एक इंजेक्शन देत असे ज्यामुळे त्यांचे अवयव निकामी होत असत मात्र ती व्यक्ती जिवंत असे. अशा जिवंत व्यक्तींना तो जमिनीमध्ये पुरत असे. इतकी क्रूर काम करण्यामागे डॉक्टरचा नक्की उद्देश काय होता हे अजूनही सिद्ध झालेले नाही. ज्योती आणि डॉक्टर संतोष पोळ हे सध्या पोलिसांच्या कस्टडी मध्ये असून त्यांच्या केसची सुनावणी अद्यापही सुरू आहे.