Home » ‘या’ महिलेने आवाज उठवल्यामुळे आज महिला वकीली करू शकतात…
History

‘या’ महिलेने आवाज उठवल्यामुळे आज महिला वकीली करू शकतात…

समाजाने स्त्रियांवर अशी अनेक प्रकारची बंधणे लादलेली आहेत.ही बंधने झुगारण्यामध्ये ज्योतिबा फुले यांचा फार मोलाचा वाटा आहे.’मुलगी शिकली प्रगती झाली’ या प्रमाणे मुलींनी जर शिक्षण घेतलं तर पूर्ण घराची प्रगती होते. समाजासमोर हा विचार ठेवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना यासाठी प्रचंड विरोध पत्करावा लागला होता.

तरी देखील महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुढे हा लढा सुरूच ठेवला.त्यांच्यानंतर महर्षी कर्वे यांनी महिलांसाठी ‘कमिन्स कॉलेजची’ स्थापना करून मुलींना मुलांच्या बरोबर सर्व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.यांच्याबद्दल आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे परंतु अशी एक महिला आहे जिचं नाव आपण कदाचित ऐकलेलं नसेल ते म्हणजे ‘कॉर्नेलिया सोराबजी’.

कॉर्नेलिया सोराबजी यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८६६ मध्ये नाशिक मधील एका पारशी-ख्रिश्चन कुटुंबामध्ये झाला होता लहानपणापासून त्यांना अभ्यासाची आवड होती.यामुळेच त्यांना पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये सर्वात पहिला प्रवेश दिला होता.

डेक्कन कॉलेजमध्ये या आधी फक्त पुरुषांनाच संधी दिली जायची.कॉर्नेलिया सोराबजी यांनी मिळालेल्या ह्या संधीच सोनं केलं त्यांनी पाच वर्षांचा कोर्स एका वर्षामध्येच पूर्ण केला होता.त्याकाळामध्ये डेक्कन कॉलेजमधून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी कडून शिष्यवृत्ती दिली जायची.

परंतु या स्कॉलरशिपसाठी कॉर्नेलिया सोराबजी पात्र असून देखील त्यांना ती दिली नाही कारण त्या एक महिला होत्या.त्या काळात महिलांना वकिली करून देत नव्हते.”परंतु कॉर्नेलिया सोराबजी यांनी ठरवले होते की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्येच शिकायचं” पण हे एवढं सोपं नव्हतं.परंतु अशक्य असणारे काम त्यांनी शक्य करून दाखवलं ‘बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ’ या विषयामध्ये बॅरिस्टर होणाऱ्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधील त्या पहिल्या महिला होत्या आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून शिक्षण होणाऱ्या पहिली भारतीय महिला होती.

कॉर्नेलिया भारतामध्ये परतल्यावर त्यांनी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली.खूप मेहनत केल्यानंतर कॉर्नेलियाला यश मिळाले.वकिली करताना कॉर्नेलियाने ६०० हून अधिक महिलांना कायदेशीर सल्ला दिला.१९२२ मध्ये लंडन बारने महिलांना कायद्याचा सराव करण्याची परवानगी दिली.त्यानंतर कॉर्नेलियाने कायद्याची पदवी घेतली.कॉर्नेलिया या कलकत्ता उच्च न्यायालयात बॅरिस्टर म्हणून कायद्याचा सराव करणारी पहिली महिला ठरली.