Home » औरंगाबादच्या नामांतराचा विषय एवढा चर्चेत का असतो…चला तर मग जाणून घेऊया नामांतरा मागचा इतिहास…
history

औरंगाबादच्या नामांतराचा विषय एवढा चर्चेत का असतो…चला तर मग जाणून घेऊया नामांतरा मागचा इतिहास…

आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल कि औरंगाबाद चे जुने नाव काय असेल? त्यामाघील इतिहास काय आहे?औरंगाबाद गावाची निर्मिती कशी झाली असेल?औरंगाबाद चे औरंगाबाद नाव कसे पडले?असे अनेक प्रश्न पडले असतील आपल्या पैकी बऱ्याच जणांना आणखी याविषयी माहित नाही तर आज आपण औरंगाबाद विषयी काही माहिती जाणून घेऊया.

इ.स.चौथ्या शतकात उदयास आलेले औरंगाबाद शहर सातवाहन,यादव,वाकाटक,निजाम आणि मुघल या राजसत्तेच्या केंद्रस्थानी राहिले आहे.औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील एक महत्वाचा जिल्हा आहे.या जिल्ह्याला ५२ दरवाज्याचे शहर म्हणून ओळखले जाते.

औरंगाबाद हा जिल्हा भारतातील असा एकमेव जिल्हा आहे ज्यात दोन जगप्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक वस्तू आहे त्याम्हणजे अजिंठा लेणी आणि वेरुळ लेणी.औरंगाबाद जिल्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ देखील आहे.औरंगाबाद हे जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्योगिक शहर आहे.औरंगाबादच्या नामांतराचा विषय अगदी चर्चेत असतो.चला तर मग जाणून घेऊया औरंगाबाद चा प्राचीन इतिहास.

औरंगाबाद जिल्ह्याचे प्राचीन नाव खडकी हे होते.खडकी हे अगदी छोटस खेड होत.आजूबाजूला दौलताबाद आणि पैठण हि मोठी नगरे होती.त्यावेळी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक महत्वाचं केंद्र असल्यामुळे परी मार्गाचा फायदा खडकी या गावाला हि मिळत होता.खाम नावाच्या नदीवर वसलेलं गाव.हे गाव निजामशाहाचा हापशी वजीर मलिक अंबर यांच्या नजरेत बसलं.

तेव्हा त्याने तिथे नवीन नगर उभारण्याचे ठरवले.कारण खाम नदी छोटी असल्यामुळे पुराचा धोका नव्हता आणि पाण्याची ही सोय होती.तिथे कोरड आणि मोकळं वातावरण होत आणि राजमार्गावर बसलेलं होतं.त्यामुळे दौलताबाद,पैठण आणि अहमदनगर या सर्व ठिकाणांसाठी योग्य होते.

मलिक अंबरने १६१० साली इथे एक नगर उभारण्याचे ठरवले.मलिक अंबर हा एक उत्कृष्ट इंजिनियर आणि जल शास्त्रज्ञाचा अभ्यासक होता.म्हणजे त्याला इरिगेशन ची सर्व माहिती होती.त्याने खडकीतील हजारो माणसे कामाला लावून त्याकाळी त्याने भव्य कालयंत्रणा उभारली.ते पण केवळ १५ महिन्यात २.५ लाखांचा खर्च करुण उभारली.

मलिक अंबरने रस्ते,पूल आणि कालव्यांद्वारे पाणी योजना सुरु केली.पाणचक्की ची रचना करून संपूर्ण शहरात पाणी फिरवण्याची योजना केली होती.या कालव्यांना “नहर ए अंबरी” म्हणजे मलिक अंबरचे कालवे असे नाव देण्यात आले होते.त्याने तिथे लोखंडासारखे राजवाडे ही बांधले होते.

त्या कालव्यांना लाकडी फाटक होती त्याचा वापर मलिक अंबरने पाण्याचा प्रवाह हव्या त्या दिशेला वळवण्याची सोय केली होती.हि कालवेयंत्रणा अंडर ग्राउंड होती.सात फूट व्यासाचे मोठे मोठे कालवे होते.ज्यामधून माणूस चालत जाऊ शकेल अशी होती.या कालवे यंत्रणेला १४० छिद्र होती.हि यंत्रणा जवळपास १९३१ सालापर्यंत कार्यरत होती.

१६१० साली ह्या नगराची स्थापना झाल्यापासून १६२६ पर्यंत या शहराचे वैभव दिवसेंदिवस वाढत गेले.मलिक अंबर च्या मृत्यूनंतर निजामशाहीचा वजीर फतेह खानने जो कि मलिक अंबर चा मुलगा होता त्याने या शहराचं नाव बदलून फतेहनगर केलं.निजामशाही नंतर हा सगळा इलाका मुघलांच्या ताब्यात गेला.

तेव्हा १६३३ साली मुघल शहजादा औरंगजेबला दख्खन  प्रांताचा सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.तेव्हा दख्खन ची राजधानी म्हणून फतेहनगरची निवड केली होती.आणि फतेह नगर च नाव बदलून स्वतःच नाव या शहराला दिल पुन्हा एकदा खडकीच नाव बदललं आणि १६५३ साली औरंगाबाद असं झालं.

१७२४ साली दख्खनचा मुघल गव्हर्नर निजाम असफ प्रथम,हा मुघल साम्राज्या तून  निघाला आणि स्वतःच्या असफ जादी राजवंशाची निर्मिती केली.१७६३ मध्ये हैद्राबाद शहराकडे त्याची राजधानी हस्तांतरित होईपर्यंत औरंगाबाद ला हैदराबाद ची राजधानी बनवल होत. 

१९५५ पर्यंत औरंगाबाद हैद्राबाद राज्याचा भाग म्हणून राहिले.१९६० मध्ये औरंगाबाद व मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनला.आता औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी आहे.