Home » ‘ताज हॉटेल’ हा इंग्रजांनी केलेल्या अपमानाचा बदला होता…!
Infomatic

‘ताज हॉटेल’ हा इंग्रजांनी केलेल्या अपमानाचा बदला होता…!

भारताचे अभिमान व वैभवामध्ये भर टाकणारी अनेक वैशिष्ट्ये अस्तित्वात आहेत.त्यापैकीच एक म्हणजे टाटा ग्रुप ऑफ हॉटेल्स चे ताज हॉटेल होय.२६/११ ला झालेल्या हल्ल्यानंतर टाटा ग्रुप चे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते.टाटा ग्रुपचे ताज हॉटेलने आतापर्यंत हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये अनेक मानसन्मान मिळवले आहेत.मात्र नुकताच टाटा ग्रुपच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

जागतिक स्तरावरील फिफ्टी हॉटेल्स २०२१ या यादीमध्ये संपूर्ण जगभरातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड चा दर्जा ताज हॉटेल ला दिला गेला आहे.कोरोना काळामध्ये सुद्धा आपली धोरणे अतिशय सशक्तपणे मांडण्याच्या टाटा ग्रुप यांच्या भूमिकेमुळे ताज हॉटेलला हा दर्जा दिला गेला आहे.या अगोदर २०१६ साली केलेल्या या सर्वेक्षणामध्ये ताज हॉटेल्सला अडतीसावे स्थान प्राप्त झाले होते.

संपूर्ण जगभरातून भारतामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी व विशेष पाहुण्यांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले ताज हॉटेल हे ब्रिटिशांनी केलेल्या अपमानाचा बदला म्हणून उभारण्यात आलेले आहे.टाटा ग्रुप समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी १९०३ साली ताज हॉटेलची निर्मिती ही ब्रिटिशांनी केलेल्या अपमानाचा बदला म्हणून केली होती.

त्यावेळी जमशेदजी टाटा ब्रिटनमध्ये आपल्या मित्राला भेटण्यास गेले होते.त्यांच्या मित्राने त्यांना एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते.ज्यावेळी जमशेदजी टाटा त्या हॉटेलमध्ये आत जाण्यास निघाले तेव्हा तेथील मॅनेजरने त्यांना आत जाण्यापासून रोखले व त्यांना सांगितले की या हॉटेलमध्ये भारतीयांना आत येण्यास परवानगी नाही.जमशेदजी टाटांना मॅनेजरचे हे बोलणे ऐकून हा समस्त भारतवासीयांचा अपमान वाटला व या अपमानाचा बदला घेण्याचे त्यांनी ठरवले.

यासाठी त्यांनी अशा एका हॉटेलची निर्मिती करण्याचे ठरवले जिथे केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी लोक सुद्धा येऊन राहतील व तेही कुठच्या परवानगीशिवाय.भारतामध्ये आल्यावर त्यांनी सर्वात प्रथम ताज हॉटेल बांधण्याचे मनावर घेतले व मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया च्या समोर ताज हॉटेल चे निर्माण केले गेले.ताज हॉटेल च्या समोर अथांग समुद्र आपल्याला दिसतो.ताज हॉटेलमध्ये आज घडीला ज्या देशामध्ये जमशेदजी टाटा यांचा अपमान करण्यात आला त्या देशातील लोक सुद्धा मोठ्या संख्येने राहतात.