Home » माकडापासून मनुष्याची निर्मित्ती तरीही माकड माकडचं का?
History

माकडापासून मनुष्याची निर्मित्ती तरीही माकड माकडचं का?

मनुष्याला आपल्या पूर्वजांचा व इतिहासाचा प्रचंड अभिमान असतो.आपल्या पूर्वजांविषयी मनुष्य नेहमीच भरभरून बोलत असतो.आपल्या पूर्वजांपासून आपली पिढी कशी उत्क्रांत होत गेली याचे इतिहासामध्ये अनेक वर्णन केली गेली आहे.मनुष्याची उत्क्रांति ही एक अभ्यासाचा खूप मोठा विषय आहे.एका जंगली रानटी प्राण्या सारख्या अवतारातून आजचा मनुष्य उत्क्रांत होत गेला व यामध्ये शारीरिक ठेवण,मेंदूची जडणघडण,सामाजिक वर्तन या सर्व बाबींचा समावेश होतो.अनेकदा मनुष्याचे पूर्वज माकड किंवा वानर होते असे सांगितले जाते.यासंदर्भात अनेक शास्त्रीय दाखले सुद्धा आहेत.मात्र यावर विश्वास ठेवणे हे अनेकांना कठीण जाते.अनेकांना माकडापासून आपली उत्पत्ती झाली असे मानले तर मग माकडं मुळात या पृथ्वीतलावर का अस्तित्वात आहेत व आता माकडांपासून मनुष्याची निर्मिती का होत नाहीत असे प्रश्नही पडतात.या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या पाहणार आहोत.

डार्विनच्या  सिद्धांतानुसार माणसाची उत्क्रांती ही माकडाच्या अवस्थेपासून झाली आहे असे म्हटले गेले मात्र याचा अर्थ असा नव्हे की माणसाचे पूर्वज माकड होते.यासाठी डार्विनचा सिद्धांत मध्ये एका पक्षाचे उदाहरण दिले गेले आहे.हा पक्षी एका बेटावर वास्तव्य करत असे व या एकाच बेटावर या पक्षाची ही प्रजाती अस्तित्वात होती.मात्र जशी या पक्ष्यांची संख्या वाढू लागली तसतसे या बेटावरील खाद्य  त्यांच्यासाठी पुरेसे नव्हते मग यातून काही पक्षी हे स्थलांतर करून अन्य बेटांवर गेले.यात वेगवेगळ्या बेटांवरील स्थलांतरित पक्ष्यांना नवीन परिस्थिती व वातावरणाशी जुळवून घेताना स्वतःच्या रचनेमध्ये काही बदल घडवून आणावे लागले.

मूळ बेटावर राहणारे पक्षी हे केवळ फळे खात असत.अन्य बेटांवर स्थलांतर केल्यानंतर या पक्षांना तिथे उपलब्ध असलेल्या किडे,अळ्या इत्यादी खावे लागत असे.किडे व अळ्या पकडण्यासाठी या पक्ष्यांची चोच ही टोकदार व अणकुचीदार असणे आवश्यक होते व त्याप्रमाणे या ठिकाणच्या पक्ष्यांच्या चोची मध्ये बदल घडवून आणले गेले.डार्विनच्या सिद्धांतानुसार जर आवश्यकता असेल तर तो संबंधित बदल केवळ त्या प्राणिमात्रांमध्ये घडू शकतो.अशाप्रकारे या वेगवेगळ्या बेटांवरील पक्षी हे एकाच वेळी भिन्न मार्गाने उत्क्रांत होत होते.

एकाच वेळी एकाच अवस्थे मधून किंवा समान मार्गाने उत्क्रांत होणारे प्राणिमात्र हे एकमेकांचे पूर्वज नसतात तर एकमेकांचे उत्क्रांतीचे भाईबंद आहेत असे म्हटले तरी चालेल.साप आणि पाल यांचेही उत्क्रांतीच्या बाबतीत अगदी माणूस आणि माकडे प्रमाणेच नाते आहे.माकड आणि मनुष्याचे गुणसूत्र तपासले असता यांपैकी चिपांझी च्या गुणसुत्रांशी माणसाचे जवळपास 99% गुणसूत्र जुळले होते.याचा अर्थ असा नव्हे की त्याची उत्क्रांती ही चिपांझी पासून झाली तर माणूस आणि चिपांझी यांच्या उत्क्रांतीच्या अवस्था या समान होत्या असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पूर्वीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये मनुष्याला पाठीला बाक होता तो चालू शकत नसे मात्र परिस्थितीशी जुळवून घेताना त्याला चालणे जमू लागले व त्यानुसार त्याच्या पाठीचा कणा ताठ झाला.त्याची शारीरिक रचना बदलू लागली.उत्क्रांतीच्या टप्प्यातील होमोनाइड या टप्प्यातील मनुष्य हा आजचा आधुनिक मनुष्य जास्त साम्य दर्शवतो .जंगलात राहणारा, गुहांमध्ये राहणारा, प्राण्यांची शिकार करून त्यांचे कच्चे मांस खाणारा मनुष्य व आत्ताच्या मनुष्याचे चेहऱ्याच्या पद्धतीमध्येही बराचसा बदल जाणवतो‌.मनुष्य हा  पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो बुद्धीने व युक्तीने विचार करू शकतो व वागू शकतो तसेच तो बोलूसुद्धा शकतो.