Home » भगवान श्रीकृष्ण यांच्या शरीरातील हा अवयव आज सुद्धा पृथ्वीवर अस्तित्वात आहे,जाणून व्हाल थक्क…
history

भगवान श्रीकृष्ण यांच्या शरीरातील हा अवयव आज सुद्धा पृथ्वीवर अस्तित्वात आहे,जाणून व्हाल थक्क…

महाभारताचे युद्ध हे केवळ कौरव वंशाचा नाश होण्यासाठी नव्हते तर पांडव वंश आणि भगवान श्रीकृष्ण व यादवांच्या प्रकारे नव्या सुरुवातीचा तो प्रहर होता.महाभारतातील विविध प्रकारच्या मानवी प्रवृत्ती समोर आणणारी महाभारतातील विविध वर्णने ही आपल्याला मानवी नातेसंबंध व मोहावर  विचार करण्यास भाग पाडतात. महाभारतामध्ये कौरव आणि पांंडवांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.भगवान श्रीकृष्ण यांच्या मार्गदर्शनामुळे कौरव वंशाचा नाश झाला.

आपल्या पुत्रांचे मृतदेह पाहून व्यथित झालेल्या गांधारीने भगवान श्रीकृष्णाला त्याच्याही वंशाचा असाच सर्वनाश होईल असा शाप दिला होता.त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण यांचा अंत झाला मानले जाते.मात्र भगवान श्रीकृष्णांच्या अंतानंतर ही त्यांच्या शरीरातील एक महत्वपूर्ण अवयव आज सुद्धा पृथ्वीवर अस्तित्वात आहे असे वर्णन केले जाते.हा अवयव म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे हृदय होय.भगवान श्रीकृष्ण यांचा अंत कसा झाला व भगवान श्रीकृष्णांच्या अंतानंतर त्यांच्या देहाचे काय झाले यासंदर्भात साहित्यामध्ये वर्णन केलेल्या माहितीच्या आधारे काही तथ्य आज आपण जाणून घेणार आहोत.भारतीय संस्कृती व साहित्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अंत झाल्यानंतर त्यांचे हृदय आज सुद्धा या भुतलावर अस्तित्वात आहे असे सांगितले जाते.

महाभारताच्या युद्धाचा शेवट झाल्यावर पांडवांना आपला विजय अक्षरशः नकोसा झाला होता. कारण यामध्ये त्यांनी केवळ स्वतःचे पुत्र व चुलत बंधू गमावले नव्हते तर कित्येक निष्पाप सैनिकांना सुद्धा गमावले होते. इतका प्रचंड नरसंहार पाहून खुद्द भगवान श्रीकृष्णांना सुद्धा शब्द सुचत नव्हते व अतिशय हतबल वाटत होते.

100 पुत्रांच्या मृत्यूनंतर दुखःवेगाने रणभूमीवर महाराणी गांधारी आल्या व त्या आपल्या पुत्रांच्या मृत्युने रडत होत्या, आक्रोश करत होत्या .आपल्या पहिला पुत्र दुर्योधनाचा देह आपल्या मांडीवर घेऊन गांधारीला अतीव वेदना झाल्या. गांधारीचा शोक पाहून त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण व पांडव आले .संजय कडून गांधारीला भगवान श्रीकृष्ण व पांडव तिथे आल्याचे कळल्याबरोबर ती ताडकन उभी राहिली व तिने भगवान श्रीकृष्णावर आपल्या सर्व शोकाचा क्रोध व्यक्त केला.

गांधारीने भगवान श्रीकृष्णाला उद्देशून म्हटले की हे द्वारकाधीश मी दररोज तुझी विष्णूचा अवतार व या जगाचा पालनकर्ता म्हणून पूजा करते व तूच मला माझ्या पुत्रांपासून पोरके केले. स्वतःच्याच निर्मितीला अशाप्रकारे नष्ट करताना तुला काहीच वाटले नाही का. हे युद्ध तू तुझ्या दैवी शक्तीने रोखू शकला नसता का असे प्रश्न तिने भगवान श्रीकृष्णाला केले व त्याला म्हटले की तुझी आई देवकी हिला जाऊन विचार की स्वतःची सात मुलं गमावल्यावर तिला किती दुःख झाले होते .तसेच दुःख आज मला माझी शंभर मुलं या युद्धामध्ये मारली गेल्यानंतर होत आहे.

