Home » औरंगजेबाचे वंशज सध्या जगत आहेत असे आयुष्य,जाणून धक्का बसेल…
History

औरंगजेबाचे वंशज सध्या जगत आहेत असे आयुष्य,जाणून धक्का बसेल…

भारत  हे प्राचीन काळापासून परकीय सत्तांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आकर्षित करणारे राष्ट्र आहे.भारतामधील मुबलक खनिज संपत्ती,मोक्याच्या ठिकाणी असलेले भूप्रदेश,समुद्र किनारा,भारतीय संस्कृती यामुळे त्यांना नेहमीच भारताला स्वतःच्या वर्चस्वाखाली आणण्याची आकांक्षा होती.भारतावर अनेक आक्रमणे झाली.त्यांपैकी मुघल सत्तांनी केलेल्या आक्रमण व अनेक वर्षे भारतीयांचे केलेले खच्चीकरण हे भारतीय इतिहासामध्ये आपण नेहमीच वाचत आलो आहोत.

मुघल सत्ता पैकी सर्वात क्रूरकर्मा म्हणून ख्याती असलेला बादशहा म्हणजे औरंगजेब होय.औरंगजेब हा केवळ आपल्या अधिपत्याखाली असलेले भूप्रदेश वाढवण्यासाठी प्रयत्नशील होता व यासाठी तो स्थानिक शासकांना अतिशय क्रूरपणे चिरडून टाकत असे.भारतीयांची मूळ संस्कृती चिरडून मुघल संस्कृतीची बीज रोवण्यासाठी तो नेहमीच पुढे सरसावत असे.यामुळेच भारतीयांमध्ये अन्य मुघल शासकांपेक्षा ही सर्वात जास्त चीड ही औरंगजेबा प्रति आज सुदधा दर्शवली जाते.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता काहीशी लयास गेली.ब्रिटिशांच्या भारतामधील सत्तेच्या स्थापनेनंतर ब्रिटिशांनी वापरलेली आधुनिक तंत्रज्ञान युद्ध प्रणाली यामुळे मुगल शासकांना सत्तेवरून पायउतार करणे हे सन अठराशे सत्तावन नंतर अगदीच सोपे झाले.भारतावर राज्य करणारा शेवटचा मुघल बादशहा बहादूरशहा जफर होता.बहादुर शहा जफर यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले व त्याचा अंत हा ब्रह्म देशांमध्ये झाला.

बहादुर शहा जफर च्या सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भारतामधील मोगलांचे स्थान हे जणूकाही कायमचे नाहीसे झाले.बहादूरशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या वंशजांनी सत्तेची संपत्ती व समृद्धी ही गमावली होती व त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहासाठी औरंगजेबाचे वंशज विविध देशांच्या कानाकोपऱ्यात मध्ये जाऊन कशीबशी आपली गुजराण करू लागले.यांपैकीच एक वंशज हे भारतामधील कलकत्त्यात येऊन स्थायिक झाले होते.

औरंगजेबाच्या या वंशाचा मृत्यू झाला आहे.मात्र त्यांची पत्नी व त्याची मुलं सुद्धा कलकत्ता मधील एका झोपडपट्टीमध्ये आपला उदरनिर्वाह करत आहेत.औरंगजेबाच्या या वंशजाच्या पत्नीचे नाव सुलताना बेगम असून तिला चार मुले आहेत व हे सर्व झोपडपट्टीतील दोन खोल्यांच्या घरामध्ये कशीबशी गुजराण करत असून.भारतीयांच्या अस्मितेला धक्का पोहोचवणा-या औरंगजेबाचे वंशज असल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांकडून त्यांना वाळीत टाकल्याचा सामना करावा लागतो.

कधी काळी संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या व सोने की चिडिया असणाऱ्या या देशाचे जणूकाही स्वामी असलेल्या या मुगल शासकांच्या वंशजांना सध्या इतके उतरणीचे दिवस लागलेले असले तरी त्यांच्यामधील सत्तेचा अहंकार आज सुद्धा जात नाही हेच दिसून येते.कारण सुलताना बेगमच्या पतीने तिला कधीही भिक मागून उदरनिर्वाह करू नकोस कारण आपण या भारतावर कधीकाळी राज्य केलेले आहे असे सांगितल्याचे सुलताना बेगम सांगते.