History

भारतात या 6 मंदिरात पुरुषांना आहे प्रवेश बंदी, फक्त स्त्रियांना प्रवेश : जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय संस्कृतीमध्ये देवी-देवतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवी देवतांचे अस्तित्व असलेल्या मंदिरांना प्राचीन काळापासून नागरी जीवनाचा एक अविभाज्य भाग मानले जाते.प्रत्येक मंदिरामध्ये केली जाणारी पूजा ,मंदिरामध्ये दिला जाणारा प्रवेश इत्यादी च्या संदर्भात काही विशेष नियम असतात व या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.  भारतामध्ये काही मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश निषिद्ध मानला जातो .यामध्ये काही मंदिरांत कायमस्वरूपी स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो तर काही ठिकाणी स्त्रियांना मासिक धर्माच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यास परवानगी नसते.

यामागे त्या त्या मंदिराच्या प्रथा व रूढींचा दाखला दिला जातो .या पद्धतींच्या विरोधात काही ठिकाणी आंदोलने सुद्धा केली गेली.या आंदोलनांना मध्ये स्त्री-पुरुष समानता हा मुद्दा प्रामुख्याने अधोरेखित केला गेला. मात्र आपल्याला आश्चर्य वाटेल की भारतामधील काही मंदिरांमध्ये स्त्रियांप्रमाणे पुरुषांना सुद्धा प्रवेश निषिद्ध मानला जातो. या मंदिरांमध्ये केवळ स्त्रियांना प्रवेश करण्याची अनुमती आहे।भारतामधील असे कोणते मंदिर आहेत जिथे पुरुषांना प्रवेश दिला जात नाही हे आज आपण जाणून घेणार आहोत.

अत्तुकल मंदिरः हे मंदिर केरळ मध्ये आहे व या मंदिरामध्ये स्त्रियांना पूजेचा मान दिला जातो.  अत्तुकल मंदिर हे पार्वती चे मंदिर आहे व या ठिकाणी पोंगल हा प्रमुख उत्सव साजरा केला जातो. पोंगल उत्सवाच्या दरम्यान या ठिकाणी स्त्री भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते व पोंगल या उत्सवाच्या दरम्यान स्त्रियांच्या या प्रचंड प्रमाणातील गर्दीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा घेण्यात आली आहे. या मंदिरामध्ये पुरुषांना प्रवेश दिला जात नाही।

चक्कुलथुकवू मंदिरः हे मंदीरसुद्धा केरळ मध्येच आहे .या मंदिरामध्ये  पार्वती देवीचे अस्तित्व आहे.या मंदिरात डिसेंबर महिन्यातील पहिल्या शुक्रवारी नारीपुजा हा विधी धनु या नावाने केला जातो .या शुक्रवारच्या अगोदर दहा दिवस स्त्री भाविकांनी उपवास केलेला असतो .या पूजेच्या दिवशी मंदिरातील पुरुष पुजारी याच भाविकांचे पाय धुऊन त्यांची पूजा करतात.

ब्रह्मदेवाचे मंदिरः राजस्थान मधील पुष्कर येथील ब्रह्मदेवाचे मंदिर भारतातील एक महत्व पूर्ण मंदिर मानले जाते.  या मंदिरामध्ये विवाहित पुरुषांना प्रवेश दिला जात नाही.पुष्कर मधील या मंदिरात हिंदू  पंचांगामधील कार्तिक पौर्णिमेला ब्रह्माच्या पूजेसाठी एक उत्सव साजरा केला जातो. या मंदिरामध्ये पुरुषांना प्रवेश न दिला जाण्याचे कारण म्हणजे असे मानले जाते की देवी सरस्वतीने या मंदिरामध्ये जो कोणी पुरुष विवाहित पुरुष प्रवेश करेल त्याचे वैवाहिक आयुष्य हे सुख शांती व समृद्धी चे जाणार नाही असा शाप दिलेला आहे.

भगवती मातेचे मंदिर ः हे मंदिर कन्याकुमारी येथे आहे. या मंदिराची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली आहे जिथे देवी पार्वतीने भगवान शंकर हे पती म्हणून प्राप्त व्हावे त्यासाठी खोलवर समुद्राच्या ठिकाणी कठीण व्रत केले होते.असे सांगितले जाते की देवी सती यांचा मणका याठिकाणी पडला होता. भगवती देवीला संन्यस्त वृत्तीची देवता मानले जाते.या सर्व कारणांमुळे या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत संन्यासी पुरुषांना प्रवेश दिला जातो मात्र साधारण पुरुषांना याठिकाणी प्रवेश निषिद्ध आहे.

माता मंदिरः बिहार येथील मुजफ्फरपूरमध्ये माता मंदिर आहे.त्या मंदिरामध्ये वर्षभरात विशिष्ट  कालावधीमध्ये पुरुषांना मंदिरामध्ये प्रवेश निषिद्ध मानला जातो. या विशिष्ट कालावधीमध्ये मंदिरातील पुरुष पुजा-यांनाही मंदिरात प्रवेश दिला जात नाही.

कामरूप कामाख्या मंदिरः कामरूप  कामाख्या मंदिर आसाम येथील प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर देवी पार्वतीचे मंदिर असून या ठिकाणी  देवी पार्वतीच्या कमरेचा भाग निखळला होता सांगितले जाते. या मंदिराच्या आवारात स्त्रियांना केवळ त्यांच्या मासिक पाळीच्या काळात मध्ये प्रवेश दिला जातो असे काही क्वचित मंदिरांमध्ये आढळते या मंदिरामध्ये सर्व कामे ही स्त्री पूजारी करतात.