भगवान श्रीकृष्णाने गांधारीचे सांत्वन केले व म्हटले की मी दुर्योधनाला या युद्धाच्या परिणामांची कल्पना या अगोदरच दिली होती.मात्र या शब्दांनी गांधारीचा क्रोध अतिशय वाढला व क्रोध आवेगाने तिने भगवान श्रीकृष्णांना शाप दिला की त्याचा संपूर्ण यादव वंश नष्ट होईल. द्वारका ही पुरामध्ये वाहून जाईल व यानंतर पुढील छत्तीस वर्षांमध्ये भगवान श्रीकृष्णाचा अंत होईल. भगवान श्रीकृष्णांनी गांधारीचा शाप स्वीकार केला व युधिष्ठिराच्या राज्याभिषेकानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले.

द्वारकेला परतल्यानंतर त्यानंतरची पस्तीस वर्षे आपली पत्नी रुक्मिणी आणि पुत्र सांबा यांच्यासह ते सुखाने राहत होते. मात्र गांधारीच्या शापाचे परिणाम हळूहळू दिसू लागले. सांबा हा जांबवतीचा पुत्र होता व सांबाच्या जन्माच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी भगवान शंकरांना आपल्याला त्यांच्यासारखा पुत्र व्हावा असे प्रार्थिले होते.भगवान शिवांना संहारासाठी ओळखले जाते व त्याच प्रमाणे अप्रत्यक्ष रीतीने सांबा हा यादव वंशाच्या विनाशास कारणीभूत ठरला. 

एका प्रहरी सप्तॠषी द्वारके मध्ये आले असता सांबा व त्याच्या मित्रांनी या ऋषींची परीक्षा घेण्याचे ठरवले व सांबाने आपल्या पोटावर एक लोखंडी सळई बांधून गर्भवती स्त्री असल्याचे नाटक केले व ऋषींना विचारले की तिच्या पोटी कोणते अपत्य जन्म घेईल .या सप्तॠषीं पैकी एका ऋषींच्या आपल्याला फसवले जात असल्याची कल्पना आली व त्यांनी सांभाळला त्याच्या पोटाभोवती जे काही गुंडाळले आहे तेच जन्म घेईल व त्या वस्तू द्वारेच त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश होईल असा शाप दिला व या शापातून मुक्तता मिळवण्यासाठी बलरामांनी या लोखंडाचे बारीक चूर्ण करून ते नदी प्रवाहात फेकले व याचे गवतामध्ये रूपांतर झाले या गवताच्या आधारेच यादव वंशातील पुरुषांनी एकमेकांवर हल्ला करून आपल्या कुळाचा नाश केला व या लोखंडाचा  एक भाग शिल्लक राहिला होता तो माशाच्या पोटामध्ये गेला व तो ज्या मच्छीमाराच्या हाती लागला त्याने यापासून बाण बनवला व या बाणाद्वारे भगवान श्रीकृष्णांचा अंत झाला.

भगवान श्रीकृष्ण व बलराम यांचा मृत्यू झाल्यानंतर पांडवांनी द्वारके मध्ये मदतीसाठी धाव घेतली या ठिकाणी जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बलराम यांच्या शरीरावर अंतिम संस्कार केले गेले तेव्हा भगवान श्रीकृष्णांचे हृदय हे नाश पावले नसून अखंडपणे तेवत असल्याचे दिसले.पांडवांनी हस्तिनापुरकडे प्रस्थान केल्यानंतर द्वारकेला पूराने  वेढले. या पुरामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णचे हृदय तेवत राहिले. भगवान श्रीकृष्ण यांचे हृद्य  या पृथ्वीतलावर आजही अस्तित्वात आहे असे मानले जाते.