Home » भारतातीमधील एक असा रहस्यमय किल्ला जेथून अचानक लोक गायब होतात…
History

भारतातीमधील एक असा रहस्यमय किल्ला जेथून अचानक लोक गायब होतात…

हा किल्ला शत्रूंना कधी जवळ येऊ देत नव्हता.दुरून दिसणारा प्रचंड मोठा किल्ला जवळ पोहोचेपर्यंत दृष्टीआड होतो.त्याचे नाहीसे होण्याचे कोडे समजण्यास अगदी सोपे आहे.किल्ला खरं तर चारही बाजूंनी छोट्या टेकड्यांनी वेढलेला आहे.

जसजसे पुढे जाल तसतसे आजूबाजूचे डोंगर मोठे होत जातील आणि किल्ला त्यांच्या मागे लपत जाईल.पुढे गेलो तरी हा प्रश्न सुटत नाही.मग अनेक रस्ते दिसतात आणि कोणत्या वाटेने गडावर जाईल याचा अंदाज बांधणे कठीण होते.त्यामुळे गडावर हल्ला करण्यासाठी आलेल्या शत्रू सैन्याची भटकंती होत असे.

भारत त्याच्या इतिहासासाठी ओळखला जातो ज्यामध्ये किल्ले आणि राजवाडे पाहण्यासाठी पर्यटक येतात.पण जर ५०-६० लोकांचा ग्रुप एखादे ठिकाण बघायला आला आणि तिथून अचानक गायब झाला तर काय होईल याची कल्पना करा.होय,उत्तर प्रदेशातील झाशीपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या गडकुंदर किल्ल्यावर असेच काहीसे घडले,जे एक रहस्य आहे.चला तर मग जाणून घेऊया या रहस्यमय किल्ल्याबद्दल.

शतकात बांधलेला हा किल्ला पाच मजल्यांचा असून त्यात तीन मजले वर आहेत तर दोन मजले जमिनीच्या खाली आहेत.हा किल्ला कधी व कोणी बांधला याची माहिती उपलब्ध नसली तरी हा किल्ला १५०० ते २००० वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते.चंदेल,बुंदेल आणि खंगार यांसारख्या अनेक राज्यकर्त्यांनी यावर राज्य केले.

हा किल्ला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बांधलेला असा अनोखा नमुना आहे,ज्यामुळे लोकांचा गोंधळ उडतो.हा किल्ला चार-पाच किलोमीटर अंतरावरून दिसतो,पण जवळ जवळ गेल्यावर तो नाहीसा होतो.अशा पद्धतीने याला बांधलेले आहे.

गडकुंदरचा किल्ला भारतातील सर्वात रहस्यमय किल्ल्यांमध्ये गणला जातो.आजूबाजूचे लोक सांगतात की फार पूर्वी जवळच्या गावात वरात आली होती.ती वरात गडाचे दर्शन घेण्यासाठी आली.फिरत असताना ते तळघरात गेले,त्यानंतर ते रहस्यमयरीत्या अचानक गायब झाले.त्या ५०-६० जणांचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. यानंतरही अशा काही घटना घडल्या, त्यानंतर गडाकडे जाणारे सर्व दरवाजे बंद करण्यात आले.

हा किल्ला जणू चक्रव्यूहच आहे.माहिती नसेल तर आत खोलवर गेल्यास दिशा विसरत जातो.गडाच्या आतील अंधारामुळे दिवसाही भितीदायक दिसते.असे म्हटले जाते की किल्ल्यामध्ये खजिन्याचे रहस्य देखील दडलेले आहे,ज्याच्या शोधात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.येथील राजांकडे सोने, हिरे, रत्ने यांची कमतरता नव्हती असे इतिहास तज्ञ सांगतात.अनेकांनी येथे खजिना शोधण्याचा प्रयत्न केला,पण ते अयशस्वी झाले.