Home » अबब ! ‘या’ प्रदेशातील लोक जगतात १५० वर्ष इतके आयुष्य,जाणून घ्या यामागील तथ्य…
Infomatic

अबब ! ‘या’ प्रदेशातील लोक जगतात १५० वर्ष इतके आयुष्य,जाणून घ्या यामागील तथ्य…

आधुनिक काळामध्ये प्रगत आरोग्य सुविधा व सुधारलेले राहणीमान यामुळे मनुष्याचे सरासरी आयुर्मान वाढले आहे.साधारणपणे 60 ते 70 वर्षे इतके सरासरी आयुष्य मनुष्य जगतो मात्र असे सांगितले की एखाद्या प्रदेशातील व्यक्ती या दीडशे वर्षे इतके साधारण आयुष्य जगतात तर निश्चितच या दाव्यात तथ्य आहे.दिडशे वर्ष ‌इतके सरासरी आयुष्य जगणारा समुदाय नक्की कोण आहे व कोणत्या प्रदेशात आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

अशा प्रकारे दीडशे वर्षे इतके आयुष्य जगणारा हा समुदाय आर्यवत या प्रदेशामध्ये आढळून येतो व या समुदायाचे नाव हुंजा समुदाय आहे.हुंजा समुदाय हा कधीकाळी भारताचाच एक हिस्सा होता.भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये हुंजा समुदायाच्या प्रदेशाचा समावेश होतो.भारताच्या उत्तरेकडे हा प्रदेश पसरलेला आहे.हा प्रदेश सर्वात उंचीवर असल्यामुळे याला जगाचे छत असेसुद्धा म्हटले जाते.या प्रदेशाच्या वर अफगाणिस्थान,पाकिस्तान,चीन व भारताच्या सीमा एकमेकांशी मिळतात.

आर्यवतमध्ये हुंजा समुदायाचे वैशिष्ट्य असे आहे की या प्रदेशामध्ये राहणारे लोक हे सरासरी आयुष्य 100 ते 120 वर्षे इतके जगतात व काही लोक तर दीडशे वर्षे इतके सुद्धा आयुष्य जगतात.त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य म्हणजे ते निसर्गाच्या प्रकृतीच्या नियमानुसार रहाण्याला प्राधान्य देतात. त्यांचे खानपान हे आज सुद्धा प्राचीन काळाप्रमाणे निसर्गाला अनुसरून केले जाते. हे लोक अतिशय मनमोकळेपणाने व आनंदाने राहतात व या सर्वांमुळे आजही या लोकांचे आयुर्मान इतके जास्त आहे.

हुंजा समुदायाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे लोक खानपान हे शास्त्रीय पद्धतीनुसारच करतात व याचे परिणाम म्हणून हे लोक खूप दीर्घकाळपर्यंत तरुण व तंदुरुस्त दिसतात.या प्रदेशातील लोकांना बुरोशो व त्यांच्या बोलीभाषेला बुराश्की असे म्हटले जाते.असे सांगितले जाते की हे लोक सिकंदराचे वंशज आहेत व यांची लोकसंख्या सध्या 87000 इतकी आहे.

या प्रदेशातील लोकांच्या दीर्घकाळपर्यंत तरुण व तंदुरुस्त दिसण्याचा फटका सुद्धा त्यांना अनेकदा बसतो.1984 साली सर्वात प्रथम असे एक उदाहरण समोर आले होते.या समुदायामधील एक व्यक्ती लंडन विमानतळावर चौकशी अधिकाऱ्यांकडून पकडली गेली व या अधिकाऱ्यांचे म्हणणे असे होते की या व्यक्ती ची जन्मतारीख व त्याचे एकंदरीत बाह्यरूप एकमेकांशी जुळत नाहीये. कारण या व्यक्तीची जन्मतारीख 1932 सालची होती व या मानाने ती व्यक्ती खूपच तरुण दिसत होती.याचे सर्व श्रेय या भागातील लोकांच्या राहणीमानास जाते.

या प्रदेशातील सर्वच लोक खूप तरुण व तंदुरूस्त असतात.मात्र केवळ दीर्घायुष्य व चिरतारुण्य हेच या प्रदेशाचे वैशिष्ट्य नसून या भागाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रदेशातील स्त्रिया वयाच्या 65 व्या वर्षी सुद्धा मातृत्व सुख उपभोगू शकतात.अशाप्रकारे कोणत्याही आधुनिक काळातील आजारांपासून कोसो दूर असलेल्या या प्रदेशाला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले तर वावगे ठरणार नाही.