Home » प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो,जाणून घ्या…
history

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो,जाणून घ्या…

भारतामध्ये दरवर्षी  26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.26 जानेवारी 2022 रोजी आपण भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत.प्रजासत्ताक दिनाचे स्वागत अतिशय उत्साहाने केले जाते.या दिवशी सरकारी कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला जातो. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनच का साजरा केला जातो असा प्रश्न निश्चित पडतो.26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनाशी  निगडित काही तथ्य आपण जाणून घेणार आहोत.

१) भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून कार्यभार सुरु करण्यास 26 जानेवारी 1950 रोजी सुरुवात झाली. त्या अगोदर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला सार्वभौमत्व व प्रजासत्ताक राष्ट्राचा दर्जा देण्यासाठी संविधानाचा स्वीकार केला गेला.भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी दोन वर्ष 11 महिने अठरा दिवस लागले.

२) भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी 26 जानेवारी या दिवसाची निवड का करण्यात आली तर 26 जानेवारी 1930 रोजी सर्वात प्रथम स्वतंत्रता दिवस भारतामध्ये साजरा केला गेला.15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. मात्र या अगोदर पर्यंत 26 जानेवारी या तारखेला स्वतंत्रता दिवस साजरा केला जात होता. या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अमलात आणले गेले व त्या दिवसापासून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

३) सर्वात प्रथम प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी साजरा केला गेला. या दिवशी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या संविधानाचा स्वीकार केला गेला व भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले गेले. या दिवशी 21 तोफांची सलामी मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तिरंगा ध्वज फडकावला होता.

४) भारतामध्ये प्रजासत्ताक दिनाची सुरुवात 2022 सालापर्यंत 24 जानेवारीपासून केली जात असे.मात्र या वर्षीपासून ही सुरुवात 23 जानेवारीपासून करण्यात आली.या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली या वर्षी प्रजासत्ताक दिनाचे अजून एक वेगळेपण म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर इंडिया गेटवर अमर जवान ज्योती यावर्षी प्रज्वलित होणार नाही कारण त्याचे विलीनीकरण नॅशनल वॉर मेमोरियल मध्ये करण्यात आले आहे.