Home » मृ’त्यू’च्या ४०० वर्षांनंतरही जिवंत आहे ‘हा’ संत…!
History

मृ’त्यू’च्या ४०० वर्षांनंतरही जिवंत आहे ‘हा’ संत…!

पृथ्वीतलावर मनुष्याच्या आयुष्याशी निगडित अनेक अगम्य अशा गोष्टी आज सुद्धा अस्तित्वात आहेत ज्यांची उकल वैज्ञानिकांनाही करता आलेली नाही. विज्ञान युगातही अशा काही घटना आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहे ज्या पाहिल्यावर तर्कबुद्धीला अनेक प्रश्न पडतात. अशीच एक घटना म्हणजे बेसिलिका ऑफ बोम जोस हे जुन्या ओल्ड गोवा येथे स्थित असलेले सेंट फ्रान्सिस झेव्हिअर यांचे पार्थिव शरीर गेली चारशे वर्ष कोणत्याही हानीशिवाय अस्तित्वात आहे व आजही अनेक भाविक या ठिकाणी आपल्या समस्यांच्या निराकारण्यासाठी भेट देत असतात.

बेसिलिका ऑफ बोम जिझस हे चर्च सर्वात पवित्र ख्रिस्ती धर्मस्थळांपैकी एक मानले जाते. संत फ्रान्सिस झेव्हिअर हे एक अतिशय आदरणीय व पवित्र शक्तीचा संचय असलेले धर्मगुरू मानले जात होते. ते राजघराण्याशी निगडित होते. बेसिलिका ऑफ बोम जिझस या चर्चच्या निर्मितीस सन १५९४ मध्ये प्रारंभ झाला.

ही वास्तू केवळ धार्मिक नव्हे तर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वपूर्ण मानली‌ जाते व म्हणून तिचा सामावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये करण्यात आला आहे. या वास्तू लक्ष पोर्तुगीज स्थापत्य शास्त्राची छाप दिसून येते. सेंट फ्रान्सिस झेव्हिअर यांनी जगभरात कार्य केल्यानंतर गोव्यामध्ये आपले कार्य सुरू केले या ठिकाणी समस्यांचे निराकरण केले त्यांना समाजामध्ये खूप मान होता. त्यांच्या मृ’त्यू नंतर त्यांचे पार्थिव शरीर पोर्तुगीज मध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी पूजा करण्यासाठी दफन पेटी उघडली त्यावेळी त्यांचे शरीर कोणत्याही हानी शिवाय जिवंत शरीराप्रमाणेच दिसत होते.

त्यामुळे हे शरीर पुन्हा एकदा गोव्यात आणले गेले. या ठिकाणी त्यांच्या शरीराचे जतन करण्यात आले. आजही 400 वर्षाहून अधिक कालावधी उलटून हे शरीर जसेच्या तसे आहे. हे कसे काय घडू शकते हे आज पर्यंत न उलगडलेले कोडे आहे. अनेक पर्यटक व भाविक आवर्जून हे चर्च व सेंट फ्रान्सिस यांचा देह पाहण्यासाठी येतात.