Home » गांधारीच्या एका शापामुळे अफगाणिस्तान भूगतोय त्याची सजा,इतिहास देतोय पुरावा…
history

गांधारीच्या एका शापामुळे अफगाणिस्तान भूगतोय त्याची सजा,इतिहास देतोय पुरावा…

आता सध्या जिकडे पाहावे तिकडे अफगणिस्तानचीच चर्चा आहे.तिथे झालेल्या उलथापालथीमुळे सगळीकडे तीच चर्चा सुरु आहे.यामध्येच आता अफगाणिस्तान आणि भारतचे संबंध याविषयी देखील चर्चा होत आहे.काही पौराणिक कथेनुसार भारत आणि अफगाणिस्तान यामध्ये संबंध होते.

मुस्लिम म्हणून ओळखला जाणारा हा देश कधी काळी हिंदू संस्कृती आणि हिंदू चालीरितींवर विश्वास ठेवत होता.अफगाणिस्तानशी भारताचे संबंध हे शंभर वर्षे जुने नव्हे तर हजारो वर्षे जुने आहेत.अफगाणिस्तानचे भारताशी ५००० वर्ष जुने संबंध आहेत.

अफगाणिस्तानचे भारताशी ५००० वर्षे जुने संबंध…

अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीने देशाचा पूर्णपणे ताबा घेतला आहे.सर्व सरकारी संस्था आता तालिबानी दहशतवाद्यांनी व्यापल्या आहेत,लोकशाही व्यवस्था पूर्णपणे नष्ट केली आहे.सध्या मुस्लिम लोकसंख्या असलेला हा देश एकेकाळी हिंदू संस्कृती आणि चालीरीतींवर विश्वास ठेवत होता.

चला तर मंग आज आम्ही तुम्हाला इतिहासाची पाने उलगडून  अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील संबंधाबद्दल जाणून घेऊया…

असे मानले जाते की अफगाणिस्तानशी भारताचे संबंध शंभर वर्षे जुने नसून हजारो वर्षे जुने आहेत.अफगाणिस्तानचे भारताशी ५००० वर्ष जुने संबंध आहेत.शिवाय महाभारताचे षड्यंत्र देखील येथूनच सुरू झाले.तर आज आपण  अफगाणिस्तान चा महाभारताशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया…

महाभारताचे षड्यंत्र येथून सुरू झाले…

कंधार हे पूर्वी गांधार म्हणून ओळखले जात असे.नंतर ते गांधारातून कंधार कसे झाले? वेद व्यासजींच्या महाभारतात याविषयी बरेच काही सांगितले गेले आहे.सुमारे ५५०० वर्षांपूर्वी राजा सुबल हे गांधारवर राज्य करत होते.त्यांच्या मुलीचे नाव गांधारी होते.गांधारीचा विवाह हस्तिनापूरचा राजकुमार धृतराष्ट्राशी झाला होता.गांधारीला शकुनी नावाचा भाऊ होता.

वडिलांच्या मृत्यूनंतर गांधारचे संपूर्ण राज्य शकुनीच्या हातात आले.जेव्हा भीष्माने राजा सुबलच्या संपूर्ण परिवाराचा नाश केला होता,त्याचा बदला घेण्यासाठी शकुनीने कौरव आणि पांडवांना आपापसात लढवून संपूर्ण हस्तिनापूर नष्ट करण्याचा कट रचला होता.

आपल्या १०० मुलांना गमावल्यानंतर,गांधारीने क्रोधाच्या भरात तिने शकुनीला शाप दिला,माझ्या १०० पुत्रांना मारणाऱ्या गांधार राजा.”तुझ्या राज्यात कधीही शांतता राहणार नाही.”

आता तालिबानने  राजवटीने पुन्हा अफगाणिस्तानला ताब्यात घेतले आहे, गांधारीच्या त्या शापाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.असे म्हंटले जाते की अफगाणिस्तान मध्ये आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती गांधारीच्या शापामुळेच.

कौरवांचे वंशजही येथे येऊन स्थायिक झाले.

असे देखील म्हंटले जाते की कौरवांचे शेकडो वंशज पांडवांच्या हातून झालेल्या पराभवानंतर अफगाणिस्तानात स्थलांतरित झाले होते.याठिकाणी त्यांनी आपल्या शकुनी मामाच्या प्रांतामध्ये गांधार येथे आश्रय घेतला,त्यानंतर हळूहळू इराक आणि सौदी अरेबियामध्ये स्थायिक झाले.

 गंधार या शहराचे नाव कंधार कसे झाले…

महाभारत काळ संपल्यानंतर हळूहळू बौद्ध धर्माचा प्रसार येथे होऊ लागला.आशियाच्या काही भागात बौद्ध धर्म देखील वेगाने पसरू लागला.भगवान शिव यांची उपासना हळूहळू येथून संपुष्टात येऊ लागली आणि त्यानंतर बौद्ध धर्माचे अनुयायी त्यांच्या धर्माचा प्रचार करू लागले.मुस्लिम राज्यकर्त्यांनी राज्य करण्यापूर्वी अनेक मौर्य राज्यकर्त्यांनी येथे राज्य केले.

त्यानंतर ११ व्या शतकात महमूद गझनवीने येथे आपली सत्ता प्रस्थापित केली आणि अशा प्रकारे गांधार कंधार बनले.जे आता येथे कंधार नावाचे शहर म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक पुराव्या नुसार त्या वेळी गांधार या राज्यात उत्तर पाकिस्तानचा काही भाग देखील समाविष्ट होता.

भगवान शंकराशीही संबंध आहे

गांधार शब्दाचा उल्लेख ऋग्वेद व्यतिरिक्त रामायण आणि महाभारत मध्ये देखील आढळतो.गांधार या शब्दाचा अर्थ आहे सुगंध म्हणजे सुगंधी जमीन.या नावामागचे कारण म्हणजे येथे केशराची लागवड केली जाते.

पौराणिक कथेनुसार,भगवान शिव यांच्या नावांपैकी एक नाव गांधार आहे.या नावाचा उल्लेख शिव सहस्रनामात आहे.असे म्हंटले जाते की येथे प्रथम भगवान शिव भक्त राहत असत.प्राचीन काळी उत्तर-पश्चिम पंजाबचा काही भाग गांधारमध्येही एकत्र झाला होता.