Home » ‘इन्कलाब जिंदाबाद’ या नाऱ्याचा नेमका अर्थ काय, प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचायलाचं हवा…!
history

‘इन्कलाब जिंदाबाद’ या नाऱ्याचा नेमका अर्थ काय, प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचायलाचं हवा…!

इन्कलाब जिंदाबाद या घोषणेमुळे कोणत्याही देशभक्ता च्या अंगावर स्फुरण चढते व क्रांतीचे जणूकाही स्फुल्लिंग प्रज्वलित होते.या ना-याची सुरुवात केली ती भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी. बॉम्ब फोडत 8 एप्रिल 1929 रोजी या घोषणेला त्यांनीअगदी बुलंद केले.इन्कलाब जिंदाबाद हा नारा  मुळतः हसरत मोहानी यांनी आजादी ए कामिल किंवा संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करताना सर्वात प्रथम आणला होता.हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आणि विशेष करून भगतसिंग,चंद्रशेखर आणि अश्फाक उल्ला खान यांच्यावर या घोषणेने खूप मोठा प्रभाव टाकला होता.

आज सुद्धा त्या काळातील राजकीय कादंबऱ्यांमध्ये स्वातंत्र्य आणि देशप्रेमाने भारलेल्या पात्रांच्या ओठी हे घोषवाक्य हमखास आपल्याला दिसून येते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटीशांविरुद्ध लढताना अनेक क्रांतिकारकांनी देशभक्तांनी आपले प्राण गमावले. या संघर्षाच्या काळामध्ये संपूर्ण देशाला इन्कलाब जिंदाबाद या एका घोषणेने एकत्रितपणे बांधून ठेवले होते. इन्कलाब जिंदाबाद या  घोषणेचे अर्थ long live revolution किंवा क्रांति अमर रहे असे होतात.संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये इतके महत्त्वपूर्ण स्थान पटकावलेल्याइन्कलाफ जिंदाबाद  या घोषणेची उत्पत्ती कुठून झाली हे आज आपण जाणून घेणार आहोत.

इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा सर्वात प्रथम मेक्सिकन क्रांतीच्या वेळी विवा ला रिवॉल्यूशन या नावाने पुढे आली. याचा मूळ उद्देश हा लोकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्यामध्ये एक  प्रकारची ऊर्जा निर्माण करणे जेणेकरून त्यांनी सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित व्हावे हा होता.मेक्सीकन क्रांतीमध्ये वापरली गेलेली ही घोषणा इतकी प्रभावशाली होती की त्यानंतर संपूर्ण जगभरातील निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये आपापल्या परीने या घोषणेचा वापर केला गेला व तो परिणामकारक सुद्धा ठरला.भारतामध्ये या घोषणेने चा वापर इन्कलाब जिंदाबाद या शब्दांमध्ये केला गेला.

भारतामध्ये इन्कलाब जिंदाबाद प्रसिद्ध उर्दू शायर हजरत मोहनी यांनी सर्वात प्रथम निर्माण केली.हसरत मोहनी हे प्रसिद्ध उर्दू शायर पत्रकार व साहित्यिक होते.त्यांनी इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा 1921 साली तयार केली व त्याचा सर्वात प्रथम वापर 1929 साली भगत सिंह यांनी केला.शहीद यतिंद्रनाथ दास यावेळी 63 दिवसांच्या अन्नत्यागानंतर शहीद झाले होते.त्यांच्या मृत्यूनंतर सुप्रसिद्ध संपादक प्रा रामानंद चट्टोपाध्याय यांनी यतींद्नाथ दास यांच्या प्रती भारतीय जनतेने दिलेला सन्मान आणि भगतसिंग यांनी वापरलेल्या इन्कलाब जिंदाबाद या घोषणेवर प्रचंड टीका केली.

त्यावेळी भगतसिंग यांनी एक पत्र लिहून रामचंद्र चटोपाध्याय यांना इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे अर्थ व महत्त्व समजावून सांगितले होते.ते पत्र पुढीलप्रमाणे होतेपत्राच्या सुरुवातीला भगतसिंग यांनी संपादक रामचंद्र चटोपाध्याय यांना संबोधित करतांना असे म्हंटले होते की 1929 च्या एका अंकामध्ये इन्कलाब जिंदाबाद या शीर्षकाखाली काही मजकूर लिहिला आहे यामध्ये या लेखामध्ये तुम्ही इन्कलाब जिंदाबाद हा नारा कशाप्रकारे निरुपयोगी व निरर्थक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.तुम्ही खूप मोठे विचारवंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहात ज्यांच्याकडे सर्व समाज अतिशय आदराने पाहतो.

त्यामुळे तुमच्या लिखाणावर टीका करणे किंवा वादविवाद करणे हे नक्कीच दुस्साहस ठरेल.मात्र तरीही या घोषणेचा आम्हाला काय अर्थ अभिप्रेत आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे.भगतसिंग यांनी या पत्रामध्ये इंकलाब हा नारा सर्वदूर पर्यंत पोचवण्याचे आपले ध्येय असल्याचे सुद्धा स्पष्ट केले होते. हा नारा म्हणजे अन्याय मूलक व्यवस्थे मधून मुक्त होण्याचा मार्ग असल्याचेही त्यांनी म्हटले होते.रशियामधील क्रांतिकारी आंदोलनामध्ये सुद्धा या घोषणेच्या वापर केला गेला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भगतसिंगांना क्रांती या शब्दाचा अर्थ हिंसा मूलक नव्हता तर अशा एका समाजाची स्थापना करायची होती जिथे अशी समाजवादी व्यवस्था अस्तित्वात असेल व जिथे एका मनुष्य द्वारे दुसऱ्या मनुष्याचे शोषण केले जाणार नाही.इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचा अर्थ हा व्यक्ती परत्वे व उद्देश परत्वे निश्चितच बदलू शकतो यावर ते ठाम होते.भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.आज अनेक तरुण भगतसिंगांच्या आदर्श समोर ठेवतात मात्र सांप्रदायिकता व हिंसा यांना दूर सारून समाजवादी मूल्यांची रचना करणे यांना जमेल का हा एक मूलभूत प्रश्न या ठिकाणी निश्चितच  निर्माण होतो.